Join us   

खूप जड जेवण झाल्यावर पोटात गुडगुड, अपचनाचा त्रास होतो? जेवताना होणारी १ चूक टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2023 2:08 PM

How to stop stomach growling: 1 Ayurvedic Remedy भरपूर मनसोक्त जेवल्यावर पोट दुखतं, हा त्रास नको तर एक गोष्ट नक्की करा.

अनहेल्दी लाईफस्टाईलमुळे अनेकांना पचनाचा त्रास होतो. यामागे अनेक कारणे असू शकतात. वेळेवर जेवण न करणे, उलट - सुलट खाणे, अपुरी झोप यामुळे जेवण वेळेवर पचत नाही. आयुर्वेदानुसार खाण्यापिण्याच्या वेळेवर विशेष लक्ष द्यायला हवे. कोणत्या ऋतूत कोणते पदार्थ खावेत, कोणत्या वेळी कोणते पदार्थ खाणं टाळावे.

याबाबत आयुर्वेदात अनेक नियम आहेत. आजच्या काळात खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे बहुतेकांना अपचनाचा त्रास होतो. विशेषत: जड अन्न  खाल्ल्यानंतर अनेकांना गॅसेस आणि पोट फुग्ण्याचा त्रास होतो. हा त्रास टाळण्यासाठी काय करावं? याची माहिती आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर नीतिका कोहली यांनी दिली आहे(How to stop stomach growling: 1 Ayurvedic Remedy).

जड अन्न खाल्ल्यानंतर अपचन कसे टाळावे?

- जड अन्न लवकर पचत नाही. विशेषत: ज्या लोकांची पचनशक्ती कमकुवत असते, त्यांना जड अन्न खाल्ल्यानंतर गॅसेस, पोट फुगणे, अपचनाचा त्रास होतो. तज्ज्ञांच्या मते, जेवणासोबत किंवा जेवल्यानंतर थंड पाणी प्यायल्यास अपचन होऊ शकते.

- जेवणासोबत किंवा जेवल्यानंतर थंड पाणी न पिता, कोमट पाणी प्यावे. यामुळे पोट फुगणे, गॅस आणि अॅसिडिटीचा त्रास होत नाही.

१ महिनाभर चपाती खाणं पूर्णपणे बंद केलं तर काय होईल? तज्ज्ञ सांगतात, काय काय बदलेल..

- मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर कोमट पाणी प्यायल्यास शरीरात चरबी जमा होत नाही. कोमट पाणी प्यायल्याने पचनसंस्था सुधारते, ज्यामुळे खाल्लेलं अन्न नीट पचते.

दररोज उपाशीपोटी मुठभर भिजवलेले शेंगदाणे खाण्याचे ५ फायदे, शेंगदाणे भिजवूनच खा कारण..

अपचन दूर करण्यासाठी टिप्स

जड अन्न खाल्ल्यानंतर अपचनाचा त्रास होत असेल तर, जेवणासोबत प्रोबायोटिक्सयुक्त पदार्थ खा. त्यामुळे आतड्यांमध्ये चांगले बॅक्टेरिया तयार होतात आणि पचनक्रिया सुधारते. आपण जेवणासोबत दही खाऊ शकता.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यअन्न