Join us   

ग्लासभर दूधात 'हा' पदार्थ मिसळून प्या, भरपूर प्रोटीन- कॅल्शियम मिळेल, तब्येत राहील ठणठणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 8:34 AM

How to Stop Feeling Tired : शरीरात पाण्याची कमतरता भासल्यास थकवा आणि कमकुवतपणा जाणवतो.  म्हणून शरीराला नेहमी डायड्रेट ठेवा. डिहायड्रेशनमुळे अनेक आजार होऊ शकतात.

पौष्टीक अन्नपदार्थ खाल्ले तरी अंगाला लागत नाही, सतत तब्येतीच्या समस्या उद्भवत असतात. अशक्तपणा, थकवा जाणवतो अशी अनेकांची तक्रार असते. कामाच्या गडबडीत अनेकजण खाण्यापिण्याकडे व्यवस्थित लक्ष देत नाहीत. तब्येत चांगली ठेवण्यासाठी तुम्ही सकाळपासून रात्री झोपेपर्यंत काय खाता ते फार महत्वाचं असतं. (Simple Ways of Boosting Energy Levels and Reducing Fatigue) दिवसभर फ्रेश वाटण्यासाठी, थकवा- अशक्तपणा कमी होण्यासाठी एक सोपा उपाय पाहूया. यासाठी तुम्हाला औषधांवर खर्च करण्याची काही गरज नाही. स्वयंपाकघरातले पौष्टीक पदार्थ तुमच्या तब्येतीत सुधारणा करू शकता. (How to Stop Feeling Tired)

 थकवा दूर करण्याचा सोपा उपाय- एनर्जी वाढेल

सगळ्यात आधी एका भांड्यात मखाने घेऊन ते व्यवस्थित भाजून घ्या. त्यात २० ते २५ बदाम, पाव वाटी खसखस आणि १ वाटी काळे चणे घाला. मग त्यात सुक्या खारिकचे तुकडे घाला. त्यात खडीसाखरचे दोन मध्यम आकाराचे तुकडे घालून मिक्सरमधून वाटून घ्या. याची पावडर बनवून एका हवाबंद डब्यात स्टोअर करा.  रोज हे मिश्रण ग्लास ग्लास दुधात प्रत्येकी एक चमचा मिसळून या दूधाचे सेवन करा. यातील पौष्टीक घटकांमुळे शरीराचा कमकुवतपणा दूर होण्यास मदत होईल. याशिवाय तब्येतही उत्तम राहील.

१) ड्राय फ्रुट्सचा आहारात समावेश करा. यामुळे शरीर निरोगी आणि एनर्जेटिक राहते.  सुका मेवा खाल्ल्याने अनेक आजारांपासून लांब राहता येतं. यामुळे पचनक्रिया चांगली राहते. थकवा- कमकुवतपणा येत नाही. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास थकवा आणि कमकुवतपणा येतो.

२) आयर्न शरीराच्या पेशींना ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करते. यामुळे थकवा कमकुवतपणा दूर होतो. म्हणून आहारात आयर्न असलेल्या पदार्थांचा समावेश  करा. बीट, गाजर,  मटार, ब्रोकोली आणि रताळे खा.

३) शरीरात पाण्याची कमतरता भासल्यास थकवा आणि कमकुवतपणा जाणवतो. म्हणून शरीराला नेहमी डायड्रेट ठेवा. डिहायड्रेशनमुळे अनेक आजार होऊ शकतात. थकवा, कमकुवतपणा येतो म्हणून रोज २ ते ३ लिटर पाणी प्या यामुळे पचनक्रिया चांगली राहते.  पपई, केळी, सफरचंद अशा ताज्या फळांचा आहारात समावेश करा. जेवणानंतर बडीशेप खा ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहील.

३) सतत काम करत राहू नका. दीर्घकाळ सिटींगमुळे तुमच्या रक्तप्रवाहावर परिणाम होऊ शकतो. म्हणून कामादरम्यान मध्ये मध्ये एक्टिव्ह राहा आणि ब्रेक घेऊन चालत राहा. यादरम्यान आपलं शरीर स्ट्रेच करत राहा. यामुळे शरीरातील कमकुवतपणा दूर होण्यास मदत होईल आणि तुम्ही एक्टिव्ह राहाल.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स