Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > कमी होईल शरीरातलं बॅड कोलेस्टेरॉल; ६ उपाय, हृदयाचे आजार होतील दूर, डॉक्टरांचा सल्ला

कमी होईल शरीरातलं बॅड कोलेस्टेरॉल; ६ उपाय, हृदयाचे आजार होतील दूर, डॉक्टरांचा सल्ला

How to reduce Cholesterol : कोलेस्टेरॉल  कमी करण्यासाठी फॅट्सयुक्त पदार्थांपासून लांब राहायला हवं. याव्यतिरिक्त रोज व्यायाम केल्यास याचे प्रमाण कमी होऊ शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 11:05 AM2023-02-07T11:05:52+5:302023-02-07T13:23:21+5:30

How to reduce Cholesterol : कोलेस्टेरॉल  कमी करण्यासाठी फॅट्सयुक्त पदार्थांपासून लांब राहायला हवं. याव्यतिरिक्त रोज व्यायाम केल्यास याचे प्रमाण कमी होऊ शकते.

How to reduce Cholesterol : Ayurveda doctor told 6 ayurvedic remedies for high cholesterol and triglycerides | कमी होईल शरीरातलं बॅड कोलेस्टेरॉल; ६ उपाय, हृदयाचे आजार होतील दूर, डॉक्टरांचा सल्ला

कमी होईल शरीरातलं बॅड कोलेस्टेरॉल; ६ उपाय, हृदयाचे आजार होतील दूर, डॉक्टरांचा सल्ला

खाण्यापिण्याच्या सवयी, अनियमित जीवनशैली यांमुळे कोलेस्टेरॉल वाढण्याचा त्रास हा खूपच कॉमन झाला आहे. कोलेस्टेरॉल हा मेणयुक्त पदार्थ अधिक फॅट्सच्या सेवनानं निर्माण होतो. यामुळे नसांमध्ये ब्लॉकेज तयार होऊन रक्तप्रवाह स्लो होतो. यामुळे गंभीर आजार होण्याच धोका वाढतो. (Ayurveda doctor told 10 ayurvedic remedies for high cholesterol and triglycerides)

कोलेस्टेरॉल  कमी करण्यासाठी फॅट्सयुक्त पदार्थांपासून लांब राहायला हवं. याव्यतिरिक्त रोज व्यायाम केल्यास याचे प्रमाण कमी होऊ शकते. डॉक्टर कपिल त्यागी यांनी एनबीटी या वेब पोर्टलशी बोलताना कोलेस्टेरॉल ५ दिवसात कमी करण्याचे काही सोपे उपाय सांगितले आहेत. 

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी मध गुणकारी

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार रक्त वाहिन्यांमध्ये खराब कोलेस्टेरॉल जमा होणं मधाच्या सेवनानं काही प्रमाणात थांबू शकतं. एक कप गरम पाण्यात १ चमचा मध आणि लिंबाचा रस, अॅपल व्हिनेगरचे काही थेंब मिसळून प्या.

कोलेस्टेरॉल वाढल्यानंतर काय खायचं?

लसणात सल्फर आढळते. हे असे पोषक तत्व आहे, जे उच्च कोलेस्ट्रॉल पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. यावर घरगुती उपाय म्हणजे 6-8 पाकळ्या लसूण बारीक करून 50 मिली दूध आणि 200 मिली पाण्यात उकळून घ्या.

गरम पाणी प्यायल्यानं शरीरातलं बॅड कोलेस्टेरॉल कमी होतं? समजून घ्या यामागचं खरं कारण

हळद

हळद हा एक असा मसाला आहे. जो रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर जमा होणारा प्लेक कमी करतो आणि नसांमध्ये जमा होणारे कोलेस्टेरॉल रोखतो. यासाठी कोमट पाण्यात हळद मिसळून पिऊ शकता.

मेथीच्या बीया

मेथीच्या बीयांमध्ये पोटॅशियम, आयरन, जिंक, कॅल्शियम आणि अन्य पोषक तत्व असतात यामुळे कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. एक चमचा मेथी पावडर गरम पाण्यासोबत दोनवेळा घेतल्यानं आराम मिळेल.

स्तन ओघळलेत? सैल झाल्यासारखे वाटतात; सुडौल, मेंटेन फिगरसाठी घरीच करा ४ सोपे व्यायाम

धणे

धणे त्याच्या हायपोग्लाइसेमिक प्रभावामुळे उच्च कोलेस्ट्रॉल कमी करू शकतात. धणे मधुमेहाच्या रुग्णांसाठीही गुणकारी असून रक्तातील साखर कमी करण्याचे काम करतात. यासाठी १ कप पाण्यात २ चमचे हळद टाकून उकळा. दूध, साखर आणि वेलची पावडर एकत्र करून दिवसातून दोनदा प्या.

बीट

बीटात कॅरोटेनॉयड्स आणि फ्लेवोनॉयड्स असते, ते एलडीएल म्हणजे घाणेरंड कोलेस्टेरॉल कमी  करण्यास मदत करते. यामुळे ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते.  आहारात बीट सॅलेडचाही समावेश तुम्ही करू शकता.

Web Title: How to reduce Cholesterol : Ayurveda doctor told 6 ayurvedic remedies for high cholesterol and triglycerides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.