Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दातांवर चिकट-पिवळा थर दिसतो? या खास पद्धतीने घरीच करा दंतमंजन, दात चमकतील

दातांवर चिकट-पिवळा थर दिसतो? या खास पद्धतीने घरीच करा दंतमंजन, दात चमकतील

How to Make Ayurvedic Teeth Whitening Powder At Home : कडुलिंबात एंटी बॅक्टेरिअल गुण असतात ज्यामुळे प्लाकपासून लढण्यात मदत होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 09:18 PM2024-06-06T21:18:45+5:302024-06-06T21:27:57+5:30

How to Make Ayurvedic Teeth Whitening Powder At Home : कडुलिंबात एंटी बॅक्टेरिअल गुण असतात ज्यामुळे प्लाकपासून लढण्यात मदत होते.

How to Make Ayurvedic Teeth Whitening Powder At Home How To Rid Of Yellow Teeth | दातांवर चिकट-पिवळा थर दिसतो? या खास पद्धतीने घरीच करा दंतमंजन, दात चमकतील

दातांवर चिकट-पिवळा थर दिसतो? या खास पद्धतीने घरीच करा दंतमंजन, दात चमकतील

सतत चहा, कॉफी प्यायल्याने दातांवर पिवळा, पांढरा थर येत असतो. (Health Tips) वेळेसह दातांवर पिवळा थर टार्टर आणि प्लेक तयार होते.  ज्यामळे दात पिवळे होतात आणि दात किडायला सुरूवात होते. टार्टर जेव्हा दातांमध्ये शिरतं तेव्हा दात कमकुवत होतात. तोंडातून दुर्गंधही येतो.(How to Make Ayurvedic Teeth Whitening Powder At Home)

दात पिवळे झाल्यामुळे चारचौघात लाज वाटते. दातांची व्यवस्थित स्वच्छता न ठेवल्यास पायरियासारख्या गंभीर समस्या उद्भवतात. यामुळे पोटाचे आजारही होऊ शकतात. बाजारात दात चमकवण्यासाठी वेगवेगळी महागडी उत्पादनं आहेत ज्याचा खास उपयोग होत नाही  यात काही धोकादायक केमिकल्स असतात. 

मुलांवर अपेक्षांचे ओझं घालण्यापेक्षा १ गोष्ट करा; यशस्वी होतील मुलं-विकास दिव्यकिर्तींचा सल्ला

पिवळे दात पांढरे करण्यासाठी उपाय

कपिल त्यागी आयुर्वेद क्लिनिकचे डायरेक्टर सांगतात की, दातांना चमकवण्यासाठी बाजारातील आयुर्वेदीक दंत मंजनचा वापर करू शकता. याचे कोणतेही  साईड इफेक्टस दिसत नाहीत. 

घरात आयुर्वेदीक दंत मंजन कसे बनवायचे?

डॉक्टरांच्या मते घरात आयुर्वेद दंत मंजन तयार करण्यासाठी पारंपारीक आयुर्वेदीक टूथ पावडरचा वापर करा. जडीबूटी, मसाले किंवा खनिजांमध्ये हे मिश्रण असते. ज्यामुळे दात स्वच्छ करण्यास मदत होते आणि हिरड्या मजबूत होतात.

कंबर दुखते-हाडं ठणकतात; ICMR सांगते १० रूपयांत कॅल्शियम देणारे ५ पदार्थ खा, हाडं बळकट होतील

दंत मंजन बनवण्यासाठी काय लागते?

१)  कडुलिंबाची पावडर - २ मोठे चमचे

२) बाभळीची पावडर - २ मोठे चमचे

३) त्रिफळा पावडर - १ मोठा चमचा

४)  लवंगाची पावडर- १ छोटा चमचा

५) मुलेठी पावडर - १ मोठा चमचा

६) सैंधव मीठ - १ छोटा चमचा

७) बेकींग सोडा - १ छोटा चमचा

८)  पुदिना इसेंशियल ऑईल- ४ ते ५ थेंब

दंत मंजन कसे बनवावे?

१) सर्व पदार्थांची पावडर बारीक वाटून घ्या आणि सुकू द्या. त्यानंतर सर्व तुम्हाला कोणत्याही स्टोअरमध्ये किंवा ऑनलाईन उपलब्ध होईल. अन्यथा तुम्ही कच्च्या मसाल्यांचा वापर करून मिक्सरमध्ये बारीक करू शकता. 

केस धुताना खूप तुटतात? जावेद हबीबची केस धुण्याची खास पद्धत पाहा, शॅम्पू न लावता होतील दाट केस

२) एका वाटीत कडुलिंबाची पावडर, बाभळीची पावडर, त्रिफळा पावडर, लवंगाची पावडर, मुलेठी पावडर, सैंधव मीठ आणि बेकींग सोडा मिसळा. चव आणि अतिरिक्त रोगाणू नाशक गुणांसाठी पेपरमिंट इसेंशियल तेलाचे काही थेंब घालून व्यवस्थित मिसळा.

१ महिना साखर खाणं बंद करा; शरीरात दिसतील ५ आश्चर्यकारक बदल; पाहा साखर न खाल्ल्याने काय होतं

३) मिश्रण एका घट्ट एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवा. जेणेकरून ते ताजं राहील. ब्रश व्यवस्थित ओला करा. त्यानंतर पावडरमध्ये बुडवा नंतर नेहमीप्रमाणे दातांना ब्रश करा, दुसरीकडे थोडं पावडर आपल्या हातांवर ठेवा ही पेस्ट तयार करण्यासाठी त्यात पाण्याचे काही थेंब घाला नंतर याचा वापर दातांवर ब्रश करण्यासाठी करा.

४) कडुलिंबात एंटी बॅक्टेरिअल गुण असतात ज्यामुळे प्लाकपासून लढण्यात मदत होते. बाभळीमुळे दात मजबूत राहतात. त्रिफळामुळे आरोग्याला बरेच फायदे मिळतात, दातदुखीच्या वेदनांपासून आराम मिळतो, यात एंटीबॅक्टेरिअल गुण असतात, मुलेठीमुळे सूज कमी होते आणि बॅक्टेरियांशी लढण्यासही मदत होते. सैंधव मिठात प्राकृतिक स्वच्छता करणारे गुण असतात, बेकींग सोडा दात चमकवण्यास मदत करतो. पुदिन्याच्या तेलात एंटी बॅक्टेरिअल  गुण असतात.

Web Title: How to Make Ayurvedic Teeth Whitening Powder At Home How To Rid Of Yellow Teeth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.