उच्च रक्तदाब, वाढलेलं कोलेस्टेरॉल हे सारे चुकीची जीवनशैली, चुकीचा आहार किंवा अनुवांशिक समस्यांमुळे होऊ शकते. कारण काहीही असो,कोलेस्टेरॉल वाढणं आरोग्यासाठी घातक आहे. निरोगी राहायचे असेल तर कोलेस्ट्रॉलची पातळी कमी ठेवण्यावर भर द्यावा लागेल. (5 lifestyle changes to improve your cholesterol) तज्ज्ञांचे मत आहे की उच्च कोलेस्टेरॉलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो किंवा अरुंद होऊ शकतात. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि हृदयाशी संबंधित इतर आजारांचा धोका वाढू शकतो. (How to lower cholesterol)
कोलेस्टेरॉल कसे कमी करावे? (How To Control Cholesterol)
डॉक्टर आणि तज्ज्ञ सहमत आहेत की कोलेस्टेरॉल कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दररोज व्यायाम करणे आणि चरबी किंवा तेलकट पदार्थांचे सेवन कमी करणे. आता प्रश्न असा आहे की कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काय खावे? शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तुम्ही काही सप्लिमेंट्सची मदत घेऊ शकता. मेयो क्लिनिकच्या रिपोर्टनुसार यासाठी सर्वोत्तम पूरक आहार म्हणजे द्रव्यशील फायबर (soluble fiber)
फायबरचे दोन प्रकार आहेत. Insoluble fiber आणि Insoluble fiber. म्हणजेच पाण्यात विरघळणारे फायबर आणि पाण्यात न विरघणारे फायबर. पदार्थांमध्ये विरघळणारे फायबर कमी प्रमाणात आढळते आणि रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी सर्वात फायदेशीर आहे. खरं तर, सोल्यूबल फायबर पाचन तंत्रात कोलेस्टेरॉल-युक्त पदार्थांना बांधतात, ज्यामुळे ते रक्तप्रवाहात शोषले जाऊ शकत नाहीत. यामुळे तुमच्या शरीरात जास्त कोलेस्टेरॉल जमा होत नाही. यामुळेच फायबर रक्तात जमा होणारे खराब कोलेस्टेरॉल कमी करू शकते.
सोयाबीन, एवोकॅडो, बेरी, आळशीच्या बीया आणि ओट्स यांसारख्या पदार्थांमध्ये सोल्यूबल फायबर नैसर्गिकरित्या आढळू शकतात. यासाठी तुम्ही सप्लिमेंट्स देखील घेऊ शकता. जे लोक नियमितपणे विरघळणाऱ्या फायबर पदार्थांचे सेवन करू शकत नाहीत त्यांच्यासाठी पूरक आहार अधिक फायदेशीर आहे. अभ्यास दर्शविते की दररोज पाच ते 10 ग्रॅम किंवा अधिक फायबर तुमच्या रक्तातील एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करू शकतात.
सोल्यूबल फायबर सप्लिमेंट घेण्याव्यतिरिक्त, जीवनशैलीत बदल केल्याने मदत होऊ शकते. तुमच्या जेवणात आणि स्नॅक्समध्ये अधिक फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा प्राणी प्रथिने वनस्पती-आधारित पर्यायांसह बदला. नट, बिया, ऑलिव्ह ऑईल आणि एवोकॅडो या पदार्थांचा आहारात समावेश करा.