Join us   

शरीरातील अमोनियाचं प्रमाण खूप वाढलंय? कमी करण्यासाठी करा ४ गोष्टी, राहा फिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2023 9:42 AM

How To Reduce Ammonia in Body : काही कारणाने अमोनिया लिव्हरमधून बाहेर पडत नसेल तर तो रक्तात जमा होतो, ही स्थिती आरोग्यासाठी धोक्याची असते.

शरीराच्या सर्व क्रिया सुरळीत राहण्यासाठी शरीरातील सर्व घटकांची पातळी योग्य असणे आवश्यक असते. यामध्ये कोलेस्टोरॉल, युरीक अॅसिड, रक्तातील साखर, हिमोग्लोबिन सर्व व्हिटॅमिन्स, अमोनिया यांचा समावेश असतो. बरेचदा शरीरातील अमोनिया वाढण्याची समस्या उद्भवते. हा अमोनिया वाढणे आरोग्यासाठी काही प्रमाणात घातक असू शकते. अमोनिया आपल्या शरीरातील जास्तीचा अमोनिया  आपल्या लिव्हरमध्ये जमा होतो आणि लघवीद्वारे हा अमोनिया शरीराबाहेर टाकला जातो. पण काही कारणाने अमोनिया लिव्हरमधून बाहेर पडत नसेल तर तो रक्तात जमा होतो, ही स्थिती आरोग्यासाठी धोक्याची असते (How To Reduce Ammonia in Body). 

अमोनिया वाढण्याची कारणे 

१. लिव्हरशी निगडीत तक्रारी 

२. किडनीच्या क्रियेत अडथळा निर्माण होणे 

३. अनुवंशिक तक्रारी

(Image : Google)

४. कांदा, सोयाबिन, बटाटा चिप्स यांसारख्या पदार्थांमुळे

५. लोणी आणि तूप

लक्षणे 

१. डोकेदुखी 

२. मळमळ किंवा उलटी 

३. कोमात जाणे

४. चिडचिडेपणा

५. झोप उडणे

६. दैनंदिन कामे करण्यात अडचणी

कोणत्या वयात किती अमोनिया आवश्यक

१. नवजात शिशू - ८५ ते २७१ mcg/dl 

(Image : Google)

२. लहान मुले - ४१ ते ८२ mcg/dl 

३. महिला - १९ ते ८२ mcg/dl 

४. पुरुष - २६ ते ९४ mcg/dl 

उपाय काय?

१. किडनी, लिव्हरची तपासणी करा

तुम्हाला किडनी किंवा लिव्हरशी निगडीत काही समस्या असेल तर लगेच डॉक्टरांकडे जाणे आवश्यक असते. डॉक्टर योग्य ती तपासणी करुन यावर औषधोपचार करतात. असे होणे आरोग्यासाठी घातक असल्याने त्याकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे होऊ शकते.

२. आहारात प्रोबायोटीक्सचा समावेश करा

प्रोबायोटीक्समध्ये आरोग्यासाठी आवश्यक असे बॅक्टेरीया असतात. ज्यामुळे आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन होण्यास मदत होते. या आतड्यातील अमोनियाचे योग्य पद्धतीने पचन व्हावे यासाठी हे बॅक्टेरीया उपयुक्त ठरतात. 

३. प्लांट बेस फूडचे सेवन

बिन्स आणि डाळ यांच्यातील प्रोटीन अॅनिमल प्रोटीनच्या तुलनेत हळूहळू पचते. त्यामुळे शरीरात तयार झालेला अमोनिया पचण्यासाठी शरीराला अधिक वेळ मिळतो. 

४. झिंक असलेल्या पदार्थांचे सेवन

झिंकमुळे शरीरातील अमोनियाची पातळी कमी होण्यास मदत होते. ज्यांना लिव्हरच्या तक्रारी असतात अशा लोकांच्या शरीरात झिंकची पातळी कमी असते. त्यामुळे झिंक असलेले पदार्थ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने झिंकची सप्लिमेंटस घ्यायला हवीत. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल