आजकाल बऱ्याच महिला वाढणाऱ्या वजनामुळे आणि बाहेर आलेल्या पोटामुळे त्रस्त आहेत. वजन कमी करण्यासाठी डाएट, व्यायामापासून वेवेगळे उपाय करण्याची महिलांची तयारी असते. पोटावरची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही काही योगासनांची मदत घेऊ शकता. (How to lose belly fat quickly )योग गुरू बाबा रामदेव यांनी पोटावरची चरबी कमी करण्यासाठी काही सोपे मार्ग सांगितले आहेत. योगासनांचा आपल्या दिनचर्येत समावेश केल्यास पोटावरची चरबी कमी करण्यास मदत होते. (Baba Ramdev suggests effective yoga asanas to lose belly)
चक्की चलनासन
या योगासनात शरीराची स्थिती चक्की प्रमाणे असते. म्हणूनच या आसनाला चक्की चलनासन म्हणतात. हातांनी पीट दळण्याच्या चक्कीप्रमाणे चक्की चालवली जाते. हे आसन अजिबात कठीण नाही. यामळे बेली फॅट कमी करण्यास मदत होते.
तिर्यक ताडासन
ज्या महिलांना त्यांचा लठ्ठपणा लवकर कमी करायचा आहे त्यांनी हे आसन दररोज ३ ते ४ वेळा करावे. हे पोटाची चरबी कमी करते तसेच शरीरातील एकूण चरबी कमी करते. कंबर पातळ आहे आणि बाजूंनी कमी चरबी आहे. तसेच त्याच्या नियमित सरावाने शरीर लवचिक बनते.
बद्ध कोणासन
हे आसन पोटाची चरबी कमी करण्यासाठी उत्तम आहे. दीर्घ श्वास घेऊन ५० वेळा हे आसन केल्यानं चरबी कमी होण्याव्यतिरिक्त रक्त सर्क्युलेशन चांगलं राहण्यास मदत होते. याशिवाय पाठ, गुडघ्यांचे आजार दूर होण्यास मदत होते.