Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पाऊस भिजवतो- आजारही वाढवतो; भर पावसात ५ आजारांचा धोका- काय केलं तर प्रतिकारशक्ती वाढेल?

पाऊस भिजवतो- आजारही वाढवतो; भर पावसात ५ आजारांचा धोका- काय केलं तर प्रतिकारशक्ती वाढेल?

How To Take Care in Monsoon: पावसाळा सुरू होताच वेगवेगळे संसर्गजन्य आजार (infectious diseases in monsoon) डोकं वर काढतात. या आजारांपासून स्वत:चं आणि स्वत:च्या कुटूंबाचं संरक्षण करण्यासाठी वाचा हा तज्ज्ञांनी दिलेला खास सल्ला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2022 03:15 PM2022-07-05T15:15:58+5:302022-07-05T15:16:31+5:30

How To Take Care in Monsoon: पावसाळा सुरू होताच वेगवेगळे संसर्गजन्य आजार (infectious diseases in monsoon) डोकं वर काढतात. या आजारांपासून स्वत:चं आणि स्वत:च्या कुटूंबाचं संरक्षण करण्यासाठी वाचा हा तज्ज्ञांनी दिलेला खास सल्ला.

How to prevent yourself from common infectious diseases in monsoon, How to boost immunity in monsoon? | पाऊस भिजवतो- आजारही वाढवतो; भर पावसात ५ आजारांचा धोका- काय केलं तर प्रतिकारशक्ती वाढेल?

पाऊस भिजवतो- आजारही वाढवतो; भर पावसात ५ आजारांचा धोका- काय केलं तर प्रतिकारशक्ती वाढेल?

Highlightsसर्दी- खोकला, डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, कॉलरा, पोटदुखी असे अनेक आजार डोकं वर काढू लागतात. म्हणूनच या दिवसांत वेगवेगळ्या आजारांपासून दूर राहण्यासाठी तज्ज्ञ सांगत आहेत काही खास उपाय.

पावसाळा अतिशय आल्हाददायक ऋतू. या दिवसांत निसर्गाची मुक्तहस्ते उधळण सुरू असते. एकीकडे आपण पावसाचा, पावसाळी हवेचा आनंद घेत असतो, पण त्याचवेळी आपल्या शरीराची मात्र काहीतरी कुरबूर सुरू झालेलीच असते. कारण या दिवसांत असलेलं दमट वातावरण अनेक संसर्गजन्य आजारांसाठी (infectious diseases in monsoon) कारणीभूत ठरतं. या दिवसांत आपला जठराग्नी मंद झालेला असतो. त्यामुळेही मग अनेक पदार्थ पचत नाहीत, रोगप्रतिकारक शक्ती (How to boost immunity in monsoon?) कमी होते. याचा परिणाम तब्येतीवर होतो. (How To Take Care of your health in Monsoon)

 

पावसाळ्यात आजारांपासून दूर राहण्यासाठी...
१. मलेरिया आणि चिकनगुनिया (Malaria)

डॉ. विक्रांत शाह यांनी एका इंग्रजी वाहिनीला दिलेल्या माहितीनुसार पावसाळ्यात मलेरियाचा आणि चिकनगुनियाचा धोकाही खूप वाढलेला असतो. कारण या काळात अनेक ठिकाणी पाण्याचं डबकं साचतं आणि त्यात डासांची वाढ होऊन हे आजार वाढतात. या आजारांपासून दूर राहण्यासाठी आपल्या आसपासच्या परिसरात पाणी साचून राहणार नाही, याची काळती घ्या तसेच mosquito repellents चा योग्य वापर करा. मासिक पाळी अनियमित? कधी लवकर, कधी दोन-दोन महिने येतच नाही? गंभीर आजारांचा धोका, तज्ज्ञ सांगतात..

 

२. सर्दी- ताप (cold and flu)
 पावसाळ्यात सर्वाधिक लोकांना गाठणारा हा आजार. या काळात असणाऱ्या दमट हवेमुळे बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन होण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे सर्दी- ताप होतो. हा त्रास कमी करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारी व्हिटॅमिन सी असणारी फळं अधिक प्रमाणात घ्यावीत तसेच आंबट, थंड पदार्थ खाणं टाळावं.

 

३. डेंग्यू (dengue)
एडिस इजिप्ती या डासांपासून होणारा हा आजार अतिशय त्रासदायक आहे. त्वचेवर रॅश येणं, पांढऱ्या रक्तपेशी कमी होणं, ताप, डोकेदुखी ही या आजाराची लक्षणं. हा आजार टाळण्यासाठी डास चावणार नाहीत, याची काळजी घ्या. सायंकाळी अंगभर कपडे घाला. विशेषत: पायांना पुर्णपणे संरक्षण द्या, असं तज्ज्ञ सांगतात. 

 

४. कॉलरा आणि टायफॉईड (Cholera and typhoid)
 व्हिब्रियो कॉलरा या बॅक्टेरियापासून कॉलरा होतो. पाण्यातून पसरणारा हा आजार आहे. त्यामुळे या दिवसांत उघड्यावरचे पाणी पिणे पुर्णपणे टाळा. घरचे फिल्टर किंवा उकळलेले पाणीच प्या. तसेच टायफॉईड हा आजार दुषित अन्न किंवा पाणी यामुळे होतो. योग्य स्वच्छता आणि उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळणे, हाच या आजारावरचा उत्तम उपाय आहे. या दिवसांत गृहिणींनीही स्वयंपाक करताना काळजी घ्यावी. पोट- हिप्सवर वाढले चरबीचे थर? शिल्पा शेट्टी सांगते सुपर योगा, व्हा स्लिमफीट भाज्या, फळे व्यवस्थित धुवून खावीत. तसेच बाहेरून आल्यानंतर कपडे बदलल्याशिवाय तसेच हात- पाय स्वच्छ धुतल्याशिवाय स्वयंपाकघरात जाणे टाळावे.

५. लेप्टोस्पिरॉसिस (Leptospirosis)
 प्राण्यांना असलेल्या बॅक्टेरियल इन्फेक्शनमधून माणसांमध्ये पसरणारा हा आजार. प्राण्यांना ज्या जखमा होतात त्यात बॅक्टेरिया असतात. हे बॅक्टेरिया जमिनीवर साचलेल्या पाण्यात मिसळतात आणि त्या पाण्यातून माणसांना त्याचे इन्फेक्शन होते. त्यामुळे पाण्याच्या डबक्यातून चालणे टाळावे. रस्त्यावरच्या घाण पाण्याने पाय ओले झालेच तर घरी आल्यावर साबणाने स्वच्छ धुवा. कपडे बदलून टाका. पाणी साचून राहणाऱ्या रस्त्यांवरून जाताना काळजी घ्या. 

 

Web Title: How to prevent yourself from common infectious diseases in monsoon, How to boost immunity in monsoon?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.