Join us   

पोटावर मोठ्ठे टायर्स दिसतात, शरीर बेढब झालं? फक्त 'हे' छोटा बदल करा, लवकर व्हाल फिट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 12:31 PM

How to Lose Weight Faster in a Month : वजन कमी करण्यासाठी रोज ८ ते १० ग्लास पाणी प्या आणि स्वत:ला हायड्रेट ठेवा.

एकदा वाढलेलं वजन कमी करणं फार कठीण असतं  वजन कमी करण्यासाठी काही लोक जीमला जातात तर काहीजण डाएटचा आधार घेतात.  (How to lose weight fast) जेव्हा तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतात तेव्हा फक्त व्यायाम करू चालत नाही अशावेळी सकाळपासून रात्रीपर्यंत आपण काय खातो याकडे विशेष लक्ष द्यावं लागतं. डॉक्टर रमिता कौर यांनी  आपल्या इंस्टाग्राम पोस्टवरून निरोगी आतड्यांसाठी आणि वजन कमी करण्यासाठी ५ उपाय सांगितले आहेत. (How to Lose Weight Faster in a Month)

वजन कमी करण्यासाठी रोज ८ ते १० ग्लास पाणी प्या आणि स्वत:ला हायड्रेट ठेवा. प्रोसेस फूड्स किंवा शुगरी आयटम्सपासून लांब राहा. जेवण जास्त घाईघाईने करू नका, अन्न व्यवस्थित चावून खा. जेवणात फायबर्स, प्रोटीन्सयुक्त पदार्थांचा समावेश  करा. कडधान्य, सोयाबीन, पनीर, टोफू या पदार्थांचे सेवन करा. वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असताना अनेकजण एकवेळचं जेवण सोडतात. अशी चूक न करता तुम्हाला कंटिन्यू ठेवता येईल असा आहार घ्या. 

वेलची

वेटलॉस एक्सपर्ट्स  वजन कमी करण्यासाठी वेलची खाण्याचा सल्ला देतात. यामुळे मेटाबॉलिझ्म वाढवून वजन कमी होण्यास मदत होते. वेट लॉससाठी वेलचीचं पाणी सुद्धी पिऊ शकता. यामुळे महिन्याभरात तुम्हाला बदल जाणवेल.

बडीशोप

पोटाच्या बऱ्याच समस्या दूर ठेवण्यासाठी बडीशेप फायदेशीर ठरते.  वजन कमी करण्यासाठी तुम्ही बडीशोप खाऊ शकता. यामुळे फॅट्स जमा होणं रोखून ते जळण्यास मदत होते. तज्ज्ञांनी बडीशेप जेवणानंतर किंवा चहा प्यायल्यानंतर खाण्याचा सल्ला दिला आहे.

काळी मिरी

वजन कमी करण्यासाठी काळी मिरी, मध, लिंबू पाण्यात मिसळून रोज सकाळी या पाण्याचे सेवन करा. यामुळे अतिरिक्त फॅट बर्न होण्यास मदत होईल.

आलं

सकाळी आणि रात्रीच्या जेवणानंतर पाण्यात आल्याचा तुकडा मिसळून हे पाणी प्या. वजन कमी करण्यासाठी आलं फायदेशीर  मानलं जातं. 

हळद

एंटीऑक्सिडेंट्सनी परिपूर्ण हळद वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. एक ग्लास पाण्यात  चुटकीभर हळद घालून सकाळी प्या. यामुळे इम्यूनिटी वाढण्यास आणि वजन कमी  होण्यासही मदत होईल.

टॅग्स : हेल्थ टिप्सवेट लॉस टिप्स