बसल्या बसल्या नखं खाणं ही अनेकांना असलेली सवय आहे. लहान मुलंच नाही तर मोठी माणसंही अनेकदा असं करताना दिसतात. त्यांच्याही नकळत त्यांचा हात तोंडात जातो आणि लोकांसमोर किंवा अगदी भर मिटींमध्येही हे लोक नखं खातात. नखं खाणं आरोग्यासाठी चांगलं नसतं, नखं खाल्ल्याने पोटाचे विकार होण्याची शक्यता असते, कॅल्शियमची कमतरता असेल तर नखं खाल्ली जातात अशा अनेक गोष्टी आपण नेहमी ऐकतो. आपल्या कुटुंबातील लोक किंवा आपले मित्रमंडळीही अनेकदा आपल्याला नखं खाऊ नको असं सांगतात. (How To Stop Nail Biting) अशावेळी काही वेळाकरता आपला हात खाली जातो, पण पुन्हा नकळत आपला हात तोंडात जातोच. नखं खाल्ल्यानी आरोग्याचे कोणते नुकसान होते ते पाहूया (Remedies To Stop Nail Biting)..
१. दात खराब होतात
आपण नखं खातो म्हणजे दातांनी नखं तोडण्याचा प्रयत्न करतो. अनेकदा आपली नखं ही कडक असतात. सतत नखं खाल्ल्याने आपल्या दातांमध्ये फटी पडण्यास सुरुवात होते. तसेच तुम्ही दातांना ब्रेसेस लावले असतील तर नखं खाण्यामुळे तेही खराब होण्याची शक्यता असते.
२. पोट खराब होते
आपण हाताने अनेक कामे करत असतो. आपले हात तोंडात जातात तेव्हा आपण दरवेळी हात धुतोच असे नाही. त्यामुळे नखांमध्ये साठलेली घाण आपल्या पोटात जाते आणि आपली पचनशक्ती बिघडते. अशाप्रकारे नखं खाण्याने पोटाची इन्फेक्शन्स होण्याची शक्यता असते. त्यामुळे पोटाचे आरोग्य बिघडू नये यासाठी नखं खाण्याची सवय अतिशय वाईट असते.
३. इन्फेक्शन होण्याची शक्यता
आपले हात स्वच्छ असतील तर आपण विविध इन्फेक्शन्सपासून स्वत:ची सुटका करुन घेऊ शकतो. पण नखांमधून आपल्या पोटात काही जीवाणू गेल्यामुळे आपल्याला विविध इन्फेक्शन्सचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे नखं न खाता ती नेलकटरनी काढायला हवीत.
नखं खाण्याची सवय कमी करण्यासाठी
१. तुम्हाला नखं खायची इच्छा होईल तेव्हा तुम्ही गाजर, मुळा, काकडी अशा गोष्टी घेऊन त्या चावा. त्यामुळे नखं खायची सवय कमी होईल. सलाड पोटात गेल्याने ते आरोग्यासाठी चांगले असते त्यामुळे त्याचाही फायदा होईल.
२. नखं वाढलेली असतील तर ती सतत चावण्याची इच्छा होत राहते. त्यामुळे वेळोवेळी नखं कापलेली ठेवा. म्हणजे नखं तोंडात घालण्याची आणि चावण्याची इच्छाच होणार नाही. वाढलेल्या नखात घाण बसते आणि ती पोटात जाते. त्यामुळे नखं कापलेली असणं केव्हाही चांगलं.
३. कॅल्शियमची कमतरता असेल तर अनेकदा नखं खाण्याची इच्छा होते. त्यामुळे आहारात दूध, गादर, बीट, लिंबू अशा कॅल्शियम देणाऱ्या घटकांचा समावेश करा. शरीराला चांगल्या प्रमाणात कॅल्शियम मिळाला तर नखं खाण्याची इच्छा कमी होण्याची शक्यता असते.