कोलेस्टेरॉलची (Bad Cholesterol) समस्या सध्या वाढत चालली आहे. याला मुख्य जबाबदार बिघडलेली जीवनशैली आहे. एचडीएल कोलेस्टेरॉल जितकं शरीरासाठी गरजेचं आहे, तितकंच एलडीएल कोलेस्टेरॉल आरोग्यासाठी घातक ठरते. बॅड कोलेस्टेरॉल नसांमध्ये जाऊन चिटकते. जे नसा आकुंचित करतात, ज्यामुळे रक्त वाहून नेण्यात अडथळा निर्माण होतो. शिवाय हृदयाला पुरेसे रक्त मिळत नाही आणि हृदयाचे कार्य थांबते.
जर आपल्याला छातीत तीव्र वेदना होणे, प्रचंड थकवा, धाप लागणे यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर, समजून जा नसांमध्ये बॅड कोलेस्टेरॉल वाढत चालले आहे. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा यासारख्या समस्या उद्भवू शकतात. बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आपण पौष्टीक पदार्थांची मदत घेऊ शकता (Diet for Cholesterol). यासाठी आहारतज्ज्ञ लवनीत कौर यांनी सांगितलेल्या ५ पदार्थांचा आजच आहारात समावेश करा(How to Lower Cholesterol with Diet ).
बॅड कोलेस्टेरॉल कमी करणारे पदार्थ
- बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आपण आहारात बिन्स, डाळी, शेंगा यांचा समावेश करू शकता. या पदार्थांमध्ये सॉल्यूबल फायबरचे प्रमाण जास्त असते. फायबरमुळे पचनक्रिया सुधारते, ज्यामुळे नासांमधील बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. शिवाय त्यातील प्रोटीनमुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.
- सुकामेवा खाल्ल्याने बॅड कोलेस्टेरॉल कमी होते. सुका मेव्यामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स मुबलक प्रमाणात असतात. शिवाय त्यात मुबलक प्रमाणात एल-आर्जिनिन असते. हे एक प्रमुख अमीनो अॅसिड आहे. जे नायट्रिक ऑक्साईड तयार करण्यास मदत करतात. ज्यामुळे बॅड कोलेस्टेरॉल कमी होते.
- सफरचंद खाल्ल्याने बॅड कोलेस्टेरॉल कमी होते. सफरचंदांमध्ये पॉलिफेनॉल नावाची संयुगे असतात. ज्याचा कोलेस्टेरॉलच्या पातळीवर सकारात्मक प्रभाव पडतो.
- कच्चा लसूण खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी होतो आणि हृदयाचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत मिळते. लसणामध्ये एक यौगिक एलिसिन नावाचे घटक असते. जे बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात.
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फक्त बदाम पुरेसे नाहीत, जीवनशैलीत करा ४ सोपे बदल, मेंदू होईल तेज
- ओट्स खाल्ल्याने देखील उच्च कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहते. आपण नाश्त्यामध्ये एक वाटी ओट्स खाऊ शकता. यात १ ते २ ग्रॅम फायबर असते. त्यात केळी मिसळल्याने फायबरचे प्रमाण वाढते. ज्यामुळे बॅड कोलेस्टेरॉल कमी होते.