Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > फराळ पाहून तोंडाचा ताबा सुटतो? तळलेले पदार्थ खाण्यापूर्वी लक्षात ठेवा ५ गोष्टी; पोट बिघडणारच नाही

फराळ पाहून तोंडाचा ताबा सुटतो? तळलेले पदार्थ खाण्यापूर्वी लक्षात ठेवा ५ गोष्टी; पोट बिघडणारच नाही

How To Manage Digestive Problems Post Diwali : मिठाई - फराळ खाऊन पोट बिघडण्याची भीती वाटते? ५ गोष्टी करा - निश्चिंत राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2024 05:21 PM2024-10-29T17:21:18+5:302024-10-29T17:22:52+5:30

How To Manage Digestive Problems Post Diwali : मिठाई - फराळ खाऊन पोट बिघडण्याची भीती वाटते? ५ गोष्टी करा - निश्चिंत राहा

How To Manage Digestive Problems Post Diwali | फराळ पाहून तोंडाचा ताबा सुटतो? तळलेले पदार्थ खाण्यापूर्वी लक्षात ठेवा ५ गोष्टी; पोट बिघडणारच नाही

फराळ पाहून तोंडाचा ताबा सुटतो? तळलेले पदार्थ खाण्यापूर्वी लक्षात ठेवा ५ गोष्टी; पोट बिघडणारच नाही

दिवाळी म्हटलं की फराळ खाणं आलंच (Diwali faral). शिवाय मिठाईही आपण दाबून खातो (Diwali Sweets). दिवाळीआधी आणि दिवाळीनंतर आपण डाएट, पथ्य बाजूला ठेवून, मिठाईचा आस्वाद लुटतो. कितीही जिभेवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न केला तरी, आपले हात आपोआप मिठाई आणि फराळाकडे वळतात. पण जास्त प्रमाणात खाल्ल्याने तब्येत बिघडू शकते. शिवाय आरोग्याचेही नुकसान होऊ शकते.

अशावेळी हेल्दी पदार्थ खाऊनही ते व्यवस्थित पचत नाही. मुख्य म्हणजे मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाल्ल्याने गॅस्ट्रिकची समस्या निर्माण होते. यामुळे खराब पचन, आम्लपित्त, गॅस, बद्धकोष्ठता, पोट आणि छातीत जळजळ, उलट्या आणि जुलाब इत्यादी स्मास्या छळतात. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विविध औषधांचा वापर आपण करत असतो. पण औषधांचा वापर न करता आपण गॅस्ट्रिकच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता(How To Manage Digestive Problems Post Diwali).

दिवाळीतील पदार्थ खाल्ल्यानंतर गॅस्ट्रिकचा त्रास होऊ नये म्हणून..

तेलकट पदार्थ खाणं टाळा

दिवाळीत जास्त तेलकट पदार्थ खाणं टाळा. हिवाळ्यात जास्त तेलकट पदार्थ खाल्ल्याने गॅस्ट्रिकचा त्रास होऊ शकतो. शिवाय वजनही वाढतं. अपचनामुळे हेल्दी पदार्थ खाऊनही व्यवस्थित पचत नाही. त्यामुळे नाश्ता किंवा रात्रीच्या वेळेस जास्त तेलकट पदार्थ खाणं टाळा.

फायबर

आपल्या आहारात फायबर समृद्ध पदार्थांचा समावेश करा. जेणेकरून पचनक्रिया सुरळीत होईल. तुमचं पोट अचानक भरल्यासारखं वाटणार नाही. जेवणासोबत आपण फायबर समृद्ध सॅलडही खाऊ शकता.

हातापायांच्या काड्या पण पोट मात्र खूप सुटलंय? ५ सोप्या टिप्स, शरीर सुडौल -पोट होईल कमी

जास्त पाणी प्या

शरीराला हायड्रेट ठेवा. जास्त पाणी प्या. दररोज निदान ३-४ लिटर पाणी अवश्य प्या. यामुळे पचनक्रियेत अडथळे येणार नाही.

व्यायाम करा

गॅस्ट्रिकची समस्या टाळण्यासाठी नियमित व्यायाम करायला हवे. व्यायाम आणि योगासना करत राहा. यामुळे खाल्लेलं व्यवस्थित पचेल.

थुलथुलीत पोट होईल सपाट - बॅड कोलेस्टेरॉलही येईल नियंत्रणात; फक्त रोज चमचाभर 'ही' चटणी खा

अन्न नीट चावून खा

अन्न नीट चावून खा. भरभर खाल्ल्याने अन्नाचे तुकडे होत नाही. ज्यामुळे पचनक्रियेत अडचण निर्माण होते. त्यामुळे अन्न नेहमी नीट चावून खावे. 

Web Title: How To Manage Digestive Problems Post Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.