जर तुमच्या नितंबांवरची चरबी वाढली असेल तर संपूर्ण शरीराचा शेप बिघडलेला दिसतो. वाढत्या वयात अधिकाधिक महिलांच्या कुल्ह्यांवर जास्त फॅट जमा झालेलं दिसून येतं. पोस्ट प्रेग्नंसी कंबर आणि कुल्ह्यांवर भरपूर फॅट जमा होतं. ज्यामुळे शरीराचा आकार बेढब दिसतो (How To Reduce Hips And Waist Fat).
अनेकदा अन्हेल्दी इटींग हॅबिट्स, हॉर्मोनल इंम्बँलेंस, अनुवांशिक कारणं यामुळे शरीरावर फॅट जमा होतं. जर तुमच्या कुल्ह्यांवर आणि कंबरेवर फॅट जमा झालं असेल तर याचं कारण कंबरेवर जमा झालेली चरबी असू शकतं. काही घरगुती उपाय करून तुम्ही हे फॅट कमी करू शकता. (How To Reduce Hips Fat)
1) कार्डिओ व्यायाम गरजेचा
शरीरातील नितंबांवरील चरबी कमी करण्यासाठी दिवसभर बसून राहण्याची सवय सोडून द्या. रोज थोडा थोडा वेळ व्यायाम करा. कार्डिओबरोबरच स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाईज करून तुम्ही नितंबाचे फॅट कमी करू सकता. कोणत्याही फिटनेस ट्रेनरचा सल्ला घेऊन तुम्ही घरच्याघरी हे व्यायाम सुरू करू शकता.
2) एरोबिक्स व्यायाम
हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार स्वॅट्स, साईड लंजेस, वॉल सिट्स, बँडेड वॉक, जंप स्क्वॅट्स, शिड्या चढणं, हाय इंटेनसिटी इंटरव्हल ट्रेनिंग करून तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता. एरोबिक्स व्यायाम करून तुम्ही शरीरातील एक्स्ट्रा चरबी कमी करू शकता (Ref). एरोबिक्स व्यायाम खास करून कंबरेजवळचा लठ्ठपणा कमी करण्यास मदत करते. नितंबांवरील एक्स्ट्रा फॅट कमी करण्यासाठी हे उत्तम ठरते. एरोबिक्स व्यायामानं मांड्यांची चरबी कमी करण्यासही मदत होते. यासाठी तुम्ही सायकलिंग करू शकता याशिवाय रोज चालण्याची सवय ठेवा.
3) नारळाच्या तेलानं मालिश
नारळाच्या तेलानं मालिश केल्यानं नितंब, कंबर आणि मांड्याची चरबी कमी होण्यास मदत होईल. तेलातील फॅट एसिड्स त्वचेच्या माध्यमातून पेशाींना अवशोषित करतात. ज्यामुळे फॅट उर्जेत बदलते. मेटाबॉलिझ्म बुस्ट होण्यास मदत होते. नारळाच्या तेलानं नियमित मसाज केल्यास त्वचा चांगली राहण्यास मदत होईल.
4) पाणी पिऊन कुल्ह्यांची चरबी कमी करा
शरीरातील फॅट कमी करण्यासाठी पाणी पिणं खूप महत्वाचे आहे. पाणी प्यायल्यानं लिव्हर फॅट एनर्जीमध्ये बदलते. ज्यामुळे मेटाबॉलिझ्म वेगानं वाढतो. जेव्हा तुम्ही पाणी पिता तेव्हा काहीवेळासाठी पोट भरलेलं वाटतं. हा उपाय करून तुम्ही वजन वाढवण्यापासून वाचू शकता.
5) हेल्दी डाएट घ्या
जर तुम्ही बाहेरचं खात असाल तर ही सवय आजपासूनच बंद करा. घरी बनवलेलं शुद्ध हेल्दी डाएट घ्या. डाएटमध्ये लो कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थांचा समावेश करा. लो कॅलरी फूड्सचं सेवन करा ज्यामुळे शरीराची चरबी वाढणार नाही.