पाऊस उशीरा सुरू झाला असला तरी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली संततधार थांबायचे नाव घेत नाही. ओलसर आणि दमट वातावरणामुळे डास, माश्या यांचे वाढते प्रमाण आणि त्याचा आरोग्यावर होणारा परीणाम हे आलेच. आरोग्यासाठी फारशा चांगल्या नसलेल्या या काळात सर्दी, ताप, खोकला, पोटदुखी, जेलाब, गॅसेस अशा काही ना काही समस्या उद्भवतातच (Ayurvedic Remedies). सध्या तर घरोघरी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणाची ना कोणाची तब्येत बिघडली असल्याचे चित्र आहे. अशावेळी आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जाऊन गोळ्या-औषधे घेण्यापेक्षा आजारी पडूच नये आणि प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी काळजी घेतली तर? (Drinks for Boosting Immunity) ऐन पावसाळ्यात तब्येत चांगली ठेवण्यासाठी आयुर्वेदिक घरगुती काढा घेतला तर त्याचा निश्चितच चांगला उपयोग होतो (3 Energy Drinks to Prevent Infection in Monsoon).
तसंच पावसाळ्यात आपल्याला गळून गेल्यासारखे होते. आजारपणानंतरही बऱ्याचदा थकवा राहतो. अशावेळी हा काढा किंवा एनर्जी ड्रिंक घेणे फायदेशीर ठरते. पण आता वेगवेगळ्या प्रकारची ही एनर्जी ड्रींक कशी करायची आणि त्याचा कसा फायदा होतो याविषयी माहिती असणे आवश्यक आहे. इन्स्टाग्रामवर आयुर्वेदिक हिलिंग या पेजच्या माध्यमातून या तीन ड्रींकची रेसिपी शेअर करण्यात आली असून आयुर्वेदिक डॉक्टर ऐश्वर्या संतोष यांनी या रेसिपी शेअर केल्या आहेत. सोप्या पद्धतीने घरच्या घरी करता येणारे हे ड्रींक आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त ठरु शकतात. पाहूयात हे ड्रींक कसे तयार करायचे.
पावसाळ्यात आजारी पडायचं नसेल तर लक्षात ठेवा 5 गोष्टी, डॉक्टर सांगतात हमखास होणाऱ्या चुका
१. सुंठ आणि धण्याचा काढा
सुंठेपासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतो. आपण थंड हवामानात चहात आलं घालून पितोच पण पावसाळ्याच्या दिवसांत सुंठ फायदेशीर ठरते. थंड हवामानात शरीराला उष्णता देण्यासाठी आणि सर्दी, कफ कमी करण्यासाठी पचनाच्या तक्रारी दूर करण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सुंठेचा उपयोग होतो. १ चमचा सुंठ पावडर, १ चमचा धणे, काळी मिरी १ चमचा, जीरे पावडर २ चमचे, आवडीनुसार गूळ आणि ३ कप पाणी १५ मिनीटे उकळवायचे. त्यानंतर गाळून गरमागरमच प्यायचे.
४ गोष्टींवरुन समजते, तुम्हाला आणखी झोपेची गरज आहे का? झोप कमी होत असेल तर..
२. तुळस आणि लिंबाचा चहा
बाहेर पाऊस असला की आपल्याला सारखं गरमागरम काहीतरी घ्यावसं वाटतं. अशावेळी चहा-कॉफी घेतली जाते. मात्र त्यापेक्षा नेहमीच्या चहामध्येच थोडासा बदल केल्यास त्याचा बदलत्या हवामानाशी सामना करण्यास निश्चितच चांगला फायदा होतो. तुळस आणि लिंबू या दोन्हीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. विविध आजारांचा संसर्ग, सर्दी यांसाठी या दोन्ही गोष्टी फायदेशीर असतात. कफ पातळ होण्यासाठीही तुळस आणि लिंबू उपयुक्त ठरते. ३ कप पाणी, ४ चमचे लिंबाचा रस आणि २५ ते ३० तुळशीची पाने घ्यावीत. तुळशीची पाने स्वच्छ धुवून १० मिनीटे पाण्यात उकळावीत आणि त्यात लिंबाचा रस घालून हे मिश्रण प्यावे.
३. घशासाठी ज्येष्ठमध आणि खडीसाखर रामबाण
अनेकदा सर्दी किंवा कफ झाला की आपला घसा खराब होतो. घसा खवखवणे, आवाज बसणे, कोरडा खोकला येणे या समस्यांवर ज्येष्ठमध अतिशय फायदेशीक ठरतो. ज्येष्ठमधाची पावडरही बाजारात सहज मिळते. ही पावडर ३ चमचे आणि खडीसाखर १.५ चमचा ३ कप पाण्यात चांगले उकळावे आणि प्यावे. सुरुवातीला खडीसाखर पाण्यात घालून ती पाण्यात विरघळेपर्यंत उकळावी, त्यानंतर ज्येष्ठमधाची पावडर घालून हे मिश्रण १० मिनीटे उकळावे आणि गाळून प्यावे. प्रतिकारशक्ती वाढण्यासाठीही याचा चांगला उपयोग होतो.