Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > ओरल हेल्थसाठी महागडे माऊथवॉश कशाला? फक्त ३ मसाल्यांचे पदार्थ, स्वस्तात-मस्त माऊथवॉश रेडी...

ओरल हेल्थसाठी महागडे माऊथवॉश कशाला? फक्त ३ मसाल्यांचे पदार्थ, स्वस्तात-मस्त माऊथवॉश रेडी...

Natural Mouthwash You Can Prepare At Home : Making a Natural Mouthwash Recipe With Indian Spices : Best & Easy Homemade Natural Mouthwash : How To Make Natural Homemade Mouthwash At Home : मसाल्यांच्या पदार्थातील तीन खास पदार्थ वापरून घरच्याघरीच करा होममेड माऊथवॉश...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2024 16:21 IST2024-12-30T16:19:51+5:302024-12-30T16:21:46+5:30

Natural Mouthwash You Can Prepare At Home : Making a Natural Mouthwash Recipe With Indian Spices : Best & Easy Homemade Natural Mouthwash : How To Make Natural Homemade Mouthwash At Home : मसाल्यांच्या पदार्थातील तीन खास पदार्थ वापरून घरच्याघरीच करा होममेड माऊथवॉश...

How To Make Natural Homemade Mouthwash At Home Making a Natural Mouthwash Recipe With Indian Spice Best & Easy Homemade Natural Mouthwashs | ओरल हेल्थसाठी महागडे माऊथवॉश कशाला? फक्त ३ मसाल्यांचे पदार्थ, स्वस्तात-मस्त माऊथवॉश रेडी...

ओरल हेल्थसाठी महागडे माऊथवॉश कशाला? फक्त ३ मसाल्यांचे पदार्थ, स्वस्तात-मस्त माऊथवॉश रेडी...

आरोग्याची काळजी घेताना ओरल हेल्थची देखील तितकीच काळजी घेतली पाहिजे. तोंडाची दुर्गंधी, पिवळे दात एकूणच संपूर्ण ओरल हेल्थ चांगली राहावी म्हणून आपण माऊथवॉशचा वापर करतो. ओरल हेल्थ (Natural Mouthwash You Can Prepare At Home) चांगली ठेवण्यासाठी फक्त ब्रश (Making a Natural Mouthwash Recipe With Indian Spices) करणंच पुरेसं नसत, ओरल हेल्थकडे दुर्लक्ष झाल्यास तोंडात हानिकारक जिवाणू तयार होतात. यामुळे दात आणि हिरड्यांच आरोग्य बिघडत. ओरल हेल्थ सांभाळण्यासाठी ब्रश करण्यासोबतच थोडी अधिक काळजी घेण आवश्यक असत(How To Make Natural Homemade Mouthwash At Home)

ओरल हेल्थची काळजी घेताना माऊथवॉशचा वापर अगदी सगळेच करतात. आपण शक्यतो माऊथवॉश विकतच आणतो. परंतु बाहेर विकत मिळणारे माऊथवॉश केमिकल्सयुक्त आणि फार महागडे असते. यासाठीच, हे माऊथवॉश (Best & Easy Homemade Natural Mouthwash) मेडिकलमध्ये विकत मिळत असले तरी घरातल्या नैसर्गिक पदार्थांचा वापर करुन माऊथवॉश स्वस्तात तयार करता येऊ शकते. घरच्याघरीच उपलब्ध असणाऱ्या मसाल्यांच्या पदार्थातील तीन खास पदार्थांचा वापर करून आपण हे नॅचरल माऊथवॉश तयार करु शकतो. नॅचरल माऊथवॉश घरी कसे तयार करावे ते पाहूयात. 

साहित्य :- 

१. पाणी - २ ग्लास 
२. चक्रफुल - २ ते ३
३. दालचिनी - २ काड्या 
४. लवंग - ८ ते १० लवंग

हिवाळ्यात आंघोळ करताना करू नका 'ही' चूक, येईल हार्ट अ‍ॅटॅक, पाहा आंघोळ करण्याची योग्य पद्धत...


थंडीत स्किन कोरडी - डल दिसतेय ? स्किन प्रोबेल्म्स होतील दूर, वापरा विंटर स्पेशल 'हा ' फेसपॅक...

कृती :- 

१. एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात मसाल्यांच्या पदार्थातील चक्रफुल, दालचिनी, लवंग घालावी. 
२. आता ५ ते १० मिनिटे हे पाणी उकळवून घ्यावे. 
३. पाणी उकळत असताना त्यावर झाकण ठेवावे. 
४. पाणी उकळवून झाल्यावर गॅस बंद करून रात्रभर किंवा किमान ६ ते ७ तास हे सगळे मिश्रण पाण्यांत असेच ठेवून द्यावे. 
५. त्यानंतर हे पाणी एका काचेच्या बाटलीत भरून स्टोअर करून ठेवावे. 

अशाप्रकारे आपण घरगुती मसाल्यांचा वापर करून घरच्याघरीच अगदी स्वस्तात केमिकल्स फ्री नॅचरल माऊथवॉश तयार करु शकतो. 

हा नॅचरल माऊथवॉश वापरण्याचे फायदे... 

१. चक्रफुल :- चक्रफुलामध्ये अँटिसेप्टिक आणि अँटीमायक्रोबियल गुणधर्म असतात. जे दातांवरील पिवळा थर कमी करण्यासाठी उपयोगी ठरते. 

२. दालचिनी :- तोंडाची दुर्गंधी आणि दातांच्या चांगल्या आरोग्यासाठी दालचिनी वापरणे फायदेशीर ठरते. 

३. लवंग :- तोंडातील प्लाक, हिरड्यांना आलेली सूज आणि तोंडातील बॅक्टेरिया कमी करुन ओरल हेल्थ चांगली राखण्यासाठी लवंग उपयोगी ठरते.

Web Title: How To Make Natural Homemade Mouthwash At Home Making a Natural Mouthwash Recipe With Indian Spice Best & Easy Homemade Natural Mouthwashs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.