Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > युरीक ॲसिड सारखं वाढतंय? आहारात अजिबात घेऊ नका ४ गोष्टी, तब्येत राहील ठणठणीत

युरीक ॲसिड सारखं वाढतंय? आहारात अजिबात घेऊ नका ४ गोष्टी, तब्येत राहील ठणठणीत

How to Reduce Uric Acid Naturally Uric acid Causes, Treatment, Diet : आहारात कोणत्या गोष्टी टाळल्यास युरीक अॅसिड वाढण्याचा धोका टळू शकतो ते पाहूया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2022 12:45 PM2022-08-22T12:45:36+5:302022-08-22T13:13:16+5:30

How to Reduce Uric Acid Naturally Uric acid Causes, Treatment, Diet : आहारात कोणत्या गोष्टी टाळल्यास युरीक अॅसिड वाढण्याचा धोका टळू शकतो ते पाहूया...

How to Reduce Uric Acid Naturally Uric acid Causes, Treatment, Diet : Is uric acid increasing? Don't take 4 things in your diet, your health will be poor | युरीक ॲसिड सारखं वाढतंय? आहारात अजिबात घेऊ नका ४ गोष्टी, तब्येत राहील ठणठणीत

युरीक ॲसिड सारखं वाढतंय? आहारात अजिबात घेऊ नका ४ गोष्टी, तब्येत राहील ठणठणीत

Highlightsगोळ्याऔषधे घेण्याबरोबरच आहारात थोडे बदल केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. तब्येतीची काळजी घ्यायची तर आपली जीवनशैली संतुलित असायला हवी.

युरीक ॲसिड हे आपल्या शरीरातील आवश्यक घटकांपैकी एक असले तरी ते वाढले किंवा कमी झाले तर आरोग्याच्या विविध समस्या उद्भवू शकतात. युरिक ऍसिडच्या वाढीला Hyperuricemia देखील म्हणतात. सामान्यत:  शरीर मूत्र आणि मूत्रपिंडांद्वारे युरीक ॲसिड फिल्टर करते, परंतु जर शरीर ते फिल्टर करू शकत नसेल तर हे युरीक ॲसिड रक्तात जमा होऊ लागते. एकदा युरीक ॲसिड जमा व्हायला लागले की सांधेदुखी, गाऊट किंवा विविध प्रकारच्या समस्या उद्भवतात (How to Reduce Uric Acid). आता शरीरात युरीक ॲसिड वाढण्याची नेमकी कारणं काय? तर यासाठी बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात (Uric acid Causes, Treatment, Diet, Reduce Uric Acid Level Naturally).

अनुवांशिकता, चुकीचा आहार, जंक फूड किंवा प्रोसेस्ड फूड यांमुळेही युरीक ॲसिड वाढण्याची शक्यता असते. जास्त वेळ रिकाम्या पोटी राहणे, लठ्ठपणा आणि जास्त ताण घेणे ही शरीरातील युरीक ॲसिड वाढण्याची आणखी काही कारणे आहेत. आता हे वाढलेले युरीक ॲसिड कमी करायचे कसे असा प्रश्न जर आपल्याला पडत असेल तर त्यासाठी गोळ्याऔषधे घेण्याबरोबरच आहारात थोडे बदल केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. यासाठी आहाराकडे लक्ष देणे महत्त्वाचे असून त्यादृष्टीने प्रयत्न करायला हवेत. आता आहारात कोणत्या गोष्टी टाळल्यास युरीक अॅसिड वाढण्याचा धोका टळू शकतो ते पाहूया...

१. अँकोवी

हा एकप्रकारचा मासा आहे. यामुळे शरीरातील युरीक अॅसिडची पातळी वाढू शकते. साधारणपणे मासे हे कॉर्ड लिव्हर ऑईलचा उत्तम स्त्रोत असते. तसेच माशांमुळे त्वचा, केस, हृदयाचे आरोग्य, हाडांचे आरोग्य चांगले राहत असल्याने आहारात मासे खावेत असे सांगितले जाते. पण अँकोवी हा मासा जास्त प्रमाणात खाल्ल्यास युरीक ॲसिडची पातळी वाढविण्यास कारणीभूत ठरु शकतो. 

२.  सोयाबिन 

सोयाबिन आरोग्यासाठी फायदेशीर असतात असं आपण अनेकदा वाचतो किंवा ऐकतो. नॉनव्हेजला पर्याय म्हणून खाल्ले जाणारे सुके सोयाबीन बरेच जण आवडीने खातात. याची कोरडी भाजी, रस्सा भाजी, भात, पोळी यांच्यासोबत चांगली लागते. पण तुम्हाला युरीक ॲसिडचा त्रास असेल तर हे सोयाबिन अजिबात खाऊ नयेत. 

३. मटार 

मटार हा आपल्यापैकी अनेकांची आवडीची गोष्ट. सध्या बाजारात ताजा मटार कमी प्रमाणात उपलब्ध असला तरी फ्रोजन मटार तर १२ महिनेही सहज उपलब्ध असतो. कधी एखादी पंजाबी भाजी करण्यासाठी तर कधी पावभाजी, पुलाव यांसारख्या पदार्थांमध्ये आपण मटार आवर्जून वापरतो. मात्र युरीक अॅसिडची समस्या असणाऱ्यांसाठी मटार काहीसा त्रासदायक ठरु शकतो. 

४. बिअर 

बिअर ही अनेकांसाठी स्टेटस सिम्बॉलची गोष्ट आहे. कधी एखाद्या ऑफीशियल पार्टीमध्ये तर कधी मित्रमंडळींसोबत हँगआऊट करताना बिअरशिवाय आपले पान हलत नाही. अनेकदा बिअर ही पार्टीपुरती मर्यादित न राहता तो सवयीचा भाग होऊन जातो. मात्र अशाप्रकारे नियमितपणे बिअर घेणे आरोग्यासाठी अनेक अर्थांनी घातक ठरु शकते. किडनी, यकृत यांच्या कामात अडथळा येण्यासाठी बिअर हे एक महत्त्वाचे कारण असते. 
 

Web Title: How to Reduce Uric Acid Naturally Uric acid Causes, Treatment, Diet : Is uric acid increasing? Don't take 4 things in your diet, your health will be poor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.