Join us   

दिवसातून दोनदा ब्रश करूनही दातांचा पिवळेपणा जात नाही- तोंडाला दुर्गंध येतो? बघा कुठे चुकतं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2024 1:49 PM

Dental Care Tips: ब्रश करताना बहुसंख्य लोक एक मुख्य चूक करतात. त्यामुळेच मग कितीही घासले तरी दात स्वच्छ दिसतच नाहीत...(how to prevent cavities and plaque buildup on teeth)

ठळक मुद्दे काही काही जणांच्या बाबतीत तर असंही दिसून येतं की दोन दातांच्या मध्ये जी भेग असते ती पुर्णपणे पिवळट- तपकिरी रंगाची झालेली असते.

ब्रश करणे किंवा दात घासणे हे आपण अगदी नित्यनेमाने करतो. कधीही त्यात खंड पडत नाही. काही जण तर दिवसांतून दोन वेळा अगदी न चुकता ब्रश करतात. पण तरीही काही जणांच्या बाबतीत असं होतं की नियमितपणे ब्रश करूनही त्यांच्या दातांचा पिवळेपणा कमी होत नाही. शिवाय ब्रश केल्यानंतर काही वेळातच त्यांच्या तोंडातून दुर्गंधी येण्यास सुरुवात होते (major reason for bad breath). काही काही जणांच्या बाबतीत तर असंही दिसून येतं की दोन दातांच्या मध्ये जी भेग असते ती पुर्णपणे पिवळट- तपकिरी रंगाची झालेली असते. (How can I get rid of my brown teeth?) असं का हाेतं आणि ते होऊ नये म्हणून नेमकं काय करावं, याविषयी बघा तज्ज्ञांनी सांगितलेला खास उपाय...(how to prevent cavities and plaque buildup.)

 

दातांवर पिवळा थर येऊन तोंडाला दुर्गंधी का येते?

आपल्याला असं वाटतं की आपण दिवसांतून दोन वेळा ब्रश करतो. काही खाल्ल्यानंतर चूळ भरतो, म्हणजेच आपण आपल्या तोंडाच्या, दातांच्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेतो.

कमी वयातच गुडघे ठणकू लागले? आलिया भटची फिटनेस ट्रेनर सांगते १ उपाय- दुखणं होईल कमी

पण प्रत्यक्षात तसं नाही. कारण मुळात ज्या ठिकाणी टुथब्रशने स्वच्छता होणं गरजेचं आहे, नेमकं त्याच ठिकाणापर्यंत आपला ब्रश पोहोचत नाही. त्यामुळे मग ब्रश करूनही दात स्वच्छ होत नाहीत आणि तोंडाची दुर्गंधी जात नाही.

 

यासाठी काय करायला पाहिजे याविषयीचा एक व्हिडिओ तज्ज्ञांनी podcast.pub या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.

केमिकल्स असणारी विकतची आलं- लसूण पेस्ट घेण्यापेक्षा घरीच तयार करा, महिनाभर टिकेल- बघा रेसिपी

यामध्ये ते सांगतात की आपल्या खालच्या दातांचे जे आतल्या बाजुचे एकदम खालचे टोक असते तिथपर्यंत आपला ब्रश पोहोचतच नाही. दातांचा तो भाग आणि त्याच्याखालच्या त्वचेचा थोडा भाग स्वच्छ होणं अतिशय गरजेचं आहे. कारण त्या भागातूनच लाळ तयार होते.

 

शिवाय हा भाग असा आहे की तिथे अन्नाचे कण चिटकून राहतात. त्यामुळे मग हळूहळू त्यांच्यातून दुर्गंधी येऊ लागते. या भागाची योग्य स्वच्छता होत नसल्याने मग हळूहळू तिथे पिवळट थर जमा होतो.

मुलांचे केस खूपच पातळ झालेत? केसांना वाढच नाही? जावेद हबीब सांगतात ‘हा’ उपाय

त्यानंतरही आपण त्यांची याेग्य स्वच्छता केली नाही तर मग त्याठिकाणी तपकिरी, चॉकलेटी रंगाचा थर दिसू लागतो. त्यामुळे दातांच्या आतल्याबाजुने थोडं अधिक लक्ष देऊन ब्रश करा, असा सल्ला तज्ज्ञ देतात.   

टॅग्स : आरोग्यदातांची काळजी