नखं चावण्याची सवय लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच असते. यामुळे हातांच्या माध्यमातून तोंडात बॅक्टेरीयांचा शिरकाव होतो. यामुळे आरोग्याच्या इतर समस्या उद्भवू शकतात. सतत नखं चावल्यानं चारचौघात खूप विचित्र फिल येतो याशिवाय तब्येतीवरही परिणाम होतो. कितीही ठरवलं तरी ही सवय सुटत नसेल तर ही सवय सोडण्याचे काही उपाय समजून घेऊया. (8 Ways to stop biting your nails)
काहीजण ताण, एंग्जायटीचा सामना करत असल्यास लोक स्वत:ला शांत ठेवण्यासाठी नेल बायटिंग (Nail biting) करतात. अशा वेळी तुम्ही पाहीलं असेल की असा माणूस जेव्हा जेव्हा तणावपूर्ण परिस्थितीतून जातो तेव्हा त्या काळात तो नेहमी दातांनी नखे चावत राहतो.
नखं चावण्याची सवय सोडण्याचे उपाय
१) नखं चावण्याची सवय मोडण्यासाठी आपली नखं लहान ठेवा आणि त्यांना नियमितपणे ट्रिम करा. नखं लहान ठेवल्याने तुम्हाला ते चावण्यापासून रोखता येईल, कारण या स्थितीत नखे चावल्याने दुखापत होण्याचा धोका वाढतो. ही वेदना टाळण्यासाठी नखं चावणं आपोआप बंद होईल.
२) नखं एक्सटेंशनसाठी विविध प्रकारची सामग्री वापरली जाते. ते महाग देखील आहे. या दोन्ही गोष्टी मिळून तुम्हाला नखे चावणे थांबवण्यास मदत होईल. याशिवाय तुम्ही नेलआर्टही करू शकता. यामुळे नखांचा लूक सुंदर दिसेल.
३) जेव्हा जेव्हा नखे चावण्याची तीव्र इच्छा असते तेव्हा त्या वेळी तोंडात चॉकलेट किंवा च्विंगम ठेवा आणि ते चावत राहा.
४) मॅनिक्युअर नखे स्वच्छ आणि ट्रिम ठेवते. त्यामुळे हातांनाही स्वच्छ लुक येतो. ते सुंदर मॅनिक्युअर केलेले हात पाहून तुम्ही स्वतःला नखे चावण्यापासून थांबवाल.
५) काही लोकांना फक्त एकाच बोटाची नखे चावण्याची सवय असते. अशा स्थितीत त्यावर बँड-एड लावता येते.
६) तुमच्या आजूबाजूच्या लोकांची मदत घ्या आणि जेव्हा तुम्ही तुमचे नखे चावायला लागाल तेव्हा त्यांना थांबवायला सांगा.
७) जर तुम्हाला वाटत असेल की नखे चावणे मानसिक किंवा भावनिक परिस्थितीमुळे आहे, तर तज्ज्ञांची मदत घेण्यास अजिबात संकोच करू नका.
८) नखांना नेलपेंट लावा. नेलपेंटची कडवट चव तोंडात जाऊ नये म्हणून नखं चावणं टाळता येऊ शकतं.