Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > किती पाणी प्यायल्यानं शरीरातलं बॅड कोलेस्टेरॉल कमी होतं? तज्ज्ञ सांगतात; हृदय निरोगी ठेवायचं तर..

किती पाणी प्यायल्यानं शरीरातलं बॅड कोलेस्टेरॉल कमी होतं? तज्ज्ञ सांगतात; हृदय निरोगी ठेवायचं तर..

How to lower cholesterol naturally without medication : रक्ताभिसरणात अडथळे येऊ नये म्हणून, दिवभरात किती लिटर पाणी पिणं गरजेचं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2024 11:59 AM2024-06-04T11:59:32+5:302024-06-04T12:02:34+5:30

How to lower cholesterol naturally without medication : रक्ताभिसरणात अडथळे येऊ नये म्हणून, दिवभरात किती लिटर पाणी पिणं गरजेचं?

How to lower cholesterol naturally without medication | किती पाणी प्यायल्यानं शरीरातलं बॅड कोलेस्टेरॉल कमी होतं? तज्ज्ञ सांगतात; हृदय निरोगी ठेवायचं तर..

किती पाणी प्यायल्यानं शरीरातलं बॅड कोलेस्टेरॉल कमी होतं? तज्ज्ञ सांगतात; हृदय निरोगी ठेवायचं तर..

व्यस्त लाईफस्टाईलमुळे सध्या अनेक गंभीर आजार शरीराभोवती विळखा घालत आहेत. खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयींमुळे शरीरातलं बॅड कोलेस्टेरॉल वाढत आहे (Bad Cholesterol). शरीरात दोन प्रकारचे कोलेस्टेरॉल आढळतात. खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे लोक हृदयाशी संबंधित आजारांना बळी पडतात (Health Tips). शिवाय रक्ताभिसरणातही अडचण निर्माण होऊ शकते. बॅड कोलेस्टेरॉल वाढले असेल तर, वेळीच नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला जीवनशैली आणि आहारात काही बदल करणं गरजेचं आहे(How to lower cholesterol naturally without medication).

आपण पाणी पिऊनही बॅड कोलेस्टेरॉलवर नियंत्रण मिळवू शकता. पण पाणी नेमकं कधी प्यावे? यामुळे हृदय कसे निरोगी राहील? कमी पाणी प्याल्याने बॅड कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते का? यासंदर्भात, आकाश हेल्थकेअरच्या कन्सल्टंट इंटर्नल मेडिसिन, डॉ नवनीत गिल यांनी माहिती दिली. 

कमी पाणी प्यायल्याने बॅड कोलेस्टेरॉल वाढू शकते?

पाणी हेच जीवन आहे. आपले शरीर हे ७० टक्के पाण्याने बनले आहे. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी प्यायलं हवं. कमी पाणी प्यायल्यामुळे बॅड कोलेस्टेरॉलच्या पातळीवर परिणाम होतो. जेव्हा आपण कमी पाणी पितो, तेव्हा साचलेली घाण शिरांमध्ये अडकून राहते, त्यामुळे खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने वाढते आणि हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यताही वाढते.

ICMR सांगते पाणी पिण्याची योग्य पद्धत; चुकीच्या पद्धतीने प्यायले तर हाडं होतील ठिसूळ आणि..

अधिक पाणी प्यायल्याने बॅड कोलेस्टेरॉल नियंत्रणात येईल

पाणी हा एक प्रकारचा डिटॉक्सिफायिंग एजंट आहे. ज्यामुळे एलडीएल कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइडचे प्रमाण नियंत्रणात राहते. यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉल अधिक प्रमाणात तयार होते. यामुळे बॅड कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवणं अश्यक होऊन जातं. त्यामुळे उत्तम आहारासोबत पाणी पीत राहणं गरजेचं आहे. याशिवाय आहारात फायबर आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करावा.

पोट, मांड्या-दंड थुलथुलीत दिसतात? 'इवल्याशा' बिया कमी करू शकतात तुमचं वजन..पण कसे?

पाणी हृदय निरोगी कसे ठेवते?

जास्त पाणी प्यायल्याने शरीरात रक्ताभिसरण सुधारते. दिवसभरात ३ ते ४ लिटर पाणी प्यायल्याने उच्च रक्तदाब आणि स्ट्रोक सारख्या आजारांपासून सरंक्षण होते, आणि हृदय निरोगी राहते. जर आपण हृदयरोगी असाल किंवा नसाल तरी देखील १.५ ते २ लिटर पाणी आपण प्यायला हवे.

Web Title: How to lower cholesterol naturally without medication

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.