वेस लॉससाठी व्यायाम किंवा डायटिंग करावी लागते. पण सगळ्यांनाच हे जमतं असं नाही. अनेकांना रोजच्या व्यस्त जीवनशैलीत व्यायामासाठी वेळ मिळत नाही. (How to loss weight faster) आपण बारीक सुडौल दिसावं, वजन नियंत्रणात राहावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. (Weight Loss Tips) कमी वेळेत बारीक होण्यासाठी लोक अनेक उपाय करून पहातात. (Slim Body Tips) तासनतास उपाशी राहण्यापासून रात्रीचं जेवण सोडण्यापर्यंत अनेक प्रयत्न सुरू असतात तर काहीजण जीममध्ये तासनतास घाम गाळतात. (Nutritionist told 3 natural remedies for 5 kg weight loss in one week belly fat loss tips)
वजन कमी करण्यासाठी अनेकजण डिटॉक्स डाएटसुद्धा घेतात. न्युट्रिशनिस्ट रमिता कौर यांनी फॅन्सी डाएट खूपच नुकसानकारक असल्याच सांगितले आहे. टॉक्सिन्स काढून टाकण्यासाठी तुम्ही ३ पदार्थ खाऊ शकता. पोटाची चरबी वाढण्यासाठी काही टॉक्सिक पदार्थ जास्त जबाबदार ठरतात. रिकाम्या पोटी जिरा पुदिन्याचं डिटॉक्स वॉटर प्या, ब्रेकफास्टमध्ये काकडी खा, दोन जेवणांच्यामध्ये चिया सिड्सचे पाणी प्या.
डिटॉक्स डाएटने काय नुकसान होतं?
डिटॉक्स डाएटमुळे भूक खूप लागते आणि कमकुवतपणा येतो. यामळे एनर्जी, ब्लड शुगर कमी होणं, थकवा, चक्क येणं, आणि अंगदुखीची समस्या उद्भवू शकते. असं वेटलॉस डाएट खूपच बोरिंग ठरू शकतं. न्युट्रिशनिस्टनी असे फॅन्सी डाएट घेण्यापेक्षा हाय फॅट्स, हाय शुगर पदार्थांपासून लांब राहण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय ताजी फळं, भाज्या यांचे सेवन करायला हवं.
१) सकाळी लवकर उठायची सवय ठेवा जर तुम्हाला लवकर वजन कमी करायचं असेल तर सकाळी लवकर उठण्याची सवय ठेवा. आयुर्वेदानुसार सकाळी लवकर उठल्याने तुम्हाला अनेक आजारांपासून लांब राहता येऊ शकतं आणि लठ्ठपणाही कमी होतो.
२) सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी कोमट पाण्याचे सेवन करा. यामुळे तुमचे शरीर डिटॉक्सिफाय होईल आणि वजन कमी होण्यास मदत होईल. कोमट पाण्यात लिंबाचा रस घालून तुम्ही हा रस पिऊ शकता.
अशक्तपणा, थकल्यासारखं वाटतं? ग्लासभर दुधात 'हा' पदार्थ मिसळून प्या, कमजोरी-थकवा होईल दूर
३) एक्सपर्ट्सच्यामते सकाळच्यावेळी ५०० मिलीलीटर पाणी प्यायल्याने मेटाबॉलिझ्म ३० टक्के वाढतो. अशात तुम्ही ५०० मिलीीटर किंवा १ ते २ ग्लास पाण्याचे सेवन करू शकता.
४) वजन कमी करण्यासाठी जिममध्ये वेटलिफ्टींग करा. साधे व्यायाम जसं की एरोबिक्स, ब्रिस्क वॉक, सायकलिंग, स्विमिंग करू शकता. यामुळे वेगानं वजन कमी होण्यास मदत होईल.