Join us   

चिकनगुनियाची साथ मोठी- आजार टाळण्यासाठी ६ गोष्टींची काळजी घ्या, बघा लक्षणं कशी ओळखायची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2024 9:12 AM

How To Protect Ourselves And Our Family From Chikungunia?: चिकनगुनियाचे रुग्ण सध्या वाढत आहेत. त्यामुळे आपल्यापर्यंत, आपल्या घरापर्यंत हा आजार येऊ नये म्हणून काही गोष्टींची खबरदारी घेतलीच पाहिजे..

ठळक मुद्दे चिकनगुनियाचे संक्रमण झालेल्या व्यक्तीला सुरुवातीला पोटऱ्यांमध्ये गोळे आल्यासारखे होते. अंग आणि डोके जड पडते. ताप येतो.

पावसाळा सुरू झाला की संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढते. तसेच डासांमुळे पसरणारे आजारही या काळात डोकं वर काढू लागतात. कारण पावसाळ्यात पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याची डबकी साचून राहतात. त्यामुळे डासांचे आणि डासांमुळे पसरणाऱ्या आजारांचे प्रमाण आपोआपच वाढते. मध्यंतरी पुण्यामध्ये झिका व्हायरसचे रुग्ण वाढल्याचे वृत्त होतेच. आता संपूर्ण महाराष्ट्रातच चिकनगुनियाचे रुग्ण वाढत आहेत. हा आजार होऊ नये म्हणून काही गोष्टींची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. (how to protect ourselves and our family from chikungunia infection?)

 

कशी ओळखायची चिकनगुनियाची लक्षणं?

चिकनगुनियाचे संक्रमण झालेल्या व्यक्तीला सुरुवातीला पोटऱ्यांमध्ये गोळे आल्यासारखे होते. अंग आणि डोके जड पडते. ताप येतो.

त्यानंतर अगदी एखाद्या दिवसांतच शरीराचे सगळे जॉईंट्स दुखू लागतात.

झटपट करा पोह्यांची इडली! डाळ तांदूळ भिजवून वाटण्याची कटकटच नाही- बघा चवदार रेसिपी

जॉईंट्स दुखणे सुरू झाले की त्यानंतर काही तासांतच ते एवढे आखडून जातात की कोणतीही शारिरीक हालचाल करणे कठीण होऊ जाते. या कुशीवरून त्या कुशीवर वळणे, उठणे, बसणे, एखादी वस्तू उचलणे अशा सहजसोप्या गोष्टी करतानाही खूप त्रास होतो.

२ ते १२ दिवस असा त्रास व्यक्तींना जाणवू शकतो. त्यानंतरही काही दिवस जॉईंटपेन सुरूच असते.

 

चिकनगुनिया होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?

१. आपल्या आजुबाजुला डास असणार नाहीत किंवा निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्या.

२. पाच दिवसांतून एकदा घरातली पाण्याची सगळी भांडी रिकामी करून स्वच्छ घासावी. कारण भांड्याच्या ओलसर भागांत डासांची अंडी असू शकतात. ती भांडी पुर्णपणे वाळून कोरडी झाल्यानंतरच पुन्हा त्यात पाणी भरा.

गणपतीच्या डेकोरेशनसाठी बॅकड्रॉप घ्यायचा? ३ स्वस्तात मस्त पर्याय- उठून दिसेल तुमचा बाप्पा

३. घराच्या आजुबाजुला असणाऱ्या कोणत्याही वस्तूमध्ये पावसाचे पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्या.

४. घरात मनी प्लांट, बांम्बू प्लांट किंवा इतर कोणतीही वनस्पती ठेवत असाल तर त्यात पाणी साचू देऊ नका.

५. डासांना पळवून लावणाऱ्या साधनांचा पुरेपूर वापर करा.

६. डास चावू नयेत म्हणून संपूर्ण अंग झाकून राहील असे कपडे घाला.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्ससंसर्गजन्य रोग