Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > How to sleep within 2 minutes : कितीही स्ट्रेस असू दे फक्त २ मिनिटात शांत झोप येईल; पडल्या पडल्या झोपण्याची सोपी ट्रिक 

How to sleep within 2 minutes : कितीही स्ट्रेस असू दे फक्त २ मिनिटात शांत झोप येईल; पडल्या पडल्या झोपण्याची सोपी ट्रिक 

How to sleep within 2 minutes : नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनवर प्रकाशित 2017 चा अभ्यास दर्शवितो की पंजाबमधील 83.4% लोकसंख्येला झोपेचा विकार होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 11:58 AM2022-09-26T11:58:25+5:302022-09-26T12:49:03+5:30

How to sleep within 2 minutes : नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनवर प्रकाशित 2017 चा अभ्यास दर्शवितो की पंजाबमधील 83.4% लोकसंख्येला झोपेचा विकार होता.

How to sleep within 2 minutes :  Try these simple and effective us navy formula to fall-asleep in just 2 minutes | How to sleep within 2 minutes : कितीही स्ट्रेस असू दे फक्त २ मिनिटात शांत झोप येईल; पडल्या पडल्या झोपण्याची सोपी ट्रिक 

How to sleep within 2 minutes : कितीही स्ट्रेस असू दे फक्त २ मिनिटात शांत झोप येईल; पडल्या पडल्या झोपण्याची सोपी ट्रिक 

झोप न लागणे किंवा झोप उशीरा येणं असे झोपेचे विकार वाढत आहेत. तज्ज्ञांच्या मते, उशिरापर्यंत काम करणे, टीव्ही आणि स्मार्टफोनमध्ये रात्री उशिरापर्यंत लक्ष देणं यासारख्या अनेक कारणांमुळे झोपेचा त्रास होतो. पुरेशी झोप न मिळाल्याने मधुमेह, हृदयविकाराचा झटका आणि कर्करोग यांसारख्या अनेक गंभीर आजारांचा धोकाही वाढू शकतो. (Try these simple and effective us navy formula to fall-asleep in just 2 minutes)

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनवर प्रकाशित 2017 चा अभ्यास दर्शवितो की पंजाबमधील 83.4% लोकसंख्येला झोपेचा विकार होता. 78.2% लोकांना तीव्र निद्रानाश होता आणि 29.2% लोकांना निद्रानाशाची सौम्य लक्षणे होती. 78.4% लोकांमध्ये झोपेची गुणवत्ता खराब होती. या डेटावरून झोपेचे विकार किती वेगाने वाढत आहेत याची कल्पना येऊ शकते. (Effective us navy formula to fall-asleep in just 2 minutes)

झोप लागण्यासाठी काय उपाय आहेत?

जर तुम्हीही झोप न येण्याच्या समस्येने ग्रासले असाल आणि तुम्ही त्यावर काही सोपे उपाय करून ही समस्या टाळू शकता.  सर्वात चांगली गोष्ट म्हणजे येथे आम्ही तुम्हाला कोणतेही औषध किंवा घरगुती उपाय सांगत नसून अमेरिकन सैनिक वापरत असलेल्या सूत्राबद्दल सांगत आहोत. 1981 मध्ये, 'रिलॅक्स अँड विन: चॅम्पियनशिप परफॉर्मन्स' या पुस्तकात अमेरिकन सैनिकांच्या पटकन झोपण्यासाठी वापरल्या जाणार्‍या पद्धतीचा उल्लेख केला होता. त्यानंतर सर्वसामान्यांमध्ये त्याची अंमलबजावणी सुरू झाली.

नवरात्रीत युनिक, ग्लॅमरस लूक मिळेल, ५ मेकअप टिप्स; गरबा खेळताना उठून दिसाल

joe.co.uk मधील एका अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की लवकर झोपी जाण्याच्या या  तंत्रामुळे सैनिकांची कामगिरी खालावल्याचे लक्षात आले याचे कारण लष्कर प्रमुखांनी शोधून काढले. थकवा आणि झोपेच्या अभावामुळे अशा चुका झाल्या ज्या चांगल्या सैनिकाने केल्या नसाव्यात. ही पद्धत 6 आठवड्यांच्या चाचणीनंतर 96% प्रकरणांमध्ये यशस्वी ठरली.

विशेष म्हणजे या नियमाचा अवलंब करून तुम्ही फक्त 120 सेकंद किंवा दोन मिनिटांत झोपू शकता. या सूत्रामध्ये काही शारीरिक क्रिया आणि काही मानसिक क्रिया यांचा समावेश होतो.  

१) तुमची जीभ, जबडा आणि तुमच्या डोळ्याभोवतीच्या स्नायूंसह तुमच्या चेहऱ्यावरील स्नायूंना आराम द्या.

२) तुमचे खांदे शक्य तितके खाली करा. मग तुमचे हात, पाय पूर्णपणे रिलॅक्स करा.

३) शेवटची पायरी म्हणजे आकाशाकडे पाहा किंवा आकाशाचा फोटो व्यवस्थित पाहा यामुळे डोळ्यांना शांतता मिळेल आणि लवकर झोप लागेल. 

Web Title: How to sleep within 2 minutes :  Try these simple and effective us navy formula to fall-asleep in just 2 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.