Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पोट सुटलंय-फिगर बिघडलेली दिसते? रोज १ मिनिटं हा व्यायाम करा, बेली फॅट गायब-स्लिम दिसाल

पोट सुटलंय-फिगर बिघडलेली दिसते? रोज १ मिनिटं हा व्यायाम करा, बेली फॅट गायब-स्लिम दिसाल

How To Reduce Belly Fat  With Plank : पोटावर अनेक दिवस फॅट जमा होणं धोकादायक ठरू शकतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 12:04 PM2024-11-08T12:04:22+5:302024-11-08T12:12:50+5:30

How To Reduce Belly Fat  With Plank : पोटावर अनेक दिवस फॅट जमा होणं धोकादायक ठरू शकतं.

How To Reduce Belly Fat  With Plank In One Month Right Way Of Exercise Health Benefits Of Planks | पोट सुटलंय-फिगर बिघडलेली दिसते? रोज १ मिनिटं हा व्यायाम करा, बेली फॅट गायब-स्लिम दिसाल

पोट सुटलंय-फिगर बिघडलेली दिसते? रोज १ मिनिटं हा व्यायाम करा, बेली फॅट गायब-स्लिम दिसाल

पोटावर जमा झालेलं फॅट कमी करणं सोपं नाही. (Fat Loss  Tips) जगभरातील लोकांना या फॅटचा सामना करावा लागत आहे. पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये बेली फॅट वाढण्याची समस्या जास्त असते. या कारणामुळे फक्त पर्सनॅलिटी बिघडत नाही तर कपड्यांची फिटींगही व्यवस्थित दिसत नाही. (How To Reduce Belly Fat With Plank)

पोटावर अनेक दिवस फॅट जमा होणं धोकादायक ठरू शकतं. यामुळे हार्ट अटॅक, डायबिटीस यांसारख्या समस्या उद्भवू शकतात अनेकदा हे आजार जीवघेणे ठरतात. अशा स्थितीत घरीच काही व्यायाम करून तुम्ही काही मिनिटात चरबी वितळवू शकता. जर तुम्ही १ महिना रोज १ मिनिटं व्यायाम केला तर कंबर आणि पोटाची चरबी कमी होण्यास मदत होईल. (One Minute Exercise For Belly Fat Loss)

क्लिव्हलॅण्ड क्लिनिकच्या रिपोर्टनुसार प्लँक हा व्यायाम करायला फक्त काही मिनिटं लागतात. हा व्यायाम करण्यासाठी जीम पार्टनरचीही गरज नाही याशिवाय कुठेही हा व्यायाम करता येतो. व्यायामामुळे कोअर मसल्स मजबूत होतात. बॅक पेन पासूनही आराम मिळतो. शरीराचे पोश्चर सुधारण्यास  मदत होते. मानसिक आरोग्यही चांगले राहते.  जर रोज १ मिनिटं प्लँक व्यायाम केला तर बेली फॅट वेगानं कमी करण्यास मदत होईल.

बोटांचा कट-कट असा आवाज येतो; हाडांचा खुळखूळा होण्याआधी ५ गोष्टी करा, हाडं मजबूत राहतील

प्लँक करण्यासाठी फरशीवर एक मॅट पसरवून घ्या नंतर पोटावर झोपा. त्यानंतर पुशअप पोजिशनमध्ये झोपा. शरीराचा पूर्ण भार  कुल्ह्यांवर देऊन शरीर उंच करा. ज्यामुळे संपूर्ण शरीराचा समतोल राहील. काही सेकंद या स्थितीत राहा. १ मिनिटं हा व्यायाम केल्यानं चांगला परिणाम दिसून येईल.

प्लँक करण्याचे फायदे

कंबर, पोट, हिप्स, खांदे, हात, मांड्या या भागांवर फॅट जमा होत नाही. हा व्यायाम केल्यानं फॅट्स वेगानं बर्न होण्यास मदत होते याशिवाय मसल्स टोन होतात. बॉडी बॅलेन्सिंग व्यवस्थित होते.  पोश्चर सुधारते, कोअर मसल्स मजबूत होतात.  नियमित हा व्यायाम केल्यानं मेटाबॉलिझ्म चांगला राहतो आणि खांदे स्ट्रेट राहतात. 

Web Title: How To Reduce Belly Fat  With Plank In One Month Right Way Of Exercise Health Benefits Of Planks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.