चेहऱ्याची शोभा दातांमुळे वाढते (Teeth Cleaning Tips). दात पांढरेशुभ्र असतील तर, चारचौघात हसायला लाज नाही वाटत (Teeth). शिवाय खाताना, बोलताना किंवा हसताना आपण दात बिनधास्त दाखवू शकतो. पण दात पिवळट, किडले असतील तर आपण दात दाखवणं टाळतो. दात पिवळट झाले असतील तर, आपण सहसा टूथपेस्टने दात घासतो. पण दात घासूनही दातांचा पिवळटपणा निघत नसेल तर, आपण काही घरगुती उपाय करून पाहतो.
घरगुती उपायांमध्ये आपण अधिक करून तेल किंवा मिठाचा वापर करतो. तेल किंवा मिठामुळे खरंच दात स्वच्छ होतात का? दात स्वच्छ करण्यासाठी मीठ किंवा तेलाचा वापर करणे टाळा. यामुळे दातांचे नुकसान होऊ शकते. दात स्वच्छ करण्यासाठी कोणतं तेल वापरू नये, याची माहिती डेण्टिस्ट डॉ. शिल्पी कौर यांनी दिली आहे(How to remove plaque and tartar: Best home treatments).
मीठ आणि 'या' तेलामुळे दात खराब होतात
डेण्टिस्ट डॉ. शिल्पी कौर सांगतात, 'दातांसाठी कोणतेही उपचार करू नये. बऱ्याचदा आपण दातांवर मोहरीचे तेल आणि मिठाचा वापर करतो. मोहरीचे तेल आणि मीठ दातांवर लावल्यास हिरड्या मजबूत होतात आणि दातांना चमक येते हे आपण ऐकलंच असेल. पण याचा नियमित वापर केल्यास दात खराब होतात.
थुलथुलीत पोट होईल सपाट - बॅड कोलेस्टेरॉलही येईल नियंत्रणात; फक्त रोज चमचाभर 'ही' चटणी खा
याचा वापर एक किंवा दोनदा केल्यास दातांचा पिवळेपणा दूर होईल. पण याचा नियमित वापर केल्यास दातांवरील इनॅमलचा वरचा थर हळूहळू निघून जाईल. ज्यामुळे दातांमध्ये पोकळ होऊ लागेल. कारण मिठामुळे हिरड्या खडबडीत होतात. सूज निर्माण होते. हिरड्या कमकुवत झाल्यास दातांचा मजबूतपणा कमी होतो.'
याबद्दल डेण्टिस्ट पुढे म्हणतात, 'मीठ आणि मोहरीचे तेल यासह हळद आणि बेकिंग सोडा देखील दातांसाठी घातक ठरते. या घरगुती उपायांमुळे दातांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे दात कायमचे खराब होऊ शकतात.'
हातापायांच्या काड्या पण पोट मात्र खूप सुटलंय? ५ सोप्या टिप्स, शरीर सुडौल -पोट होईल कमी
दातांना मोहरीचे तेल आणि मीठ लावण्याचे दुष्परिणाम
दातांना मीठ आणि तेल लावल्याने बॅक्टेरिया नष्ट होतात. पण यामुळे इतरही हानी होऊ शकतात. महिन्यातून १ किंवा २ वेळा आपण याचा वापर करू शकता. याचा काहींना फायदा होईल. काहींचे दातखराब होऊ शकतात. त्यामुळे डेण्टिस्टच्या सल्ल्याशिवाय याचा वापर करू नये.