Join us   

मायग्रेनचा त्रास कमी करणारे घरगुती उपाय... आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात ३ असरदार उपाय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2022 6:05 PM

Ayurvedic Remedies For Migraine: डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधी तर घ्याच, पण त्यासोबतच आयुर्वेद तज्ज्ञांचा हा सल्लाही ऐका...

ठळक मुद्दे आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. दिक्षा भावसार यांनी मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगितले आहेत. 

मायग्रेनचा (Migraine pain) त्रास खूप जास्त असतो. हा त्रास ज्यांना होतो, त्यांनाच ते दुखणं माहिती. एकदा डोकं दुखायला लागलं की कशाचं काही म्हणून सूचत नाही. बरं कधी हा त्रास उद्भवेल हे देखील सांगता येत नाही. काही जणांचं दुखणं काही तासांत थांबून जातं, तर काही जणांचं दुखणं मात्र दिवसेंदिवस सुरूच राहतं. अनेक जणांना तर डोकेदुखीसोबत उलटी, मळमळ, अन्नपदार्थांवरची वासना उडणे, असे त्रासही जाणवतात. या त्रासावर वारंवार औषधी घेणंही अनेकांना सहन होत नाही. त्यामुळे उष्णता वाढून होणारा त्रास तर आणखीनच वेगळा. म्हणूनच आयुर्वेदतज्ज्ञ (Ayurvedic remedies for migraine) डॉ. दिक्षा भावसार यांनी मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी काही घरगुती  उपाय सांगितले आहेत. 

 

मायग्रेनच्या त्रासावर घरगुती आयुर्वेदिक उपचार  १. भिजवलेल्या काळ्या मनुका सकाळचा चहा घेतल्यानंतर रात्रभर भिजत ठेवलेल्या १० ते १५ काळ्या मनुका खाणे, मायग्रेनच्या त्रासावर अतिशय प्रभावी ठरते. हा उपाय सलग १२ आठवडे करावा. यामुळे शरीरातील अतिरिक्त पित्त, वात नियंत्रणात राहतात आणि मायग्रेनशी संबंधित असणारे ॲसिडीटी, नॉशिया, जळजळ, डोकेदुखी असे सगळे त्रास कमी होतात. 

 

२. वेलची आणि जिऱ्याचा चहा दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर वेलची आणि जिरे घालून असा चहा प्यावा. हा चहा करण्यासाठी अर्धा ग्लास पाणी घ्या. त्यात १ टीस्पून जिरे आणि १ वेलची टाका. हे पाणी ३ मिनिटांसाठी उकळत ठेवा. त्यानंतर गॅस बंद करा. चहा गाळून घ्या आणि  गरमगरम प्या. यामुळे मायग्रेनचं दुखणं कमी होऊन नॉशियादेखील कमी होतो. 

 

३. गायीचं तूप शरीरातील पित्त नियंत्रित ठेवण्यासाठी गायीचं तूप अतिशय उपयुक्त ठरतं. वेगवेगळ्या पद्धतीने तुपाचा वापर करता येतो. भातावर किंवा पोळी, पराठ्यावर तूप टाकून खाणे हा एक चांगला उपाय आहे. किंवा रात्री झोपताना गरम दुधात तूप टाकून प्यायल्यानेही चांगला परिणाम दिसून येतो. २ थेंब तूप नाकपुड्यांमध्ये टाकण्याचा उपायही आयुर्वेदात सांगितला आहे. याशिवाय ब्राह्मी, शंखपुष्पी अशी काही औषधी तुपासोबत घेऊ शकता.  

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहोम रेमेडीघरगुती उपाय