Join us   

वय वाढतं म्हणजे नक्की काय होतं? आहरतज्ज्ञ सांगतात, चिरतरुण राहण्यासाठी करा फक्त १ गोष्ट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2023 9:50 AM

How To Keep Young For Long Time : तरुण राहायचं शास्त्र काय आणि नेहमी तरुण राहायचं, तरुण दिसायचं तर काय करायला हवं याविषयी

ठळक मुद्दे टेलोमिअर्सची संख्या जास्तीत जास्त आणि चांगली राहील यासाठी कायम प्रयत्न करायला हवेत. य वाढण्याला आपण रोखू शकत नाही, पण वय वाढलं तरी वयस्कर दिसू नये यासाठी सोप्या टिप्स..

आपण जसे मोठे होतो तसं आपलं वय वाढतं. आपलं वय कधीच वाढू नये असं प्रत्येकाला वाटतं. पण कधी ना कधी वय वाढतंच. आता वय वाढलं असं आपण अगदी सहज म्हणत असलो तरी म्हणजे नेमकं काय होतं हे आपल्याला माहित नसतं. वयाचे आकडे वाढत जातात म्हणजे आपण दिवसेंदिवस म्हातारे होत जातो. पण तरुण राहायचं शास्त्र काय आणि नेहमी तरुण राहायचं, तरुण दिसायचं तर काय करायला हवं याविषयी प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी काही महत्त्वाच्या टिप्स देतात (How To Keep Young For Long Time). 

त्या सांगतात आपण वय हे आकड्यांमध्ये मोजतो. पण वय वाढते त्यानुसार शारीरिकरित्या काही बदल होतात. आपलं डाएट आणि लाईफस्टाईल यावर आपलं शारीरिक वय ठरत नाही, तर आपल्या शरीरात असणाऱ्या टेलोमिअर्सवर आपलं वय अवलंबून असतं. आता टेलोमिअर्स म्हणजे काय तर शरीरातील क्रोमोझोम्सचा सगळ्यात शेवटचा घटक म्हणजे टेलोमिअर्स. क्रोमोझोम्स म्हणजे आपल्या शरीरातील डीएनओ. आपण ज्यावेळी चुकीचे खातो, चुकीची लाईफस्टाईल फॉलो करतो त्या त्यावेळी या टेलोमिअर्सची संख्या कमी होते. 

वय वाढते तसे टेलिमिअर्सची संख्या कमी होत असल्याने वय वाढते. यावर कोणाचाही निर्बंध नसतो. पण आपण तोंडात काय टाकतो, आपली लाईफस्टाईल काय आहे यावर आपण हे टेलोमिअर्स कंट्रोल करु शकतो. ताणाचे नियोजन, चांगला आहार, नियमित व्यायाम यानुसार आपले टेलोमिअर्स किती कमी होतात ते ठरते. त्यामुळे या टेलिमिअर्सची संख्या कमी होऊ नये म्हणून आपण योग्य ती काळजी घ्यायला हवी. हा शरीरातील शेवटचा घटक असला तरी तो अतिशय महत्त्वाचा असून विविध आजारांपासून लढण्यासाठी हा घटक अतिशय उपयुक्त असतो. या टेलोमिअर्सची संख्या जास्तीत जास्त आणि चांगली राहील यासाठी कायम प्रयत्न करायला हवेत. 

टॅग्स : आरोग्यत्वचेची काळजीआहार योजनाहेल्थ टिप्सब्यूटी टिप्स