Join us   

घामामुळे अंगाला दुर्गंधी येते? आंघोळ करताना पाण्यात घालता येतील ५ गोष्टी, दिवसभर राहाल फ्रेश...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2023 11:59 AM

How To Reduce Sweat Odor 5 things you can add in Bath Water : पाहूयात आंघोळीच्या पाण्यात घालता येतील असे सोपे पर्याय

उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्या अंगाची नुसती लाहीलाही होते. कडक उन्हामुळे आपल्याला अनेकदा घामाघूम व्हायला होतं. बरेचदा या घामाला उग्र असा वास येत असल्याने आपल्या अंगालाही वास येतो. हा वास आजुबाजूच्यांना त्रासदायक होऊ शकतो. अशावेळी आंघोळीच्या पाण्यात काही गोष्टी घालून त्याने आंघोळ केल्यास घामाचा वास दूर होण्यास मदत होते. आता असे कोणते घटक आहेत जे घातल्याने घामाचा वास दूर होतो आणि आपल्याला साबण लावण्याची किंवा सतत खूप परफ्यूम मारण्याची आवश्यकता राहत नाही. पाहूयात आंघोळीच्या पाण्यात घालता येतील असे सोपे पर्याय (How To Reduce Sweat odor 5 things you can add in Bath Water)...

१. बाथ सॉल्ट 

म्हणजेच चक्क मीठाच्या पाण्याने आंघोळ करणे. मीठामध्ये असणापे कॅल्शियम आणि पोटॅशियम हे घटक थकवा घालवण्यासाठी उपयुक्त असतात. तसेच उन्हामुळे झालेले टॅनिंग दूर करण्यासाठी, त्वचेला येणारी खाज, कोरडेपणा दूर करण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. यासाठी १ बादली पाणी असल्यास १ चमचा मीठ घालावे. ते १० मिनीटे पाण्यात चांगले विरघळू द्यावे आणि मग त्या पाण्याने आंघोळ करावी. 

(Image : Google)

२. लिंबू   उन्हाळ्यात सरबतासाठी वापरले जाणारे लिंबू घामाचा वास निघून जाण्यासाठीही अतिशय फायदेशीर असते. काखेत, मानेत, जांघेत ज्याठिकाणी जास्त घाम येतो अशा ठिकाणी लिंबाची फोड चोळायची. हे लावताना लिंबाच्या फोडीला मीठ, कॉर्नस्टार्च लावल्यास त्याचा चांगला फायदा होतो. 

३. बेकींग सोडा

स्वयंपाकात वापरला जाणारा बेकींग सोडा उन्हाळ्यात घामासाठी वापरावा. बेकींग सोडा पावडरसारखा वापरावा. पावडर ज्याप्रमाणे काखेत किंवा अंगावर टाकतो त्याचप्रमाणे बेकींग सोडा अंगावर टाकावा, थोडा वेळाने झटकून टाकावा. एक कप पाण्यात २ चमचे बेकींग सोडा घालून ते पाणी स्प्रे बॉटलने घाम येतो त्याठिकाणी स्प्रे करावे. यामुळे घाम कमी होण्यास मदत होते. 

४. यु डी कलोन

अंगाचा घामाचा वास जाण्यासाठी हा अतिशय उपयुक्त असा पदार्थ आहे. आंघोळीच्या पाण्यात यु डी कलोन घातल्यास अंगाला छान सुगंध येतो. हा सुगंध दिर्घकाळ तसाच राहत असल्याने आंघोळ झाल्यावर परफ्यूम, बॉडी स्प्रे मारण्याची आवश्यकता नसते. 

(Image : Google)

५. गुलाब पाणी 

अंगाला चांगला वास यावा यासाठी हा अतिशय उत्तम उपाय आहे. नैसर्गिक गोष्टीपासून नैसर्गिक पद्धतीने केले जाणारे हे गुलाब पाणी त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. गुलाब पाणी आपण घरच्या घरीही करु शकतो. अंगाला दिर्घकाळ गुलाबाचा वास येत राहिल्याने आपल्यालाही छान वाटते. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्ससमर स्पेशलहोम रेमेडी