शरीरात आवश्यक पोषक तत्वांची कमतरता पूर्ण करण्यासााठी आयर्न हा महत्वाचा घटक आहे. शरीरात आयर्नची कमतरता भासल्यास शरीराच्या इतर समस्या उद्भवतात. आयर्न शरीराला हिमोग्लोबिन बनवण्यास मदत करते. ज्यामुळे शरीरात ऑक्सिजनचा संचार व्यवस्थित होतो.
आयर्नची कमतरता उद्भवण्याची अनेक कारणं असू शकतात. जर एखादी व्यक्ती जेवणात योग्य प्रमाणात आयर्न घेत नसेल तर त्या व्यक्तीच्या शरीरातील आयर्नचा स्तर कमी होऊ शकतो. इंटरनल ब्लिडींग किंवा पोटाच्या आतील रक्तप्रवाह यामुळे शरीरात आयर्नची कमतरता भासते. पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये ही समस्या अधिक उद्भवते.
आयर्नच्या कमतरतेमुळे गंभीर समस्या उद्भवू शकतात. पण याची खास लक्षणं दिसून येत नाहीत. चांगली जीवनशैली आणि आहार घेऊन तुम्ही या समस्या टाळू शकता. जर शरीरात आयर्नची कमतरता असेल याकडे दुर्लक्ष करू नये. डॉक्टरांचा सल्ला घेऊन यावर काम करायला हवं.
डेयरी उत्पादनांचे सेवन
अधिक प्रमाणात कॉफी, चहा आणि डेअरी उत्पादनांच्या सेवनानं आयर्न अब्जॉर्ब करण्यास मदत होते. ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता भासते तेव्हा डेअरी प्रोडक्ट्सचा समावेश टाळायला हवा. आयर्न फोर्टिफाईड अन्न खाल्ल्यानं आयर्नची कमतरता पूर्ण होण्यास मदत होते.
दूध-दह्यापेक्षा जास्त कॅल्शियम देतात ७ पदार्थ; रोज खा-मिळेल भरपूर ताकद-कंबरदुखी टळेल
व्हिटामीन सी चे सेवन
व्हिटामीन सी चे सेवन आयर्नची कमतरता वाढण्यास फायदेशीर ठरते. व्हिटामीन सी आयर्नचे अवशोषण करण्यास कारणीभूत ठरते. व्हिटामीन सी नं परीपूर्ण खाद्य पदार्थ टोमटो, संत्री, लिंबांचे सेवन केल्यानं आयर्नचे प्रमाण वाढते.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जर कोणात आयर्नची कमतरता असेल तर आयर्न सप्लीमेंट्स किंवा टॅबलेट्सचे सेवन करून रक्त वाढवले जाऊ शकते. आयर्नची कमतरता लवकरात लवकर नष्ट करता येते. आयर्न टॅब्लेट्स दुधासोबत घेऊ नये. यामुळे अपचन, उलटी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
आयर्नच्या कमतरतेनं डोकेदुखी, चक्कर येणं, दम लागणं अशा सम्सया उद्भवतात. केस गळण्याची समस्या उद्भवते. आयर्नच्या कमतरतेमुळे शरीराला योग्य प्रमाणात पोषण मिळत नही. ज्यामुळे केस गळायला लागतात.