सांधे, गुडघेदुखी ही लक्षणं शरीरातील युरिक अॅसिड वाढल्याचे संकेत देतात. युरिक अॅसिड हा एक घातक पदार्थ असून प्युरिनयुक्त आहे. प्युरिनयुक्त पदार्थांचे अधिकाधिक सेवन केल्यानं रक्तात ते जमा होते. नंतर हळूहळू याचे स्टोनमध्ये रुपांतर होते. शरीरातील युरिक अॅसिड वाढल्यानं तुम्हाला गाऊड, किडनी स्टोन, हृदयाचे आजार आणि इतर गंभीर आजार होऊ शकतात. (How to lower uric acid)
डॉक्टर कपिल त्यागी यांनी एका हिंदी वेबसाईटशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे. त्यांच्यामते आयुर्वेदात या समस्येला वातरक्त असं म्हटलं जातं. जेव्हा ही समस्या उद्भवते तेव्हा वात आणि रक्त उतक वाढतात. या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काही आयुर्वेदीक उपाय करून पाहू शकता. (How to lower uric acid levels naturally)
युरिक अॅसिड वाढण्याची कारणं
कमी पाणी पिणं, अल्कोहोल घेणं, जास्त प्रमाणात प्रोटीन डाएट घेणं, अनुवांशिक कारण, हाय बीपीचा त्रास, लठ्ठपणा, थायरॉईड
कडुलिंब
डॉक्टरांच्यामते कडुलिंब प्रकृतीसाठी एक वरदान मानले जाते. ही जडीबूटी हाय युरिक अॅसिड कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. आयुर्वेदात कडुलिंबाचा वापर फक्त युरिक अॅसिडच नाही तर अनेक आरोग्य समस्यांच्या उपचारांसाठी गुणकारी मानला जातो. कडूलिंबाच्या पानांची पेस्ट तयार करा. ही पेस्ट सूज आणि वेदना जाणवत असलेल्या ठिकाणी लावा. कडुलिंबाच्या गोळ्या सांधेदुखी आणि सूज कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
गूळवेल
युरिक अॅसिड कमी करण्यासाठी गूळवेळ उत्तम आयुर्वेदीत औषधी वनस्पतींपैकी आहे. ही जडी-बूटी फक्त शरीरातील वाढलेलं युरिक एसिडच कमी करत नाहीत तर वात आणि गाऊटची समस्याही कमी करते. रोज एक ग्लास गुळवेलाचा जूस प्यायल्यास शरीरातील युरिक अॅसिड कमी होण्यास मदत होईल. यामुळे सांध्याची सूज कमी होण्यास मदत होते.
हळद
हळदीचा वापर मसाल्यांच्या स्वरूपात केला जातो. हा एक आयुर्वेदीक मसाला आहे. ज्यामुळे शरीरातील बऱ्याचश्या समस्या टळतात. यातील एंटी इंफ्लेमेटरी गुणांमुळे सांधेदुखीच्या वेदना कमी होतात. हळदीची पेस्ट सुजलेल्या सांध्यांवर लावा ज्यामुळे वेदना आणि सूज कमी होईल. युरिक अॅसिड कमी करण्यासाठी स्वयंपाक करताना जास्तीत जास्त हळद घाला. याऐवजी तुम्ही हळदीचे दूधही पिऊ शकता.