Join us   

जेवणाच्या अर्धा तास आधी १ काम करा; शुगर अजिबात वाढणार नाही-डायबिटीस कंट्रोलमध्ये राहील

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 2:48 PM

How to Manage Blood Sugar : नाश्ता किंवा जेवताना निष्काळजीपणा केला किंवा जेवणाच्या वेळा चुकवल्या तर तब्येतीवर गंभीर परिणाम होऊ शकतो.

डायबिटीस ही एक कॉमन मेडिकल कंडिशन आहे. या आजारात खाण्यापिण्याची फार काळजी घ्यावी लागते. नाश्ता किंवा जेवताना निष्काळजीपणा केला किंवा जेवणाच्या वेळा चुकवल्या तर तब्येतीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. यात  स्वादूपिंडात कमी प्रमाणात साखर तयार होते. (Easy Ways You Can Reduce Blood Sugar Spikes After Meals) अशा स्थितीत रक्तातील ग्लुकोजचा स्तर वाढतो. जेवल्यानंतर अचानक ब्लड शुगर लेव्हल वाढते असा त्रास अनेकांना जाणवतो. जेवल्यानंतर अर्ध्या तासाने तुम्ही एक छोटंसं काम केलं तर हा त्रास टाळता येऊ शकतो. (Simple Ways to Better Control Blood Sugar After Eating)

खाण्याच्या अर्धा तास आधी हे काम करा

अनेक डायटिशयन्स सल्ला देतात की खाण्याच्या अर्धा तासआधी बदामाचे सेवन केले तर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. असं केल्याने ग्लुकोज लेव्हलसुद्धा नियंत्रणात राहते. डायबिटीसच्या रुग्णांचा त्रास कमी होतो. म्हणून दररोज जवळपास  २० ग्राम बदाम खायला हवेत. 

बदाम खाण्याचा सल्ला का दिला जातो?

भारतातील बरेच लोक हाय शुगर, हाय फॅट आणि हाय कार्बोहायडेट असलेले पदार्थ खाणं पसंत करतात. ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढते. अशा स्थितीत बदाम फायदेशीर ठरू शकतात. यात मोनोअनसॅच्युरेडेट फॅटी एसिड्स असतात. यात फायबर्स आणि प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असते.

ऐन तारुण्यात गुडघे-कंबर दुखते! स्वस्तात मस्त प्रोटीन देणारा १ पदार्थ, रस्त्यावर मिळेल १० रुपयांत वाटा

 जास्तीत जास्त डायटिशियन डायबिटीसच्या रुग्णांना परफेक्ट प्री-मील डाएटचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात.काहीही आवडीचे खाल्ल्यानंतर शुगर वाढते हा त्रास हमखास जाणवतो शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी लाईफस्टाईलमध्ये आणि खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये काही प्रमाणात बदल केला तर आरोग्य चांगले राहील. 

डायबिटीसच्या रुग्णांनी अधिक प्रमाणात मीठाचे सेवन करू नये. डायबिटीस रुग्णांचे कोल्ड्रींक्स प्यायल्याने नुकसान होऊ शकते म्हणून साखरयुक्त पेयांचा आहारात समावेश करू नये. कमीत कमी साखर खा, आईस्क्रीम आणि टॉफीजचे अतिसेवन करू नये.

रोज नाश्त्याला काय खाता? माधुरीचे पती डॉ. नेने सांगतात नाश्ता करण्याच्या ५ टिप्स- निरोगी राहाल

जास्त प्रमाणात जंड फूड आणि तेलकट पदार्थ खाल्ल्याने शुगर वाढण्याचा धोका असतो. पोस्ट मील शुगर स्पाईकची समस्या टाळण्यासाठी तुम्ही  एकाचवेळी जास्त न खाता थोड्या थोड्या भागात खा. ओव्हर इटींग करू नका. यामुळे शुगर स्पाईक होते. जर तुम्ही  एकाचवेळी जास्त न खाता हळूहळू थोड्या थोड्या भागात खाल्लं तर शुगर लेव्हल नियंत्रणात राहील.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स