Join us   

दातांवर पिवळा थर आलाय? फक्त २० रूपयांत पांढरेशुभ्र, चमकदार होतील दात, करा २ उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 9:09 AM

How to Keep Your Teeth Clean : दातांच्या पिवळेपणामुळे दात किडणं, इन्फेक्शन, तोंडातून रक्त येणं अशा समस्या उद्भवतात.

मोत्यांसारखे चमकणारे जात आत्मविश्वास वाढवतात. दात पिवळे झाले असतील तर चारचौघात बोलताना किंवा हसताना अवघडल्यासारखं वाटतं. (How to Keep Your Teeth Clean) इतराचं लक्ष आपल्या दातांकडे जाईल की काय अशी भिती असते. दातांवर पिवळा थर जमा होतो त्याला प्लेक असं म्हणतात. प्लेक वेळीच स्वच्छ न केल्यास त्याचे टार्टरमध्ये रूपांतर होते.  यामुळे दात आणि हिरड्या कमतकुवत होतात. (How to Brush Your Teeth Properly)

दातांच्या पिवळेपणामुळे दात किडणं, इन्फेक्शन, तोंडातून रक्त येणं अशा समस्या उद्भवतात. दात, पांढरेशुभ्र आणि चांगले दिसण्यासाठी नेहमीच महागड्या टुथपेस्ट फायदेशीर ठरतात असं नाही तुम्ही नैसर्गिकरित्या दातांच्या स्वच्छतेसाठी काही सोपे उपाय करू शकता. (Brushing Your Teeth With Baking Soda)

इंडियन डेंटल असोशिएशच्या रिपोर्टनुसार बाजारात मिळणारे टूथपेस्ट आणि पावडरमध्ये कार्बामाईड पेरोक्साईडचा वापर केला जातो. याचा संपर्क ब्लिचिंग एजंट्शी येतो. ब्लिचिंग असुरक्षित मानले जाते. दात चमकवण्यासाठीतुम्ही बेकींग सोडा, नारळाचं तेल किंवा हायड्रोजन पेरॉक्साईडचा वापर करू शकता.

अंगकाठी बारीक पण दंड जाड-थुलथुलीत दिसतात? १० मिनिटं करा हा व्यायाम-हात दिसतील सुंदर

व्हिनेगर आणि बेकींग सोडा

एपल सायडर व्हिनेगरचा वापर तुम्ही बेकींग सोड्यासह करू शकता यामुळे दातांचा पिवळेपणा दूर होईल आणि दात मोत्यांसारखे चमकतील. याव्यतिरिक्त तुम्ही पुदीना आणि नारळाचं तेल याची पेस्ट बनववून दातांवर लावू शकता. यामुळे दातांवर पिवळेपणा आणि घाणेरडे बॅक्टेरियाज नष्ट होतील.

घरच्याघरी टुथपेस्ट कशी बनवावी

घरी टुथपेस्ट बनवण्यासाठी तुम्हाला बाजारातून दोन पदार्थ आणावे लागतील त्यात हायड्रोजन पेरोक्साईड आणि बेकींग सोडा याचा समावेश आहे. या दोन्ही पदार्थांच्या वापरामुळे दातांची चमक वाढेल. बेकींग सोडा पाण्यात मिसळल्यानंतर त्यातून फ्री रॅडीकल्स येतात जे दातांच्या इनॅमलवर डाग निर्माण करणाऱ्या घटकांना दूर ठेवतात.

साजूक तूप खाता, पण तूप खाऊन पोट बिघडलं तर? डॉक्टर सांगतात, तूप खाण्याची योग्य पद्धत

जवळपास २ मोठे चमचे हायड्रोजन पेरोक्साईड एक चमचा बेकींग सोडाबरोबर मिक्स करा. त्यानंतर या पेस्टनं ब्रश करा. ही पेस्ट खडबडीत असू नये. पेस्टचे टेक्चर तपासा. ब्रश केल्यानंतर व्यवस्थित गुळण्या करा. ही पेस्ट तोंडाला लागलेली राहणार नाही याची काळजी घ्या. आठवड्यातून २ किंवा ३ वेळा तुम्ही ही टुथपेस्ट वापरू शकता. याचे कोणतेही साईड इफेक्ट्स होणार नाहीत.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल