हिमोग्लोबीनच्या कमतरतेमुळे अशक्तपणा, मूत्रपिंड आणि यकृत रोग, हृदय रोग असे आजार होतात. (Health Tips) हिमोग्लोबिनची कमतरता टाळण्यासाठी लोहयुक्त पदार्थ अधिक प्रमाणात घ्यावेत तसेच व्हिटॅमिन-सी असलेली फळेही खावीत. शरीरातील रक्त वाढवण्यासाठी ज्यूस बनवताना सगळ्यात आधी एक मिक्सरच्या भांड्यात डाळिंबाचे दाणे घाला. त्यात बीट, गाजराचे बारीक तुकडे, ३ ते ४ खजूर आणि पाणी घालून मिक्सरमधून बारीक करून घ्या. तयार मिश्रण एका ग्लासात ओतून ज्यूस सकाळ संध्याकाळ प्या. (Simple Tips To Increase Hemoglobin Count At Home) या ज्यूसच्या सेवनानं शरीरातील रक्ताची कमतरता दूर होऊन शरीर तंदरूस्त राहण्यास मदत होईल. (How to Raise Your Hemoglobin Count) तज्ज्ञांच्यामते संतुलित आहार घेतल्यास हिमोग्लोबिनची पातळी वाढू शकते.
रक्त वाढवण्यासाठी काय खायचं?
१) फॉलिक ऍसिड हे लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी आवश्यक असलेले बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्व आहे. हिरव्या पालेभाज्या, स्प्राउट्स, शेंगदाणे, केळी आणि ब्रोकोली हे फॉलिक अॅसिडचे चांगले स्रोत आहेत. सफरचंद रोज खावे कारण ते रक्तातील हिमोग्लोबिन टिकवून ठेवण्यास आणि वाढवण्यास मदत करू शकते.
२) मध्यम ते उच्च तीव्रतेचे व्यायाम करा कारण जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुमचे शरीर अधिक हिमोग्लोबिन बनवते. अशाप्रकारे व्यायाम केल्याने तुमच्या शरीरातील ऑक्सिजनची वाढलेली मागणी पूर्ण होते. संतुलित आहार घेणे हा शरीराला आवश्यक असलेल्या सर्व पोषक तत्वांचा पुरवठा करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे आणि त्यामुळे तुमचे हिमोग्लोबिन वाढते.
३) कॉफी, चहा, कोला ड्रिंक्स, वाईन आणि बिअर यांसारखी पेये तुमच्या शरीराच्या लोह शोषून घेण्याच्या क्षमतेत अडथळा आणू शकतात. त्यामुळे तुमचे हिमोग्लोबिन कमी असल्यास साखरेचे प्रमाण असलेले पेय टाळणे चांगले.
४) नॅशनल एनिमिया एक्शन काऊंसिलनुसार लोहाच्या कमतरतेने एनिमिया आणि कमी हिमोग्लोबीन असणं हा त्रास उद्भवतो. आहाराक पालेभाज्या, सफरचंद, भोपळ्याच्या बीया, बदाम, मनुके यांचा समावेश करा.
५) व्हेजी मिक्स सूप हे अनेक प्रकारच्या भाज्यांचे मिश्रण आहे. त्यात जीवनसत्त्वे, खनिजे, लोह, व्हिटॅमिन सी आणि फायबर चांगल्या प्रमाणात आढळतात. लोहाने समृद्ध असलेला हा रस पिण्यास अतिशय चवदार असतो.