वजन वाढण्याची समस्या आजकाल सर्वच वयोगटातील लोकांमध्ये उद्भवते. एका नवीन अभ्यासानुसार डांन्स केल्याने मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो ज्यामुळे तुमची तब्येत चांगली राहते. (Weight Loss Tips) हार्वर्डच्या अभ्यासानुसार वय कितीही असो तब्येत चांगली असेल तर त्यापेक्षा मोठे काहीच नाही. ३० ते ४० च्या वयात मेमोरी शार्प होते. जगभरातील अनेक लोक प्रसिद्ध योगगुरू बाबा रामदेव यांना फॉलो करतात. (Home Remedies And Yoga Tips From Baba Ramdev To Lose Weight Loss)
बाबा रामदेव सांगतात ३ ते ३ ग्राम दालचिनी घ्या. २०० ग्राम पाण्यात उकळवून घ्या नंतर या पाण्यात मध मिसळून या पाण्याचे सेवन करा. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल. एनसीबीआयच्या रिपोर्टनुसार दालचिनीचं पाणी प्यायल्याने वजन कमी होणं सोपं होतं. दालचिनी लठ्ठपणा कमी करण्यास प्रभावी ठरते. दालचिनीला ब्राऊन फॅट गुड फॅट्सच्या स्वरूपात ओळखले जाते. यात लिपिड ड्रॉपलेट्स आणि आयर्नयुक्त मायटोकॉन्ड्रीया असते. (Ref) ब्राऊन फॅट थंड वातावरणात उष्णता निर्माण करते ज्यामुळे शरीर गरम राहण्यास मदत होते. म्हणूनच थंड प्रदेशातील लोक दालचिनीचा आहारात समावेश करतात.
लाईफस्टाईल कशी बदलावी? (Easy Tips To Loss Belly Fat)
वजन वाढू देऊ नका, स्मोकींग टाळा, वेळेवर झोपा, ८ तासांची झोप घ्या, ब्लड शुगर तपासून पाहा, वर्कआऊट करा आणि मेडीटेशन करा. खराब लाईफस्टाईल, फास्टफूड, कार्बोनेडेट ड्रिंक्स, मानसिक ताण-तणाव, वर्कआऊटची कमतरता, औषधांचे साईड इफेक्ट जाणवतात, झोपेची कमतरता भासते.
शरीर पोखरुन टाकते व्हिटामिन बी-१२ ची कमतरता, ४ व्हेज पदार्थ खा-शरीर होईल मजबूत
लिफ्टवापरण्याऐवजी शिड्या चढा, उतरा, सतत चहा-कॉफीचे सेवन करू नका, भूक लागल्यानंतर सगळ्यात आधी पाणी प्या. जेवण आणि झोपण्यात ३ तासांचा गॅप ठेवा. आलं-लिंबाचा चहा प्या, आल्याने फॅट कंट्रोल करण्यास मदत होते. रात्री १ चमचा त्रिफळा गरम पाण्यासोबत घ्या, त्रिफळा डायजेशन चांगले ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतो आणि वजनही कमी होते.
दालचिनीतील पॉलिफेनॉल्स इंसुलिन संवेदनशीलता चांगली बनवण्यास मदत करतात. इंसुलिन रक्तातील ग्लुकोजचा स्तर नियंत्रित करते. ज्यामुळे गंभीर आजारांपासूनही बचाव होतो. दालचिनीमुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया डेविसच्या वैज्ञानिकांकडून करण्यात आलेल्या अभ्यासानुसार दालचिनीच्या अर्काचे सेवन केल्याने टाईप २ डायबिटीक रुग्णांची ब्लड शुगर नियंत्रणात आणण्यास मदत होते.