Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > स्वतःचाच खूप राग येतो, वाटते आपण नालायक आहोत? ३ उपाय, पडाल स्वतःच्याच प्रेमात...

स्वतःचाच खूप राग येतो, वाटते आपण नालायक आहोत? ३ उपाय, पडाल स्वतःच्याच प्रेमात...

How to Stop Being So Damn Angry at Yourself : Why is self anger is dangerous for mental health : विनाकारण स्वतःवर टीका करत राहिलो, तर ते आपले जीवन नकारात्मकतेने भरून जाते, यासाठी नेमके काय करावे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2024 05:38 PM2024-08-01T17:38:34+5:302024-08-01T17:54:24+5:30

How to Stop Being So Damn Angry at Yourself : Why is self anger is dangerous for mental health : विनाकारण स्वतःवर टीका करत राहिलो, तर ते आपले जीवन नकारात्मकतेने भरून जाते, यासाठी नेमके काय करावे?

How to Stop Being So Damn Angry at Yourself Why is self anger is dangerous for mental health | स्वतःचाच खूप राग येतो, वाटते आपण नालायक आहोत? ३ उपाय, पडाल स्वतःच्याच प्रेमात...

स्वतःचाच खूप राग येतो, वाटते आपण नालायक आहोत? ३ उपाय, पडाल स्वतःच्याच प्रेमात...

राग येणं ही एक सहज स्वाभाविक गोष्ट आहे. एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही की आपल्याला राग येतोच. राग किंवा क्रोध हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे, असे मानले जाते. राग हा आपल्या प्रगतीतील अडथळा ठरु शकतो. भरपूर प्रमाणात राग आल्यावर आपण आपले भान हरवून बसतो. राग येण्याने त्याचे आपल्या आरोग्य आणि शरीरावर अत्यंत वाईट परिणाम होताना दिसतात. राग आल्यावर आपण आपली एकाग्रता हरवून बसतो, कोणत्याही कामात एकाग्रता नसेल तर यशप्राप्ती होऊ शकत नाही(Why is self anger is dangerous for mental health).

आपण जेव्हा रागात असतो तेव्हा आपण विचारशून्य असतो. या विचारशून्यतेमुळे आपलेच आपल्याला भान राहत नाही. त्यामुळे आपण योग्य, अयोग्य निर्णय घेऊ शकत नाही. एखादे काम पूर्ण करण्यासाठी शांत चित्ताची गरज असते, परंतु राग आल्यावर आपण अशांत होतो. या रागामुळे काहीवेळ आपण हाती घेतलेले काम तडीस नेऊ शकत नाही. राग आल्यावर आपणच आपल्यातील नेमकेपणा, विचार आणि निर्णय घेण्याची क्षमता हरवून बसतो. जर आपल्याला समोरच्या व्यक्तीचा राग आला असेल तर आपण तो राग बोलून, भांडून, ओरडून किंवा अशा अनेक पद्धतींनी व्यक्त करु शकतो. परंतु जर स्वतःचाच स्वतःला राग आला असेल तर तो राग व्यक्त करताही येत नाही आणि कुणाला सांगताही येत नाही. अशावेळी आपलीच मनातल्या मनात विचारांची घुसमट होते असते. ऑफिसमध्ये, घरात किंवा इत्तर कोणत्याही कारणाने जर तुमचाच तुम्हांला राग आला तर अशावेळी काय करावेत हे समजत नाही. अशा परिस्थितीत स्वतःवरील राग दूर करण्यासाठी काही सोप्या उपायांचा वापर करु शकतो(How to Stop Being So Damn Angry at Yourself ).

१. सेल्फ अँगरमुळे तुमचे मोठे नुकसान होते...  

१. आयुष्यात प्रत्येकजण चुका करतो, पण कधी कधी आपण काही चुका करतो ज्यासाठी आपण आयुष्यभर स्वतःला माफ करू शकत नाही. आयुष्यातील एक चूक माणसाला पुढे जाण्यापासून थांबवते आणि लहान-मोठे निर्णय घेतानाही तो घाबरू लागतो.      

२. अशा परिस्थितीत तो पश्चातापाने भरलेले जीवन जगू लागतो आणि स्वतःला अडचणीत टाकू लागतो. त्याच्या कृत्याची शिक्षा म्हणून तो हे स्वीकारू लागतो. अशा परिस्थितीत तणाव, चिंता आणि नकारात्मकता वाढणे स्वाभाविक आहे. सेल्फ वेबसाइटनुसार, मानसशास्त्रज्ञांचा असाही विश्वास आहे की जर आपण सतत स्वत:ला दोष देत राहिलो आणि विनाकारण स्वतःवर टीका करत राहिलो, तर ते आपले जीवन नकारात्मकतेने भरून जाते. 

३. साधारणपणे माणूस दुसऱ्यावर रागावला की त्याच्याशी भांडू शकतो, भांडण करून मनावरचे ओझे हलके करू शकतो, पण जेव्हा राग स्वतःवर असतो तेव्हा तो माणूस वर्षानुवर्षे आतमध्ये जळत राहतो. त्यामुळे हृदयविकार, मधुमेह यांसारख्या आजारांना बळी पडू शकतात, जुनी घट्ट नातीही तुटू लागतात, नैराश्य, चिंता यासारख्या समस्या वाढू लागतात. बऱ्याच वेळा याचा मानसिक आरोग्यावर इतका परिणाम होतो की एखादी व्यक्ती स्वतःचे नुकसान करण्याचा प्रयत्न करू लागते, जे प्राणघातक देखील असू शकते.

२. स्वतःवरील राग कमी करण्यासाठी नेमकं काय करता येऊ शकत ? 

१. सर्वप्रथम, स्वतःच्या भावना समजून घ्या आणि स्वतःशी संवाद साधा. यानंतर तुम्हांला असे लक्षात येईल की, तुम्ही स्वतःकडून खूप अपेक्षा केल्या होत्या आणि त्या पूर्ण न झाल्यामुळे तुम्हाला दुःख आणि स्वतःवर राग येत आहे. त्या परिस्थितींचे निरीक्षण करा आणि व्यावहारिकदृष्ट्या विचार करा की ती गोष्ट खरोखरच इतकी महत्त्वाची होती का की तुम्ही ती अजूनही तुमच्या मनावर ओझ्यासारखी वाहत आहात.

२. स्वतःला स्वतःच्या रागातून बाहेर काढण्यासाठी प्रोत्साहित करा आणि यासाठी आपल्या कुटुंबाची, जोडीदाराची किंवा मित्रांची मदत घ्या. त्यांच्याशी बोलण्यासाठी वेळ मागा आणि त्यांना तुमच्या भावना समजावून सांगा.

३. स्वतःला आराम देण्यासाठी आणि आपले मन शांत ठेवण्यासाठी, ध्यान, योगा किंवा प्रार्थना करा, आणि नियमितपणे त्याचा सराव करा. सकस, पोषक  आहार घ्या आणि तुमच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या. यामुळे राग कमी होण्यास मदत होईल.

Web Title: How to Stop Being So Damn Angry at Yourself Why is self anger is dangerous for mental health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.