लठ्ठपणामुळे अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. डायबिटीस, हार्ट डिसीज, किडनी प्रोब्लेम, ब्रेन प्रोब्लम यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. वजन वाढल्यामुळे आणि अन्हेल्दी पदार्थांच्या सेवनामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होत जाते. (Weight Loss tips) सुरूवातीलाच वाढणाऱ्या वजनावर नियंत्रण ठेवलं नाही तर ही समस्या गंभीर होऊ शकते. शारीरिक व्यायाम, खाण्यापिण्यात सुधारणा केल्यास वजन नियंत्रणात राहू शकतं. (Vegetarian diet to lose weight lean protines)
लठ्ठपणा कमी करण्याचे नियम
लठ्ठपणा कमी करण्यासाठी सगळ्यात आधी हे समजून घ्यायला हवं की काय खायचं आणि काय खाणं टाळायचं. हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार व्हेजिटेरीन लोक मीटचे सेवन करत नाहीत. प्रोसेस्ड फूड किंवा फास्ट फूडचं सेवन करतात. प्रोसेस्ड फूड म्हणजेच असं अन्न ज्याचे रॉ मटेरियल अनेकदा प्रोसेस केले जाते. या पदार्थात कार्ब्सचे प्रमाण जास्त असते. म्हणूनच याचे सेवन कमी करायला हवं. जास्त मीठ आणि साखर खाणंसुद्धा लठ्ठपणा वाढवू शकतं.
१) नॉन स्टार्ची भाज्या
नॉन स्टार्ची भाज्यांमध्ये ब्रोकोली, शिमला मिरची, फूलकोबी, मशरूम, टोमॅटो, गाजर, वांगी, काकडी यांचा समावेश होतो. या पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट्स कमी प्रमाणात असतात. यामुळे लठ्ठपणा कमी होतो.
२) स्टार्ची भाज्या
मटार, बटाटा, मक्का आणि विंटर स्क्वॅश यांचा स्टार्ची व्हेजिटेबल्समध्ये समावेश होतो. वजन कमी करण्यासाठी या भाज्यांचा आहारात समावेश करा.
३) बीया आणि फळं
बीया आणि फळं भाज्यांमध्ये जास्तीत जास्त प्रोटीन्स असतात. फॅट आणि कार्बोहायड्रेट्स कमी असतात. म्हणून भाज्यांच्या सेवनानं वजनावर नियंत्रण ठेवता येतं. मसूरची डाळ, काळ्या बीया, शेवग्यांच्या शेंगा यांसारख्या भाज्या खायला हव्यात.
४) नट्स
नट आणि बिया केवळ लठ्ठपणाच नाही तर इतर अनेक आजारांपासून बचाव करतात. त्यात बदाम, अक्रोड, पिस्ता, काजू, सूर्यफुलाच्या बिया, चिया बिया, नट बटर इत्यादींचा समावेश असू शकतो.
5) लीन प्रोटीन्स
बीन्स, शेंगा, शेंगदाणे, बिया, नट बटर, अंडी, ग्रीक दही, दूध आणि सोया उत्पादने जसे की टोफू, टेम्पेहमध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात.