Join us   

डोक्यात सतत विचार-रात्री झोप येत नाही? झोपण्याच्या १० मिनिटंआधी १ काम करा, गाढ झोप लागेल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 9:06 PM

How to Sleep Quicky According to Havard Health : रात्री चांगली झोप घेण्यासाठी तुम्ही दिवसा झोपणं टाळायला हवं.

लहानपणापासून आपल्याला सांगितलं जातं की वेळेवर झोपणं फार महत्वाचे असते. यासाठी आई वडील शिस्तसुद्धा लावतात, वय कितीही असो वेळेवर रूटीन फॉलो करून खाणं आणि झोपणं फार महत्वाचं आहे.  अशा स्थितीत लाईफस्टाईल आणि स्ट्रेसमुळे रात्रीची झोप उडते. एक्सपर्ट डॉ. चित्रा आनंद यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्यांनी चांगली झोप येण्यासाठी काही टिप्स शेअर केल्या आहेत. (How to Sleep Quicky According to Havard Health do These 5 Thing for Good Sleep)

हार्वर्ड हेल्थच्या रिपोर्टनुसार रात्री चांगली झोप येण्यासाठी फोन कॉल्स, मेसेज, इमेल्सना उत्तर देणं टाळा.  झोपेच्या वेळेत कोणाशीही संपर्क साधू नका. नियमित व्यायाम करा. व्यायाम केल्यानं तुमच्या शरीरात रक्ताभिसरण व्यवस्थित राहील शरीराला व्यायामामुळे थोड्या फार प्रमाणात थकवा येतो शरीराला आरामाची गरज असते ज्यामुळे लवकर झोप येते. 

चांगल्या झोपेसाठी रूम टेम्परेचर योग्य असावं

ताण-तणावपूर्ण जीवनात योग्य पद्धतीने झोपण्यासाठी वातावरणाची काळजी घेणं फार महत्वाचे असते. रूम टेम्परेचर सेट करायला हवं. गरमीच्या दिवसांच एअर कंडीशनरचं तापमान  आपल्या शरीरापासून एक डिग्री कमी ठेवा. असं केल्यानं तुमचा ताण-तणाव कमी होईल आणि चांगली झोप येण्यास मदत होईल.

दिवसभराच्या धावपळीच्या  जीवनात अनेक लोक झोपण्याच्या आधी अंघोळ करणं पसंत करतात. पण रात्री अंघोळ करण्यासाठी थंड पाण्याचा वापर करायला हवा. असं केल्यानं शरीर चांगले राहील थकवा जाणवणार नाही आणि फ्रेश वाटेल. 

चांगल्या झोपेसाठी वॉटर बॅग

रात्रभर कुशी बदलल्यानंतरही झोप येत नसेल तर तुम्ही वॉटर बॅगची मदत घेऊ शकता. यासाठी थंड पाण्याने भरलेली वॉटर बॅग आपल्या पायांच्यामध्ये ठेवा. अस केल्यानं तुमची  स्ट्रेस लेव्हल कमी होईल आणि चांगली झोप येण्यास मदत होईल.

दिवसा झोपू नका

रात्री चांगली झोप घेण्यासाठी तुम्ही दिवसा झोपणं टाळायला हवं.  दिवसा १ तासापेक्षा जास्त झोप घेऊ नका. यामुळे रात्रीच्या झोपेवर परिणाम होतो आणि  रात्रीच्यावेळी तासनतास झोप येत नाही. तुम्ही रात्री जे काही खाता ज्याचा तुमच्या झोपेवर परिणाम होतो. म्हणून झोपण्याच्या  २ ते ३ तास आधी जेवण करा. जेणेकरून संपूर्ण शरीर व्यवस्थित जेवण पचवू शकेल आणि पचनक्रिया चांगली राहील.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल