Join us   

शांतता असतानाही कानांना सतत आवाजाचा भास होत असेल तर वेळीच सावध व्हा; होऊ शकतो गंभीर आजार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 12:13 PM

How to prevent ear problems : अनेकदा लोक त्यांच्या कान आणि नाकाशी संबंधित समस्या किरकोळ समजून दुर्लक्ष करतात. पण, ही सवय अत्यंत घातक ठरू शकते.

कानांना असामान्य आवाज येणे किंवा शिट्ट्या ऐकून येण्याचा भास अनेकांना जाणवतात.  या प्रकारचा आवाज कानात अनेकदा ऐकू येणे सामान्य आहे, परंतु जर वारंवार असे होत असेल तर ही स्थिती धोकादायक देखील असू शकते. जेव्हा रुग्णाला कानात गुंजन किंवा विचित्र आवाज येतो तेव्हा त्याला टिनिटस म्हणतात. यामध्ये व्यक्तीच्या आजूबाजूला आवाज नसला तरी त्याला वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकू येतात. (Ear Problems) यामुळे कानांच्या पेशींचे नुकसान होते. याशिवाय, वय, लिंग, जीवनशैली, आवाजाच्या संपर्कात येणे यासारख्या विविध जोखीम घटकांमुळे टिनिटस होऊ शकतो. यावर वेळीच उपचार न केल्यास व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाऊ शकते. (Tinnitus ringing in the ears and causes how to stop)

कधीकधी गंभीर टिनिटस असलेल्या लोकांना ऐकण्यात, काम करताना किंवा झोपण्यात समस्या येऊ शकतात. या स्थितीचा सामना करण्यासाठी डॉक्टर त्यांच्या स्तरावर औषधे लिहून देत असले तरी काही गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही हा आजार उद्भवण्यापासून रोखू शकता. 

टिनिटसची लक्षणं

जर तुमचे कान वाजत असतील तर याचा अर्थ तुम्हाला टिनिटस झाला आहे. त्याची लक्षणे ओळखून ताबडतोब उपचार घेणे चांगले, अन्यथा कानांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. तुमचं वजन तुमच्या ऐकण्याच्या क्षमतेवरही परिणाम करू शकते. होय, निरोगी हृदय, रक्ताभिसरण, शरीराच्या इतर प्रणालींचे नियमन करण्यासाठी निरोगी वजन असणे खूप महत्वाचे आहे. जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळे रक्ताभिसरणात अडथळा निर्माण होऊ शकतो.

कमी आवाजात गाणी ऐका

तुमची श्रवणशक्ती कमी होण्यापूर्वीच गाणी ऐकणे किंवा उच्च आवाजात टीव्ही पाहणे थांबवा. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जास्त वेळ मोठ्या आवाजात संगीत किंवा आवाज ऐकल्याने टिनिटसची होऊ शकतो. त्यामुळे जेव्हाही तुम्ही इअरफोन्स किंवा हेडफोनसह काम कराल तेव्हा व्हॉल्यूम कमी ठेवा. टिनिटस टाळण्यासाठी आपल्या जीवनशैलीचे नियमन करा. आरोग्यविषयक गुंतागुंत टाळण्यासाठी नियमित व्यायाम करा, मद्यपान टाळा आणि धूम्रपानापासून दूर राहा.

टिनिटस हा आजार नसून एक लक्षण आहे, ज्यासाठी कोणताही साधा इलाज नाही. तुमच्या श्रवण प्रणालीमध्ये काहीतरी गडबड असल्याचे हे लक्षण आहे. तज्ज्ञांच्या मते, अनेकदा लोक त्यांच्या कान आणि नाकाशी संबंधित समस्या किरकोळ समजून दुर्लक्ष करतात. पण, ही सवय अत्यंत घातक ठरू शकते. राहणीमानाचा दर्जा सुधारून हे टाळता येऊ शकतं.  आपल्याला कोणतीही लक्षणे जाणवल्यास, आपण ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल