Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रोजच्या जेवणात फक्त १ चमचा 'ही' चटणी खा; बॅड कोलेस्टेरॉल बाहेर निघेल-BP कंट्रोलमध्ये राहील

रोजच्या जेवणात फक्त १ चमचा 'ही' चटणी खा; बॅड कोलेस्टेरॉल बाहेर निघेल-BP कंट्रोलमध्ये राहील

How to Reduce Bad Cholesterol Using Garlic : लसूण आणि गुळाच्या मिश्रणाच्या सेवनाने पचनाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 01:25 PM2024-03-09T13:25:40+5:302024-03-09T13:37:10+5:30

How to Reduce Bad Cholesterol Using Garlic : लसूण आणि गुळाच्या मिश्रणाच्या सेवनाने पचनाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो

How to Reduce Bad Cholesterol Using Garlic : Garlic Chutney For Cholesterol Control | रोजच्या जेवणात फक्त १ चमचा 'ही' चटणी खा; बॅड कोलेस्टेरॉल बाहेर निघेल-BP कंट्रोलमध्ये राहील

रोजच्या जेवणात फक्त १ चमचा 'ही' चटणी खा; बॅड कोलेस्टेरॉल बाहेर निघेल-BP कंट्रोलमध्ये राहील

 हार्ट अटॅक, कार्डिएक अरेस्ट, स्ट्रोक आणि  हार्ट डिजीसचे केसेस वेगाने वाढत आहेत. याचं सगळ्यात मोठं कारण हाय कोलेस्टेरॉल आणि हाय ब्लड प्रेशर आहे. रक्त वाहिन्यांमध्ये जमा झालेले कोलेस्टॉल ब्लॉक करतात. ज्यामुळे रक्तप्रवाह संथ होतो. या जीवघेण्या स्थितीतून बचावासाठी बॅड कोलेस्टेरॉल कमी करायला हवं. (How to Control Cholesterol)

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आणि हृदयाचे आजार टाळण्यासाठी लसूण आणि गुळाचे सेवन करायला हवे. (Cholesterol Control Tips) आयुर्वेद डॉक्टर मिहिर खत्री यांच्या म्हणण्यानुसार लसणाच्या २ पाकळ्यांच्या मिश्रणाचे सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत होते ज्यामुळे शरीराला बरेच फायदे होतात. (Garlic Chutney For Cholesterol Control)

लसूण आणि गुळाची चटणी (Garlic Jaggery Chutney)

आयुर्वेदानुसार हृदयाच्या आजारांचा बचाव करण्यासाठी  लसणाच्या पाकळ्या आणि गुळाची चटणी तयार करावी लागेल.  नाश्त्याला किंवा जेवणाबरोबर तुम्ही या चटणीचे सेवन करू शकता.

लसूण आणि गूळ खाण्याचे फायदे (Benefits Of Garlic Jaggery)

आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात की गॅसशी संबंधित समस्या टाळण्यासाठी तसचं पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी, शारिरीक वेदनांना आराम देण्यासाठी, रक्त पातळ करण्यासाठी, कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी या २ पदार्थांचे सेवन करायला हवे. हे मिश्रण गरम असते. याचे सेवन गर्भवती महिलांनी करू नये.

कायम तरूण राहण्यास मदत करते गूळ आणि लसणाचे मिश्रण

आयुर्वेदानुसार लसणाच्या रसात बरीच महत्वाची पोषक तत्व असतात. ज्यामुळे तुम्ही दीर्घकाळ तरूण राहता. वाढत्या वयात हे कॉम्बिनेशन आजारांपासून दूर ठेवण्यास फायदेशीर ठरते. 

पचनाचे विकार दूर राहण्यास मदत होते

 डॉक्टर सांगतात की लसूण आणि गुळाच्या मिश्रणाच्या सेवनाने पचनाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. इतकंच नाही तर या चटणीचे सेवन केल्याने पोटातील जंतही कमी होतात.

कितीपण खा वजनच वाढत नाही-हडकुळे दिसता? रामदेव बाबा सांगतात १ उपाय, भरपूर ताकद येईल

कमकुवतपणा उद्भवत नाही

डॉक्टर सांगतात, हे मिश्रण कमकुवत हाडांना मजबूत ठेवण्यासाठी आणि हाडांचे फॅक्चर ठिक करण्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळे कमकुवतपणा जाणवत नाही. उर्जा मिळवण्यासाठी याचे सेवन करायला हवे.  गूळ आणि लसूण  हे एक प्रभावी कॉम्बिनेशन आहे. ज्यामुळे कफ-वात, हे गुण कमी होतात.

बीपी कंट्रोल होणं, सांधेदुखी कमी होणं, कोलेस्टेरॉल कमी होणं,सर्दी-खोकला  टळणं, इम्यून सिस्टिम कमी होणं, अशी लक्षणं उद्भवतात. गूळ जिंक आणि सेलेनियम भरपूर असते. आयुर्वेदात याचा उपयोग डिटॉक्सिफाईंग एजंट आहे.  पचनक्रियाही चांगली राहते.  शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते. 

Web Title: How to Reduce Bad Cholesterol Using Garlic : Garlic Chutney For Cholesterol Control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.