Join us   

हाडांमध्ये जमा झालेलं युरीक ॲसिड बाहेर काढेल १ पदार्थ: नियमित खा, किडनी स्टोनही टळेल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2023 10:40 AM

How to lower uric acid levels naturally : युरीक ॲसिड वाढल्यानं गंभीर गाऊटच्या समस्या उद्भवतात इतकंच नाही तर किडनी स्टोनही होऊ शकतो. चांगल्या आरोग्यासाठी हा कचरा शरीराच्या बाहेर वेळीच फेकला जाणं गरजेचं आहे.

युरीक ॲसिडचं प्रमाण वाढणं ही एक गंभीर आरोग्याची (High Uric Acid Level)  समस्या असू शकते. प्युरिनयुक्त पदा्र्थांच्या अतिसेवनानं युरीक ॲसिड वाढतं. किडनी मुत्राच्या माध्यमातून शरीरातील कचरा बाहेर फेकते. तेव्हा हे कार्य व्यवस्थित होत नाही तेव्हा शरीरात जमा होते आणि  सांध्यांमध्ये एकत्र होते. युरीक ॲसिड वाढल्यानं गंभीर गाऊटच्या समस्या उद्भवतात इतकंच नाही तर किडनी स्टोनही होऊ शकतो. चांगल्या आरोग्यासाठी हा कचरा शरीराच्या बाहेर वेळीच फेकला जाणं गरजेचं आहे. (How to lower uric acid levels naturally)

युरीक ॲसिड कसं कमी करायचं?

युरीक ॲसिड कमी करण्यासाठी प्युरिनयुक्त पदार्थांचे सेवन टाळायला हवे. डॉक्टर कपिल त्यागी यांनी एका हिंदी वेबसाईटशी बोलताना गुळवेल युरीक ॲसिड कमी करण्यास कसा फायदेशीर ठरू शकतो याबाबत सांगितले आहे. युरीक ॲसिड कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारची औषध घेतात.जर तुम्हाला या समस्येचा कौटुंबिक इतिहास असेल तर गुळवेलाच्या वापरानं ही समस्या तुम्ही सहज सोडवू शकता.

हाय युरीक ॲसिडवर रामबाण उपाय

गुळवेल आयुर्वेदातील एक शक्तीशाली आणि प्रभावी औषध आहे. याला गुडूची असंही म्हणतात. याच्या वापरानं रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत होते. याशिवाय गाऊट म्हणजे युरीक ॲसिडही कमी होते. अनेक संशोधनातून असं समोर आलं आहे की गुळवेलाचा रस  गाऊटच्या उपचारांसाठी प्रभावी आहे.

उन्हाळ्यात रोज दही खाताय? ३ त्रास असतील तर चुकूनही दही खाऊ नका, खवळेल पित्त-बिघडेल पोट

कारण यामुळे शरीरातील वाढलेली युरीक ॲसिड कमी होण्यास मदत होते. गुळवेलाचे असंख्य फायदे आहेत. २०१७ मध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार गुळवेलातून निघालेला रस अत्यंत प्रभावी असतो. यामुळे शरीरातलं युरिक एसिड कमी होण्यास मदत होते.

वजन कमी करायचं पण व्यायाम नको वाटतो? १० टिप्स, डाएट-जीमशिवाय स्लिम दिसाल

गुळवेलात एंटी इंफ्लेमेटरी, एंटी ऑक्सिडेंट्स, एंटी-स्पास्मोडिक, एंटी-एलर्जिक, एंटी-एचआईवी आणि एंटीकॅन्सर गुणधर्म  असतात. यात प्रोटीन, कॅल्शियम आणि फॉस्फरसही असते. या पानांचा रस फ्लेवोनोइड्स, अल्कलॉइड्स आणि ग्लायकोसाईट्सनी परिपूर्ण असतो.

गुळवेलाचा रस बनवण्यासाठी  ताजी पानं काढून रात्रभर पाण्यात भिजवून  ठेवा. सकाळी ही पानं वाटून पाण्यात घाला.  १ ग्लास पाणी अर्ध  होईपर्यंत उकळा आणि नंतर गाळून या पाण्याचे सेवन करा. याशिवाय रोज कमीत कमी ४५ मिनिटं व्यायाम करा, दिवसभरात भरपूर पाणी प्या, रात्री जेवल्यानंतर भरपूर प्रमाणात पाण्याचे सेवन करा. रात्रीच्या जेवणात डाळी, शेंगा, गव्हाचा समावेश करा. हलका आहार घ्या. आंबट फळं जसं की आवळा, जांभळाचे सेवन करा. 

टॅग्स : हेल्थ टिप्सफिटनेस टिप्सआरोग्य