Join us   

रोज कमीतकमी ‘इतकी’ पाऊलं चालली तर शुगर कमी होते, डायबिटीस कमी करण्यासाठी ७ टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 3:43 PM

How to Lower Blood Sugar Quickly : कोणते लाइफस्टाइल बदल केले म्हणजे आपली तब्येत ठणठणीत आणि डायबिटिस नियंत्रणात राहतो?

मधुमेह (Diabetes) हा एक गंभीर आणि असाध्य रोग आहे, जो निरोगी आहार आणि व्यायामानेच नियंत्रित केला जाऊ शकतो. रक्तातील साखरेच्या चढ-उतारामुळे मधुमेहाच्या रुग्णांना आरोग्याच्या अनेक गंभीर समस्यांचा धोका असतो. यामुळेच रुग्णांना चांगले जीवन जगता यावे यासाठी तज्ज्ञ मधुमेह नियंत्रणात ठेवण्याचा सल्ला देतात. (How to Lower Blood Sugar Quickly)  रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी डॉक्टर रुग्णांना काही औषधांचा सल्ला देतात. या आजाराशी लढण्यासाठी केवळ औषधांवर अवलंबून राहणे हा सर्वोत्तम मार्ग नाही. (Ayurveda remedies for Diabetes) आपल्या आहार आणि शारीरिक क्रियांसह आपण साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी काही घरगुती आणि आयुर्वेदिक उपायांवर देखील कार्य केले पाहिजे. (Diabetes Control Tips) आयुर्वेदिक डॉक्टर  दीक्षा भावसार तुम्हाला मधुमेहावरील आयुर्वेदिक उपाय सांगतात, जे सोपे, स्वस्त आणि सर्वात प्रभावी आहेत. या उपायांचा प्रयत्न केल्याने तुम्हाला तुमच्या (Blood Sugar Management) रक्तातील साखरेचे व्यवस्थापन अधिक चांगले करता येईल.

दुधीचं सूप

मधुमेहाच्या रूग्णांमध्ये रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी, दुधीचे सूप आठवड्यातून दोनदा नाश्ता किंवा रात्रीच्या जेवणानंतर घ्यायला हवं.  याशिवाय आवळा आणि हळद यांचे रोज सेवन करा. या पदार्थांचे सेवन टाळा .साखर, दही, तळलेले, आंबवलेले पदार्थ आणि  मैद्याचे पदार्थ मर्यादित ठेवा. अन्नात बेसन, नाचणी आणि ज्वारीचे पीठ वापरावे. याशिवाय  तुमच्या आहारात पालक, मेथी, टोमॅटो, कारले आणि शेंगा यासारख्या भाज्या आणि बेरी, सफरचंद, आवळा, पपई, डाळिंब, पपई, किवी या फळांचा समावेश करा.

योगा

मांडूकासन, शशांकासन, भुजंगासन, बालसन,धनुरासन ही योगासनं रोज करायला हवीत. याशिवाय कपालभाती, अनुलोम-विलोम असे प्राणायाम करा. दररोज किमान 5000 पावले किंवा जास्तीत जास्त 10,000 पावले चालण्याचा प्रयत्न करा.

जेवणाआधी

एक चमचा आवळा आणि एक चमचा हळद एका ग्लास पाण्यात मिसळून जेवणाच्या १ तास आधी प्या. रात्रीचे जेवण हलके ठेवा जसे बेसन/नाचणी/भाज्या , चीला, भाज्यांचे सूप, मसूरचे सूप इत्यादी. रात्रीच्या आहाराता घ्या.

घरात माणसं किती, तेल किती वापरता? स्वयंपाकासाठी वापरा ‘हे’ तेल वापरलं, हृदयाचे आजार राहतील दूर

पायी चाला

सकाळी ९ वाजण्यापूर्वी २० मिनिटे सूर्यप्रकाशात चाला. रोज किमान ४५ मिनिटे योगा आणि प्राणायाम करा. चालण्याने रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

तासंतास बसून काम करणाऱ्यांना जीवघेण्या हार्ट अटॅकचा धोका; तुम्हीपण आठ तासापेक्षा जास्त वेळ बसून काम करता?

काढा

मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी गुडुची/गिलोय घन वटी/ चा काढा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यायला हवा. ते केवळ रक्तातील साखर कमी करत नाहीत तर रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करतात.

टॅग्स : हेल्थ टिप्समधुमेह