Join us   

चष्म्याचा नंबर कमी करायचाय? तर आजच करा ५ गोष्टी; नजर राहील चांगली, दृष्टी सुधारेल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 5:56 PM

How to Remove Specs Permanently : डोळ्यांच्या समस्या दूर ठेवण्यसाठी आहारात व्हिटामीन्सयुक्त पदार्थांचा समावेश करा.

डोळे आपल्या शरीराचा अभिवाज्य भाग आहे. लहानपणापासूनच डोळ्यांची योग्य काळजी घेतली नाही तर तारूण्यात डोळ्यांच्या अनेक समस्या उद्भवतात. रात्रभर मोबाईल पाहणं, टीव्ही, कॉम्प्युटर आणि मोबाईलमधून निघणाऱ्या किरणांच्या सतत संपर्कात राहिल्याने डोळ्यांवर होतो. (How to Remove Specs Permanently) त्यामुळेच आजकाल लहान मुलांची दृष्टीही कमी होऊ लागली असून त्यांनाही चष्म्याची गरज भासू लागली आहे. चष्मा घालवण्यासाठी कोणत्या सोप्या टिप्स वापरता येतील ते पाहूया. (Home Remedies To Get Rid Of Spectacles)

व्हिटामीन्सयुक्त डाएट

डोळ्यांच्या समस्या दूर ठेवण्यसाठी आहारात व्हिटामीन्सयुक्त पदार्थांचा समावेश करा. गाजर, आवळा, रताळे, भोपळा या पदार्थांच्या सेवनानं दृष्टी सुधारण्यास मदत होते. गाजरात फॉस्फरस, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि लोह असते, जे डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. संत्री, आवळा, टोमॅटो, लाल शिमला मिरचीमध्ये जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी असते, जे डोळ्यांसाठी फायदेशीर आहे.

झोपण्याआधी या पदार्थांचे सेवन करा

झोपण्यापूर्वी एक चमचा आवळा पावडर खाल्ल्याने दृष्टी वाढते. बदाम, बडीशेप आणि साखर कँडी समान प्रमाणात मिसळून पावडर बनवा. 10 ग्रॅम तयार मिश्रण 250 मिली दुधात मिसळा आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी सेवन करा. त्यामुळे दृष्टी सुधारते .

व्यायाम

दृष्टी वाढवण्यासाठी काही व्यायाम नियमित केले पाहिजेत. मानेचे आणि चेहऱ्याचे व्यायाम दृष्टी सुधारण्यास मदत करतात. यासोबतच डोळ्यांना पुरेशी झोप आणि विश्रांती देणेही आवश्यक आहे.

पेंड्युलम व्यायाम

तुमचे डोळे पेंड्युलमसारखे एका काठावरुन दुसरीकडे हलवा. हा व्यायाम  स्नायूंवर परिणाम करतो आणि लेन्सवर लक्ष केंद्रित करतो. ताण कमी करण्यासाठी, दोन्ही तळवे एकत्र चोळून उष्णता निर्माण करा. त्यानंतर डोळे बंद करून तळवे डोळ्यांवर ठेवा. यादरम्यान डोळ्यांवर हात ठेवताना प्रकाश अजिबात येऊ नये याची विशेष काळजी घ्यावी. हे दिवसातून 3-4 वेळा करा.

 

तांब्याच्या भांड्यातले पाणी प्या

रात्रभर तांब्याच्या भांड्यात एक लिटर पाणी ठेवा आणि सकाळी उठून हे पाणी प्या. तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेले पाणी शरीरासाठी विशेषतः डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असते.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य