Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > How to Remove Worms from Vegetables : कोबी, पालक, भेंडी; भाज्यांमध्ये सापडणाऱ्या अळ्या, किडे काढून टाकण्यासाठी वापरा 'ही' सोपी ट्रीक

How to Remove Worms from Vegetables : कोबी, पालक, भेंडी; भाज्यांमध्ये सापडणाऱ्या अळ्या, किडे काढून टाकण्यासाठी वापरा 'ही' सोपी ट्रीक

How to Remove Worms from Vegetables : काही लोक भाज्यांना स्वच्छ करण्यासाठी बारीक चिरतात, परंतु ही पद्धत योग्य नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 07:24 PM2022-04-10T19:24:06+5:302022-04-10T19:46:55+5:30

How to Remove Worms from Vegetables : काही लोक भाज्यांना स्वच्छ करण्यासाठी बारीक चिरतात, परंतु ही पद्धत योग्य नाही.

How to Remove Worms from Vegetables : How to remove worms from cabbage and other vegetables | How to Remove Worms from Vegetables : कोबी, पालक, भेंडी; भाज्यांमध्ये सापडणाऱ्या अळ्या, किडे काढून टाकण्यासाठी वापरा 'ही' सोपी ट्रीक

How to Remove Worms from Vegetables : कोबी, पालक, भेंडी; भाज्यांमध्ये सापडणाऱ्या अळ्या, किडे काढून टाकण्यासाठी वापरा 'ही' सोपी ट्रीक

भाज्यांमधून अळ्या बाहेर येणं काही नवीन नाही. आजकाल बहुतेक भाज्यांमध्ये पांढरे आणि हिरवे किडे दिसतात. काही वेळा ते वारंवार साफ करूनही तसेच राहतात आणि पानांमध्ये लपलेले हे किडे दिसत नाहीत. तज्ज्ञांच्या मते, भाज्यांमध्ये पडलेले किडे खाल्ल्याने गंभीर आजार होऊ शकतात. (How to Remove Worms from Vegetables) त्यामुळे जेव्हाही आपण भाज्या धुतो तेव्हा त्यात एकही किडा शिल्लक नाही ना हे पाहणे अत्यंत आवश्यक आहे.

काही लोक भाज्यांना  स्वच्छ करण्यासाठी बारीक चिरतात, परंतु ही पद्धत योग्य नाही. आज तुम्‍हाला काही सोप्या पद्धती सांगणार आहोत, ज्याच्‍या मदतीने भाज्यांमध्‍ये किटक, अळ्या सहज काढू शकता. फुलकोबी, ब्रोकोली, पालक इत्यादी अनेक भाज्या आहेत ज्यात कीटक दिसतात. अशा परिस्थितीत, या पद्धतींच्या मदतीने त्या भाज्या स्वच्छ केल्या जाऊ शकतात. ( How to remove worms from cabbage and other vegetables)

फ्लॉवरमधून किडे काढण्याची सोपी पद्धत

यासाठी, तुम्ही फ्लॉवरचे 4 भाग करू शकता, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही त्याचे 5 भाग देखील करू शकता. आकारानुसार कट करा, पण मोठ्या आकारात ठेवा. आता एका पातेल्यात किंवा मोठ्या भांड्यात पाणी गरम करा आणि त्यात १ चमचा हळद एकत्र करा.  गरम पाण्यात फ्लॉवर 5 मिनिटे बुडवून ठेवा आणि त्यानंतर गॅस बंद करा. आता फ्लॉवर बाहेर काढा आणि पुन्हा एकदा सामान्य पाण्याने स्वच्छ करा. जंत बाहेर येतील आणि आता तुम्ही ते भाज्या किंवा इतर कोणत्याही डिशसाठी वापरू शकता.

 नसांमध्ये साचलेलं घातक कोलेस्ट्रॉल कमी करतात ५ पदार्थ; गंभीर आजारदूर ठेवण्यासाठी आजपासूनच खा

ब्रोकोली स्वच्छ करण्याची पद्धत

ब्रोकोली आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु ती खाण्यापूर्वी व्यवस्थित स्वच्छ करणे खूप महत्वाचे आहे. ब्रोकोलीमध्ये असलेले कीटक साफ करण्यासाठी, प्रथम त्याचा मागील भाग कापून टाका आणि सर्व फुले वेगळी करा. आता एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करून त्यात २ चमचे मीठ मिसळा. आता या पाण्यात ब्रोकोली बुडवून अर्धा तास राहू द्या. अर्ध्या तासानंतर, पुन्हा एकदा सामान्य पाण्याने स्वच्छ करा, नंतर सेवन करा.

पत्ता कोबीमधून किडे काढण्याची सोपी पद्धत

अनेकदा कोबीमध्ये लपलेले कीटक दिसत नाहीत, त्यामुळे लोक पावसाळ्यात ते खाणे टाळतात. कोबीतून जंत काढायला वेळ लागत असला तरी ते सहज साफ होतात. यासाठी एका भांड्यात कोबीचे सर्व थर आणि कोमट पाणी ठेवा आणि त्यात 1 चमचे हळद मिसळा. आता सर्व पाने कोमट पाण्यात बुडवून ठेवा आणि सुमारे 10 मिनिटे सोडा. 10 मिनिटांनंतर, कोमट पाण्यातून कोबीची पानं काढून टाका. आणि स्वच्छ पाण्यात धुवा. असे केल्याने सर्व किडे निघून जातील आणि कोबीची सर्व पाने स्वच्छ दिसतील.

केस दिवसेंदिवस जास्तच पांढरे होत चाललेत? स्वयंपाकघरातील ३ उपाय,काळेभोर केस राहतील कायम

पालकाच्या भाजीतून अळ्या कशा काढाल?

पालकाच्या पानांवर किडे येऊ नयेत म्हणून बहुतांश शेतकरी रसायनयुक्त कीटकनाशकांचा वापर करतात, जे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही.  पालक घरी आणल्यास कोमट पाण्यात १/२ चमचे मीठ मिसळा. आता त्यात पालक 10 मिनिटे बुडवून ठेवा आणि नंतर सामान्य पाण्याने पुन्हा स्वच्छ करा. यानंतर, भाज्या किंवा इतर पदार्थ बनविण्यासाठी वापरा.
 

Web Title: How to Remove Worms from Vegetables : How to remove worms from cabbage and other vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.