Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > फक्त ४ गोष्टींची काळजी घ्या, पावसात कितीही भिजलात तरी तुम्ही आजारी पडणार नाही - एन्जॉय मान्सून...

फक्त ४ गोष्टींची काळजी घ्या, पावसात कितीही भिजलात तरी तुम्ही आजारी पडणार नाही - एन्जॉय मान्सून...

Health Tips for Monsoon Season: Staying Healthy and Active : पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आधीच काही गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2024 09:36 PM2024-06-26T21:36:01+5:302024-06-26T21:48:19+5:30

Health Tips for Monsoon Season: Staying Healthy and Active : पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आधीच काही गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे...

How to Stay Fit and Active During the Rainy Season How to Stay Fit During the Monsoon | फक्त ४ गोष्टींची काळजी घ्या, पावसात कितीही भिजलात तरी तुम्ही आजारी पडणार नाही - एन्जॉय मान्सून...

फक्त ४ गोष्टींची काळजी घ्या, पावसात कितीही भिजलात तरी तुम्ही आजारी पडणार नाही - एन्जॉय मान्सून...

महाराष्ट्रातील काही भागात पावसाला आता हळूहळू सुरुवात झाली आहे. पाऊस आला की कडक उन्हापासून आपली सुटका होते. पण या येणाऱ्या पावसाळ्या सोबतच अनेक आजार डोकं वर काढतात. पावसाळा हा ऋतू सगळ्यांचा तसा आवडीचा पण पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपासून स्वतःचा बचाव करणे गरजेचे असते. पावसाळा हा जितका आनंद देणारा असतो तितकाच आजारांना निमंत्रण देणाराही असतो(Monsoon Health Tips: How to Stay Fit and Active During Monsoon).

पावसाळ्यात (Health Tips for Rainy Season) व्हायरस आणि इतर संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे अनेकदा डासांच्या माध्यमांतून संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. सोबतच उघड्यावरचे अन्न, दूषित हवा, दूषित पाणी यामुळे आपण आजारी पडू शकतो. म्हणून पावसाळ्यात आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचे असते. पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आधीच कोणत्या गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे ते पाहूयात(How to Stay Fit and Active During the Rainy Season).

पावसाळा सुरू होण्यापूर्वी या ४ गोष्टी लक्षात ठेवा... 

१. हिरव्या पालेभाज्या खाणे टाळावे :-  पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाणे शक्यतो टाळावे. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढलेले असते. यामुळे हिरव्या पालेभाज्या लवकर खराब होण्याची शक्यता असते. याशिवाय पावसाळा सुरू होण्यापूर्वी हिरव्या पालेभाज्यांमध्ये किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते. अशा पालेभाज्या खाल्ल्याने आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी हिरव्या पालेभाज्या खाणे टाळावे.  

 दिवसभरात नेमके कोणत्या वेळी नारळ पाणी पिणे सर्वात फायदेशीर? तज्ज्ञ सांगतात योग्य वेळ...

२. स्ट्रीट फूड खाऊ नका :- पावसाळ्यात रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे. हवेतील आर्द्रतेमुळे रस्त्यावरील खाद्यपदार्थांवर घाण आणि प्रदूषणाचे कण जमा होतात. याशिवाय रस्त्यावरील खाद्यपदार्थांवर रस्त्यावरची घाण आणि बॅक्टेरियाही साचतात. अशा स्थितीत रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाल्ल्यास कॉलरा, उलट्या, जुलाब यांसारखे अनेक आजार होण्याचा धोका असतो. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच रस्त्याच्या कडेला असणाऱ्या ठेल्यावरील उघडे अन्नपदार्थ खाणे टाळावे.  

३. तळलेले अन्नपदार्थ खाऊ नका :- पावसाळा सुरू होण्यापूर्वी अपचन टाळण्यासाठी तळलेले अन्नपदार्थ खाणे टाळावे. खरंतर, पावसाळा सुरू होण्याआधीच, आपली पचनक्रिया थोडी मंदावते. त्यामुळे आपल्याला अन्न पचवण्यास त्रास होतो. अशा परिस्थितीत जास्त तळलेले अन्नपदार्थ खाल्ल्यास पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटीचा त्रास होतो. यासाठीच पावसाळा सुरू होण्यापूर्वी उकडलेले पदार्थ खाण्यावर अधिक भर द्यावा. 

४. दुग्धजन्य पदार्थ :- पावसाळा सुरू होण्यापूर्वीच हवेत आर्द्रतेचा थर जमा झालेला असतो. यामुळेच या हंगामात दूध, दही, ताक, चीज यांसारखे दुग्धजन्य पदार्थ लगेच खराब होतात. जर तुम्ही रोज दुग्धजन्य पदार्थ खात असाल तर आधी ते खाण्याआधी नीट तपासून पहावेत. दूध व्यवस्थित उकळल्यानंतरच प्या. कच्चे चीज खाणे टाळा. जर तुम्ही दही खात असाल तर ते बनवल्यानंतर किमान १ ते २ दिवसांत खाऊन संपवा.

पावसांत भिजल्यावर केस खूप ड्राय-रखरखीत होतात? पावसाळ्यात केसांची ‘अशी’ घ्या काळजी...

Web Title: How to Stay Fit and Active During the Rainy Season How to Stay Fit During the Monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.