Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > ब्लड शुगर कायम कंट्रोलमध्ये राहील; जेवणाआधी फक्त १ काम करा, डायबिटीसचा टळेल धोका

ब्लड शुगर कायम कंट्रोलमध्ये राहील; जेवणाआधी फक्त १ काम करा, डायबिटीसचा टळेल धोका

How to lower blood sugar : युरोपिन जर्नल ऑफ क्लिनिकल न्युट्रिशनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीनुसार जेवणाच्या ३० मिनिटं आधी २० ग्राम बदाम खाल्ल्यानं शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2023 12:02 PM2023-04-02T12:02:45+5:302023-04-02T13:15:40+5:30

How to lower blood sugar : युरोपिन जर्नल ऑफ क्लिनिकल न्युट्रिशनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीनुसार जेवणाच्या ३० मिनिटं आधी २० ग्राम बदाम खाल्ल्यानं शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत होते.

How to Lower Blood Sugar : Indian doctors claim in new study having 20 grams almonds before meal reduce blood sugar | ब्लड शुगर कायम कंट्रोलमध्ये राहील; जेवणाआधी फक्त १ काम करा, डायबिटीसचा टळेल धोका

ब्लड शुगर कायम कंट्रोलमध्ये राहील; जेवणाआधी फक्त १ काम करा, डायबिटीसचा टळेल धोका

प्रत्येकाच्याच घरात एकतरी डायबिटीस रुग्ण असतोच. डायबिटीस घटवण्यासाठी  अजून  कोणतेही ठोस उपचार उपलब्ध नसले तरी जीवनशैलीत बदल करून तुम्ही हा गंभीर आजार नियंत्रणात ठेवू शकता. बदामात प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटामीन, मॅग्नेशियम, जिंक आणि आयर्नसारखी पोषक तत्व असतात. (How can I lower my blood sugar quickly) म्हणूनच बदाम डायबिटीसच्या रुग्णांसाठी उत्तम मानला जातो. रात्री भिजवलेले बदाम सकाळी उपाशीपोटी खाण्याचा सल्ला दिला जातो. (How to lower blood sugar)

युरोपिन जर्नल ऑफ क्लिनिकल न्युट्रिशनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीनुसार जेवणाच्या ३० मिनिटं आधी २० ग्राम बदाम खाल्ल्यानं शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत होते. खासकरून  प्री डायबिटीक रुग्णांना याचा अधिक फायदा होतो. 
हे संशोधन भारतीय डॉक्टरांनी केले होते. (How to lower blood sugar) संशोधकांच्या म्हणण्यानुसार आशियाई भारतीयांमध्ये  प्री डायबिटीजबरोबर ग्लायसेमिक मापदंडांवर आधारी जेवणाआधी बदाम खाण्याच्या प्रभावावर पहिल्यांदाच  संशोधन करण्यात आलं.  बदाम कोणत्या पद्धतीनं ब्लड शुगर लेव्हल कमी करते आणि जेवणाआधी किती बदाम  खायला हवेत यावर हे संशोधन करण्यात आलं होतं. (Indian doctors claim in new study having 20 grams almonds before meal reduce blood sugar level)

संशोधकांच्यामते जर तुम्ही जेवणाआधी बदाम खात असाल तर जेवल्यानंतर ब्लड शुगर कमी होऊ शकते.  इंसुलिन, सी पेप्टाईड, ग्लूकागॉन लेव्हल सुधारण्यासह ग्लुकोज व्हॅरेबिलिटी आणि ग्लायसेमिक पॅरामीटरमध्येही सुधारणा होते. 

जेवण कमी केल्यानं वजन भराभर घटतं? स्लिम, फिट राहण्यासाठी तज्ज्ञ सांगतात की....

एका दिवसात किती बदाम खायला हवे?

अनेकांना सकाळी बदाम खायला आवडतात आणि दिवसातून ५-६ बदाम खाणे आवडते. या अभ्यासाच्या लेखिका डॉ. सीमा गुलाटी (सेंटर फॉर न्यूट्रिशन रिसर्च, नॅशनल डायबिटीज, ओबेसिटी आणि कोलेस्ट्रॉल फाऊंडेशन) आणि डॉ. अनूप मिश्रा  (फोर्टिस सीडीओसी हॉस्पिटल फॉर डायबिटीज अँड अलाईड सायन्सेसचे अध्यक्ष) त्यांनी दिवसभरात जेवणापूर्वी २० ग्रॅम किंवा १७-१८ बदाम खाण्याची शिफारस केली आहे. यात नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण समाविष्ट आहे.

शरीरातलं बॅड कोलेस्टेरॉल कमी करणारी भाजी, रोज खा-बीपी वाढण्याचा त्रासही होईल कमी

या अभ्यासात २७ पुरूष आणि ३३ महिलांचा समावेश होता. ज्यांना कोणत्या ना  कोणत्या कारणामुळे डायबिटीसचा धोका होता. आता ते प्री डायबिटीक श्रेणीत आहेत. संशोधकांना दिसून आलं की जेवणाआधी बदाम  खाल्ल्यानं  जेवणानंतरची साखरेची पातळी कमी झाली आहे. याशिवाय ब्लड ग्लूकोज, सीरम इंसुलिन, प्लाज्मा, ग्लूकागन आणि सीरम सी-पेप्टाईडमध्येही कमतरता दिसून आली.

Web Title: How to Lower Blood Sugar : Indian doctors claim in new study having 20 grams almonds before meal reduce blood sugar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.