Join us   

कानात मळ झाला, कानाला दडे बसले तर घरच्याघरी अघोरी उपाय करताय? डॉक्टर सांगतात, बहिरे व्हाल कारण..

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 11:31 AM

How To Removal Ear Wax Easily At Home : कानात मळ जमा झाल्याने आरोग्याच्या गंभीर समस्याही उद्भवू शकतात.

कानात मळ जमा होणं ही सामान्य समस्या आहे. कानात जमा  झालेला मळाचा आपल्या आरोग्याशी घनिष्ट संबंध असतो.  (Ear Wax Removal tips) कानातील मळ डेड सेल्स, फॅट आणि लहान केसांपासून तयार झालेला असतो. कानात झालेला मळ काढण्यासाठी अघोरी उपाय करु नयेत. कानात टोकदार वस्तू, काडी, पिना घालून मळ काढू नये त्यामुळे कानाच्या पडद्याला इजा होऊ शकते. (How to Remove Ear Wax)

क्लिव्हलॅण्ड क्लिनिकच्या रिपोर्टनुसार अनेकदा कान स्वच्छ करण्याच्या प्रयत्नांमुळे फायद्यांपेक्षा समस्याच जास्त उद्भवू शकतात. डॉ, गुयेन ह्यून सांगतात की कानांतील मेण बाहेरचा थर बाहेर निघाल्यानंतर निघते. जर कानात कमी प्रमाणात मळ असेल तर ते स्वच्छ करण्यसााठी कमीत कमी हायड्रोजनन पॅरोक्साईडचा वापर करू शकता.  काहीजण कानात ऑलिव्ह ऑईलसुद्धा घालतात  ते साफ करताना मेण बाहेर पडते. ज्यामुळे कानांच्या बाहेरील भागांना वंगण मिळते.   

कानात मळ जमा झाल्याने नलिका ब्लॉक होऊ शकतात. ज्यामुळे ऐकण्याच्या  क्षमतेवर परिणाम होतो. ही स्थितीत विशेषत: वयस्कर लोकांमध्ये उद्भवते. कानात अत्याधिक मळ जमा झाल्याने वेदना होऊ शकतात. त्यामुळे गंभीर समस्या उद्भवतात. कानात जास्त मळ जमा झाल्याने टिनिटस होऊ शकतो. ज्यामुळे कानात घंटा वाजल्यासारखं वाटणं, उगाच आवाज ऐकू येणं अशा समस्या उद्भवतात. कानात खाज, संक्रमणाचं कारण ठरते.  बॅक्टेरिया आणि फंगसच्या विकासासाठी वातावरण तयार होतं. . कानात मळ जमा झाल्यास आतल्या भागावर दबाव येतो. 

कानातला मळ काढण्यासाठी या गोष्टी करू नका

1) कानातला मळ बाहेर निघावा यासाठी  काही गोष्टी करणं पूर्णपणे टाळायला हवं. कानात टोकदार वस्तू घालणं, पिन घालणं जराही योग्य नाही.

मुलांवर चांगले संस्कार व्हावे असं वाटतं? सद्गुरू सांगतात, आईबाबांनी करायलाच हव्या ५ गोष्टी

2) घरगुती उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या. कारण घरगुती  उपाय करून कानांमध्ये इजा झाल्यास वेदना जाणवणं, श्रवणशक्ती कमी होणं, चक्कर  येणं, टिनिटस अशा समस्या उद्भवू शकतात.

दुपारी की रात्री? भात खाण्याची योग्य वेळ कोणती? पोटभर खाऊनही वजन वाढणार नाही

3) कानांमध्ये कॉटन स्वॅब घालण्याची सवय अनेकांना असते पण डॉक्टर सांगतात की या सवयीमुळे कानातील मळ मागे ढकलला जातो. कानाच्या पडद्यांना धोका उद्भवतो. इन्फेक्शनचा धोका वाढतो.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य