ऊन्हाळ्याच्या दिवसांत जरा घराबाहेर पडलं किंवा पंखे बंद केले की लगेच घामाच्या धारा वाहायला सुरूवात होते. घामामुळे कपडे तर ओले होतातच पण चिडचिडसुद्धा होते. (Summer Care Tips) घाम येऊ यासाठी तुम्ही काही सोप्या ट्रिक्स फॉलो करू शकता. ऊन्हाळ्याच्या दिवसांत घाम आणि दमट हवेमुळे एनर्जी कमी होत जाते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत बाहेरून आल्यानंतर आधी अंघोळ करण्याची इच्छा होते. अंघोळ केल्यामुळे फक्त घाम कमी होत नाही तर शरीरावरील बॅक्टेरियाज नष्ट होण्यास मदत होते. (How to Stop Sweating Naturally)
जास्त प्रमाणात घाम येऊ नये यासाठी अंघोळीच्या पाण्यात काही पदार्थ मिसळले तर दुर्गंध येणार नाही. काही घरगुती उपाय तुम्हाला घामाच्या त्रासापासून सुटका देऊ शकतात. काही असे नॅच्युरल इंग्रेडिएट्स आहेत ज्यामुळे बॅक्टेरियाज दूर होण्यास मदत होईल यामुळे शरीराची पीएच लेव्हल मेंटेन राहील याशिवाय खाज, घामपासूनही आराम मिळेल आणि तुम्ही दिवरभर फ्रेश राहाल. (Add 5 Ingredients In Bathing Water For Sweat Control)
आंतरराष्ट्रीय हायपरहाइड्रोसिस सोसायटीच्या रिपोर्टनुसार अति घाम येत असेल तर शरीराचे तापमान नियंत्रित करणं गरजेचं असते. नेहमी हायड्रेट राहा, ऊन्हाळ्यात जास्तीत जास्त सुती कपडे वापरण्याचा प्रयत्न करा. थकवा, एन्जायटी येणार नाही याची काळजी घ्या. सकाळी किंवा संध्याकाळी व्यायम करा. दिवसभरात मध्येच किंवा दुपारी वर्कआऊट करू नका. कोणतीही औषध घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
१) कडुलिंब
कडुलिंबात एंटीबॅक्टेरियल गुण असतात त्यामुले स्किनचा बॅक्टेरियाजपासून बचाव करण्यास मदत होते अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पानं किंवा कडुलिंबाचे तेल मिसळून तुम्ही अंघोळ करू शकता. यामुळे स्किन रॅशेज, घामाचा दुर्गंध आणि खाज कमी होण्यास मदत होईल.
कोण म्हणतं प्रोटीन महाग मिळतं? १० रूपयांत भरपूर प्रोटीन देतील मूठभर शेंगदाणे-मजबूत होईल शरीर
२) हळद
हळदीत एंटीबॅक्टेरिअल, एंटीइंफअलेमेटरी आणि एंटी एजिंग गुण असतात. ज्यामुळे त्वचेला बरेच फायदे मिळतात. पाण्यात हळद मिसळून लावल्याने त्वचा टवटवीत चांगली राहण्यास मदत होते. याशिवाय त्वचेचा ग्लो देखिल वाढतो. त्वचेचं टॅनिंग निघण्यास मदत होते.
पोट-मांड्याची चरबी वाढलीये? जीम, डाएट काहीच न करता ५ गोष्टी फॉलो करा; स्लिम व्हाल
३) गुलाबाच्या पाकळ्या
अंघोळीच्या आधी पाण्यात गुलाबाची पानं घाला. या पाण्याने अंघोळ करा. यामुळे स्किन निरोगी राहील आणि घामाचा वासही येणार नाही. गुलाबाच्या पाकळ्यांमुळे घामाचा दुर्गंधही येणार नाही.
४) मूगाचे पीठ
मूग भाजून त्याचे पीठ तयार करून घ्या. हे पीठ अंगाला लावून अंगाची पूर्णपणे मसाज करा. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे घाम येण्याचं प्रमाण कमी होईल आणि तुम्हाला फ्रेश वाटेल. घाम जास्त आल्याने डिहायड्रेशन होते, तब्येतीचे विकारही उद्भभवू शकतात.