काहीवेळा खूप तेलकट, मसालेदार हेव्ही पदार्थ खाल्ल्यावर आपल्याला पोटदुखीचा त्रास होतो. इतकंच नाही तर कधी जास्त जेवल्यानंतरही आपल्याला अपचन, आंबट ढेकर, ॲसिडिटी यांसारखे प्रॉब्लेम्स होतात. खालेल्या अन्नाचे पाचन व्यवस्थित झाले नाही तर पोटासंबंधित अनेक आजार होतात. अचानक अशी ॲसिडिटी झाल्याने अस्वस्थ होणं, डोकं दुखणं, मळमळणं हे सगळे त्रास हल्ली बहुतांश लोकांना सहन करावे लागतात. या सगळ्या गोष्टींचा भरपूर त्रास होऊ लागला की आपण लगेचच गोळी घेऊन वेळ मारून नेतो. पण असं छोट्या - मोठ्या कारणांसाठी वारंवार गोळ्या घेण्यापेक्षा हा सोपा उपाय करणं नक्कीच फायद्याचं ठरेल.
कोणताही त्रास होत असेल तर तो खूप काळ अंगावर काढू नये, हे अगदी खरंय. पण मग त्या त्रासावर लगेचच्या लगेच औषध गोळ्या घेणंही घातकच.. म्हणूनच जर अपचन, आंबट ढेकर, ॲसिडिटीचा त्रास (Indigestion: Best Home Remedies To Treat Your Stomach Woes Naturally) होत असल्यास कोणतीही औषधं घेण्यापेक्षा(How to Treat Indigestion at Home) हा घरगुती उपाय करणे फायदेशीर ठरेल. किरकोळ अपचन व ॲसिडिटीसाठी, स्वयंपाक घरातील काही पदार्थ खाल्ले जाऊ शकतात. धणे, जिरे, ओवा, सुंठ पावडर हे पदार्थ पोटाच्या (Indian Digestive Candy) अनेक समस्या दूर करण्यासाठी प्रभावी असतात. तसेच अपचन, आंबट ढेकर, ॲसिडिटी, पोटांत जळजळ होण्याची समस्याही दूर होते. या समस्या दूर करण्यासाठी आपण घरच्या घरी पाचक गोळ्या (Pachak Goli)बनवून ठेवू शकतो(How To Make Homemade 'Digestive Goli' For Stomach Problems).
साहित्य :-
१. धणे - ४ टेबलस्पून २. जिरे - १ टेबलस्पून ३. ओवा - १/२ टेबलस्पून ४. सिट्रिक ऍसिड - १/४ टेबलस्पून ५. सुंठ पावडर - १ टेबल्स्पून ६. काळे मीठ - १ टेबलस्पून ७. सैंधव मीठ - १ टेबलस्पून ८. आवळा पावडर - १ टेबलस्पून ९. गूळ - १/४ कप
कृती :-
१. सर्वप्रथम एका पॅनमध्ये धणे, जिरे, ओवा घेऊन त्याचा गंध येईपर्यंत ते मंद आचेवर हलके परतून घ्यावे. २. हे परतून घेतलेले सगळे जिन्नस आता थोडे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यावेत. ३. परतून घेतलेले हे सगळे जिन्नस थंड झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात सिट्रिक ऍसिड, सुंठ पावडर, काळे मीठ, सैंधव मीठ, आवळा पावडर घालून सगळे जिन्नस मिक्सरमध्ये बारीक पूड होईपर्यंत वाटून घ्यावे.
आजीच्या हातच्या सुंठगुळाच्या गोळ्या आठवतात ? घशाची खवखव - खोकला दूर राहण्याचा उपाय...
४. त्यानंतर एका पॅनमध्ये बारीक किसून घेतलेला गूळ घेऊन तो संपूर्णपणे वितळेपर्यंत मंद आचेवर गरम करुन घ्यावा. ५. आता या वितळलेल्या गुळाच्या मिश्रणात तयार करुन घेतलेली बारीक पूड घालावी. ६. वितळलेल्या गुळाच्या पाकामध्ये ही पावडर घालूंन ती चमच्याने ढवळून घ्यावी. ७. आता या मिश्रणाचे लहान - लहान मध्यम आकाराचे गोलाकार गोळे करुन घ्यावेत.
आपली घरगुती पाचक गोळी खाण्यासाठी तयार आहे. अपचन, आंबट ढेकर, ॲसिडिटी यांसारखे प्रॉब्लेम्स दूर करण्यासाठी आपण ही गोळी जेवणानंतर खाऊ शकतो.