Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > तूर, मूग नाही तर थेट कुळथाच्या डाळीने घटते वजन, सद्गुरु सांगतात प्रोटीनचा उत्तम सोर्स आहे ही डाळ

तूर, मूग नाही तर थेट कुळथाच्या डाळीने घटते वजन, सद्गुरु सांगतात प्रोटीनचा उत्तम सोर्स आहे ही डाळ

How to Sprout Horse Gram and Mung Beans | Yogic Superfood : कोण म्हणतं डाळीमुळे वजन - मसल्स तयार होत नाही? रोज एक वाटी कुळीथ डाळ खा-मग बघा कमाल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2024 08:36 PM2024-01-07T20:36:15+5:302024-01-07T20:37:36+5:30

How to Sprout Horse Gram and Mung Beans | Yogic Superfood : कोण म्हणतं डाळीमुळे वजन - मसल्स तयार होत नाही? रोज एक वाटी कुळीथ डाळ खा-मग बघा कमाल...

How to Sprout Horse Gram and Mung Beans | Yogic Superfood | तूर, मूग नाही तर थेट कुळथाच्या डाळीने घटते वजन, सद्गुरु सांगतात प्रोटीनचा उत्तम सोर्स आहे ही डाळ

तूर, मूग नाही तर थेट कुळथाच्या डाळीने घटते वजन, सद्गुरु सांगतात प्रोटीनचा उत्तम सोर्स आहे ही डाळ

कुळीथ (Horse Gram) हा प्रथिनांचा उत्तम स्रोत मानला जातो. शरीराला प्रथिनं मिळण्यासाठी अनेक लोक तूर, मसूर, उडीद, चणा आणि वाटाणेसारख्या डाळींचं सेवन करतात. पण याहून जास्त प्रथिने कुळिथाच्या डाळीतून शरीराला मिळते. कुळिथाच्या डाळीचा वापर मुख्यतः दाक्षिणात्य लोकं आपल्या आहारात करतात. ही डाळ दिसायला मसूर डाळीसारखे दिसते. पण याच्या सेवनाने शरीराला फक्त प्रोटीन नसून, इतरही आरोग्यदायी फायदे मिळतात.

शरीराला प्रोटीन मिळावे यासाठी आपण डाळ खातोच. पण इतर डाळींपेक्षा कुळिथाच्या डाळीमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. ईशा फाउंडेशनचे संस्थापक आणि प्रमुख सद्गुरु जग्गी वासुदेव सांगतात, 'कुळिथाची डाळ ही केवळ प्रथिनांचा उत्तम स्रोत नाही तर, अनेक गंभीर आजारांशी लढण्यास देखील मदत करते. शरीराला या डाळीतील गुणधर्म मिळावे असे वाटत असेल तर, काही तासांसाठी डाळ पाण्यात भिजत ठेवा (Cooking Tips). मग मोड आलेली डाळ खा. यामुळे पचनसंस्था सुधारते'(How to Sprout Horse Gram and Mung Beans | Yogic Superfood).

मोड आलेली कुळीथ डाळ फायदेशीर

कुळीथ डाळीमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. त्यातील गुणधर्मामुळे शरीर आतून गरम होते. त्यामुळे नेहमी मोड आलेली कुळीथाची डाळ खावी. ज्यामुळे ही डाळ सहज पचेल.

वजन कमी करताना चहा पिणं किती योग्य? चहा पिऊनही वजन कमी होऊ शकते? तज्ज्ञ सांगतात

शरीरात तयार करते उष्णता

सद्गुरूंच्या मते, कुळीथाच्या डाळीमुळे शरीरात उष्णता निर्माण होते. ज्यामुळे मसल्स बिल्ड आणि वजन कमी करण्यास मदत होते. शरीरातील उष्णता संतुलित ठेवायची असेल तर, कुळीथाची डाळ खाल्ल्यानंतर मोड आलेली हिरवे मुग खाऊ शकता. हिरव्या मुगामध्ये देखील प्रोटीनचे प्रमाण जास्त असते.

वजन कमी करण्यास होते मदत

कुळिथाच्या डाळीमध्ये प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यात आढळणारे घटक फॅट बर्नर म्हणून काम करतात. यासह एलडीएल कोलेस्टेरॉल कमी करून एचडीएल कोलेस्टेरॉल वाढवण्यास मदत करतात. शिवाय या डाळीमुळे पचनक्रियाही सुधारते.

सूर्यफुलाचं तेल वापरलं तर वाढलेलं वजन सरसर कमी होतं? तज्ज्ञ सांगतात, तेलाचा इफेक्ट

ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवते

कुळिथाची डाळ खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. यासह शरीरातील इन्शुलिन प्रतिरोधक क्षमता देखील सुधारते. एकूणच, ही मसूर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त ठरते.

हृदयासाठी फायदेशीर

या डाळीमध्ये लिपिड्स आणि फायबर असते. जे रक्तातील एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते. यासह हृदयाच्या नसांमध्ये अडकलेले खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यास मदत करते. ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशनमध्ये अडचण येत नाही.

Web Title: How to Sprout Horse Gram and Mung Beans | Yogic Superfood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.