Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > लांबचं भुरकट दिसतं-चष्माही नकोसा वाटतो? ५ आयुर्वेदीक उपाय, डोळ्यांची ‘अशी’ घ्या काळजी

लांबचं भुरकट दिसतं-चष्माही नकोसा वाटतो? ५ आयुर्वेदीक उपाय, डोळ्यांची ‘अशी’ घ्या काळजी

How to Remove Glasses From Eyes : डोळ्यांना चष्मा नको असेल तर रोज डोळ्यांचे व्यायाम करा.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 03:45 PM2024-09-23T15:45:54+5:302024-09-23T17:51:05+5:30

How to Remove Glasses From Eyes : डोळ्यांना चष्मा नको असेल तर रोज डोळ्यांचे व्यायाम करा.

How to Remove Glasses From Eyes How To Get Rid Of Spectacles | लांबचं भुरकट दिसतं-चष्माही नकोसा वाटतो? ५ आयुर्वेदीक उपाय, डोळ्यांची ‘अशी’ घ्या काळजी

लांबचं भुरकट दिसतं-चष्माही नकोसा वाटतो? ५ आयुर्वेदीक उपाय, डोळ्यांची ‘अशी’ घ्या काळजी

चुकीची लाईफस्टाईल, अन्हेल्दी खाण्यापिण्याच्या सवयी, गरजेपेक्षा जास्त स्क्रीन पाहणं, ताण-तणाव घेणं यामुळे  लोकांच्या आयसाईटवर चुकीचा परिणाम होत आहे. डोळे कमजोर झाल्यामुळे अनेक लोक चष्मा लावतात तर काहीजण लेंस लावतात. (How To Get Rid Of Spectacles) तुम्हीसुद्धा डोळ्यांची क्षमता सुधारण्यासाठी चष्मा किंवा लेंस लावू शकता.  पण जर तुम्ही नैसर्गिकरित्या काही उपाय केले तर डोळे चांगले राहण्यास मदत होईल. ( How to Remove Glasses From Eyes)

आचार्य बालकृष्ण सांगतात की सकाळी  उठल्यानंतर तोंडावर पाणी  शिंपडून मारा. पाणी मारताना  डोळे उघडे असतील याची काळजी घ्या. डोळे चांगले राहण्यासाठी रोज १ ते २ मिनिटं ही प्रक्रिया फॉलो करा. प्राणायम तुमच्या डोळ्यांच्या आरोग्याबरोबरच तुमच्या ओव्हरऑल हेल्थसाठीही फायदेशीर ठरते.

१) जर तुम्ही खरंच चष्म्याला गुड बाय म्हणू इच्छित असाल तर आयसाईड इम्प्रुव्ह करण्यासाठी तुम्ही दुधात त्रिफळा घालून याचे सेवन करू शकता. ज्यामुळे डोळ्यांवर सकारात्मक परिणाम होतो. डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आपली लाईफस्टाईल  सुधारण्याकडे लक्ष द्या. 

२) वेळेवर झोपणं, वेळेवर उठणं, स्क्रीन टाईम कमी  करणं, ताण-तणाव कमी घेणं या सवयी विकसित करून तुम्ही आपल्या आयसाईट्स चांगल्या ठेवू शकता.

शरीर निरोगी, धडधाकट ठेवण्यासाठी किती खावं, किती झोपावं? सद्गुरू सांगतात सोपं गणित

३) जर तुम्हाला डोळ्यांचा चश्मा काढून टाकायला असेल तर सगळ्यात आधी एक काम करावं लागेल. यासाठी हिरव्या गवतावर अनवाणी पायांनी चाला असं केल्यानं डोळे चांगले राहण्यास मदत होईल.

४) डोळ्यांना चष्मा नको असेल तर रोज डोळ्यांचे व्यायाम करा. डोळ्यांची बुबुळं एकदा डावीकडे, एकदा उजवीकडे फिरवा, हा व्यायाम तुम्हाला रोज करावा लागेल. जेणेकरून चष्मा काढून टाकता येईल.

५) चष्म्यापासून सुटका मिळवण्यासाठी रोज सकाळी गरम पाणी प्या. असं केल्यानं डोळ्यांना गारवा वाटेल ज्यामुळे तुमची पाहण्याची क्षमता सुधारेल.

बाथरूममधून गोम-गांडूळ बाहेर येतात? ३ उपाय-किचन असो की हॉल एकही गांडूळ दिसणार नाही

 सकाळी उठून ध्यान करायला हवं ज्यामुळे फक्त मनाला शांती मिळत नाही तर डोळेही चांगले राहतात.  रोज ध्यान केल्यानं डोळे चांगले राहण्यास मदत होते. 

Web Title: How to Remove Glasses From Eyes How To Get Rid Of Spectacles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.