Join us   

बॅड कोलेस्टेरॉल होईल कमी, हार्ट ब्लॉकेज होण्याचा धोका कमी, फक्त रोज ३० मिनिटं १ काम करा..

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 1:07 PM

How to lower your cholesterol : फॅट्सयुक्त पदार्थांचे अधिक सेवन केल्यानं आणि फिजिकल एक्टिव्हीजच्या अभावानं कोलेस्टेरॉल वाढत जातं.

कोलेस्टेरॉल वाढणं ही सध्या गंभीर समस्या बनली आहे. हार्ट डिसिज, हार्ट अटॅक, हार्ट स्ट्रोकसह अनेक गंभीर जीवघेणे आजार यामुळे होतात. नसांमध्ये मेणयुक्त पदार्थ भरल्यानंतर कोलेस्टेरॉल जमा होतं. असं मानलं जातं की, रोज व्यायाम केल्यानं घाणेरडं कोलेस्टेरॉल बाहेर पडण्यास मदत होते. (How to lower your cholesterol)

फॅट्सयुक्त पदार्थांचे अधिक सेवन केल्यानं आणि फिजिकल एक्टिव्हीजच्या अभावानं कोलेस्टेरॉल वाढत जातं. यामुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होतात. याच कारणानं हृदयाचे आजार, स्ट्रोकचे त्रास उद्भवतात. कोलेस्टेरॉल लेव्हल कमी करण्यासाठी रोज व्यायाम केल्यानं तुम्ही या समस्येपासून आराम मिळवू शकता. (Top 5 lifestyle changes to improve your cholesterol)

मेयो क्लिनिकनुसार रोज व्यायाम केल्यानं कोलेस्टेरॉल लेव्हल सुधारण्यास मदत होते. आठवड्यातून  ५ दिवस ३० मिनिटं मॉडरेट फिजिकल एक्टिव्हीटी केल्यानं कोलेस्टेरॉल लेव्हल कमी होण्यास मदत होते. याव्यतिरिक्त आठवड्यातून ३ वेळा २० मिनिट एरोबिक एक्टिव्ही केल्यानं कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. 

१) रोज जॉगिंग केल्यानं कोलेस्टेरॉल कमी होऊन वजन कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते.  रोज काही पाऊल चालूनही तुम्ही कोलेस्टेरॉल कमी करू शकता. यामुळे ब्लड प्रशरही नियंत्रणात राहतं. 

वजन घटवण्यासाठी भात कशाला सोडता? 'या' पद्धतीनं भात शिजवा, अजिबात वाढणार नाही वजन

२) पोहणे हा सर्वात मजेदार व्यायाम मानला जातो. हा एक एरोबिक व्यायाम आहे, जो कोलेस्टेरॉल कमी करण्यास उपयुक्त आहे.  शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की दररोज पोहण्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यासोबतच वजन कमी होण्यास मदत होते.

३) हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी एरोबिक व्यायाम हा सर्वोत्तम पर्याय आहे, परंतु काही संशोधन असे सूचित करतात की उच्च कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रक्तातील LDL (खराब कोलेस्टेरॉल) कमी करण्यास देखील मदत करू शकते.

४) कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आणि हृदयविकारांपासून दूर राहण्यासाठी सायकलिंगपेक्षा चांगले  काय असू शकते. औषधांशिवाय कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल तर सायकलिंग करायला हवं. जॉगिंग सारख्याच कॅलरीज सायकल चालवल्याने बर्न होतात.

५) जर तुम्हाला कार्डिओ आवडत नसेल तर तुमच्यासाठी कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी योग हा सर्वोत्तम पर्याय आहे. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचे फायदे मिळविण्यासाठी तुम्हाला तुमची हृदय गती वाढवणे आवश्यक आहे आणि योगामुळे ते सोपे होते. यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारून झोपही चांगली लागते. 

टॅग्स : हेल्थ टिप्सफिटनेस टिप्स